ढग


ही कविता (?), खरं तर कविता नही म्हणता येणार..ललित म्हणू या, मला सुचली ती मुंबई मधल्या रेलवे स्फोटांनंतर। आदल्या वर्षीच्या २६ जुलाई च्या पावसाने वाताहत केल्यानंतरच्या वर्षी त्याच महिन्यात हे स्फोट झाले। प्रचंड अस्वस्थ वाटत असताना सुचलेल हे काहीतरी…
*****

काळे ढग दाटलेले क्षितिजावर
जरा जास्तच गडद
जरा जास्तच काळे

“का आज सहजच आलात?” मी त्याना विचारले
गेल्या वर्षी आला होतात असेच दाटून
गरजला होतात जोरात आणि
बरसलात देखील
इतके की उध्वस्त केलत सगळं।
रागावला होतात फार
आज जरा जास्तच रागावलेले दिसता
आजही आग ओकायला आला आहात? “

ढग जरा जास्तच दाटून आले
दाटलेल्या गळ्यानेच म्हणाले,
त्यांनी देखील उध्वस्त केल सगळं
पण ते जास्त काळे होते।
ते गरजले नाहीत फ़क्त बरसले …पाणी नव्हे आग।
तो आवाज एइकला मी । माझ्या गरजण्या पेक्षा भयंकर.
आणि किंकाळ्या सुद्धा। माझ्या विध्वौंसा पेक्षा जीवघेण्या…”

“या वर्षी रंग वेगळा आहे जरा
प्रयत्न करतोय माणसाच्या मनातल काळं शोषून घेण्याचा.
किंवा तो काळा धूर असेल कदाचित
की काळवंडलेल्या चहरयांच प्रतिबिम्ब?

राग ओकायला नाही आलो
अश्रु ढाळायला आलो आहे।
हतबल आहे मी. काहीच थाम्बवू शकत नाही.
तेव्हाही राग ओकायला नव्हतोच आलो
जास्तच दडपण आल होत तुम्हा माणसांच्या मागण्यांचं
हतबल होतो तेव्हाही. थाम्बवू शकलो नाही तेव्हाही…स्वतःला!

आणि ढग रडू लागला…

Advertisements
  • ngadre
  • फेब्रुवारी 16th, 2009

  शब्दांत खूप ताकद असते. खूप छान लिहिलंय..आपल्या भावना निर्जीव गोष्टींवर आरोपित करण्याचा ध्यास खूप जुना..आपण बोललो तर ते काळजात पोचेल न पोचेल..ढग बोलले की लगेच पोचतं.. आपल्याला ढगांसारखं दाटून येता येत नाही.ढगांसारखं आणि ढगांइतकं रडता येत नाही..आपण तितकं रडलो तरी ते इतरांना दिसत नाही..आपला जीवच छोटा..म्हणून मग ढग, दगड, समुद्र, पहाड यांना बोलतं करायचं..खूप छान.. लिहित रहा..

  • ngadre
  • फेब्रुवारी 16th, 2009

  कॉमेंट बॉक्स मधे मराठी लिहिण्याबद्दल..google Indic Tranliteration page वर किंवा तुझ्या नेहमीच्या टाइपिंग सॉफ्टवेर मधे टाईप करून मग ते कॉमेंट बॉक्स मधे पेस्ट करावं लागेल.. मला तरी दुसरा मार्ग माहीत नाही..

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: