गुलमोहोर
तापलेल्या डांबराच्या एकलकोंड्या रस्त्यावर तुला उभं पाहिलं
पोळणा-या वा-यावर, त्या आगीच्या गोळ्याशी एकरूप होताना
तुझी सावली सुद्धा तेव्हा झाली होती लालबुंद, निखा-यासारखी.
तू असा जळत उभा होतास
आणि ते मात्र तुझ्यात बघत होते
नखशिखांत बहरलेला गुलमोहोर
तू असा उभा जळत होतास
पेक्षा
तू असा जळत उभा होतास
ह्यात वैचारिक विशालता आहे…