चेहरे
चेहरेच चेहरे अवती भवती
नाक डोळे ओठ सारे काही
प्रत्येक चेह-यावर जागच्या जागी
सुरकुत्यांच्या नक्षी सहित,
सगळ अगदी माणसांसारख
हसरे, सुंदर, रंगीत काही
काही नेटके, मोजके, माफक
पण गुच्छ असे नाहीतच ताज्या टवटवीत फुलांचे कुठे
आपापल्या ओळखीसकट एकत्र बांधलेले, जग सुंदर करणारे..
सगळे विखुरलेले, माळेतून ओघळलेल्या मोत्यांसारखे
मोती खरेच, पाणीदार…पण आपापले अदृश्य शिंपले घेऊन फिरणारे
आणि वातावरणात भरून राहिलेले स्वर
डोळ्यातलं मृगजळ लपवता लपवता ओठातून निसटलेले…
सुंदर लिहल आहे…..
(‘गुच्छ’ अस यायला हव ८ व्या ओळीत )