कशी मस्त जिरली !
रात्रभर हुंदडून हुंदडून चंद्राने सॉलिड मस्ती केली.
ते पाहून सूर्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली
राग अनावर आळवत सुटला
भाजत पोळत जाळत सुटला
झाडाने मग आणला वारा
ढग्गोबाने आणल्या गारा
पाण्याचाही केला मारा
तरी ह्याचा वरच पारा
आगीच्या या कल्लोळाला पृथ्वी मात्र पुरून उरली
समुद्रात बुडवून ह्याला म्हणते कशी मस्त जिरली
मस्त जमली..
खुपच छान …
आवडली कशी मस्त जिरली
कविता मात्र छानच जमली…
Thank you Nachiket, Devendraji, Sudarshan.
वाह सुंदर
mastach..