मोत्या शिक रे…


काल दोन अशा घटना माझ्या अनुभवाला आल्या की त्या लिहिल्याशिवाय राहावत नाही.
मी रिक्शा ने घरी जात होते. अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर, अचानक रिक्षावाल्याने प्रश्न विचारला,” MBA करने के बाद salary कितना मिलाता है मैडम?”.
मी म्हटल ” १५-२० हजार से शुरू होता है अगर ठीक कंपनी में चालु किया तो..”.
“बहुत पढ़ना पड़ता है न?” रिक्शावाला.
” हा..क्यू कौन कर रहा है MBA?” मी.
“मेरा बेटा..” तो.
मला ऐकून आश्चर्य आणि आनंद दोन्ही वाटल.
“लखनऊ से कर रहा है. यहाँ मुंबई में बहोत मंहगा है. ४-५ लाख लग जाते. वहा २ लाख तक हो जायेगा.”
“इतना पैसा कहा से लाया?” मी.
” हमारी जमीन है न गाव में. लोन मिल जाता है उसको गिरवी रख कर. नहीं तो मेरे पास कहा से आएगा? बेटा जिद पे अडा था. के करना ही है. आजकल सिर्फ़ BA करके कुछ नहीं होता न? कलही उसका फ़ोन आया था. बोल रहा था के साइंस और कामर्स के लोगोको और engineeroko थोडा कम महनत करना पड़ता है. लेकिन BA किया तो मुझे जादा मेहनत करनी पड़ेगी.”…
आज रिक्शाच मीटर जास्त पडल तरी भांडायच नाही अस मी मनाशी ठरवल. गेले थोड़े जास्त पैसे तर लोन फेडायला उपयोग होईल त्याला.

दूसरी घटना वार्सोव्याच्या उच्चभ्रू वस्तीमधली. हा मुलगा यंदा १० वी ला आहे. कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही.
पण त्याला किडनी शी सम्बंधित एक गंभीर समस्या आहे. त्याच्याशी तो जन्मापासून झगडतो आहे. सम्पूर्ण वर्ष तो शाळेत जावू शकलेला नाही. प्रिलिम परिक्षेच्या वेळी त्याला पुन्हा मेडिकल कॉम्प्लिकेशन face कराव लागल.
त्याच्या आई-वडिलांनी त्याला कुठलही प्रेशर घेवू न देता आजवर इथपर्यंत आणल आहे. त्यांनी त्याला विचारल की तुला परीक्षेला बसायच आहे न? नसेल तरी काहीही हरकत नाही. पूर्ण बरा झालास की बसता येइल.
पण त्याने तरीही जिद्दीने परीक्षेला बसण्याची तयारी दाखवली. नाही झालो पास तर october मधे बसेन. पण परीक्षा देणारच.

या दोन्ही घटना मला स्पर्शुन गेल्या. कारण एक उदहारण आहे अति श्रीमंत वर्गातल तर एक अत्तिसामान्य किंवा गरीबी कड़े झुकलेल्या कुटुम्बातलं, पण शिकण्याची जिद्द सारखीच.
जवळ जन्माला पुरेल इतकी संपती असताना सुद्धा महनत करून वर जाण्याची जिद्द जितकी कौतुकास्पद तितकीच, कर्ज काढून शिकण्याची इच्छाशक्ति अभिमान वाटायला लावणारी.

शिक्षणाकडे बघण्याचा हा संस्कार जर सगळ्या वर्गात असाच झिरापला,  तर ‘विकास’ हा शब्द प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही.

Advertisements
  • ngadre
  • फेब्रुवारी 26th, 2009

  sundar..
  laaj vatate swanhachee..

 1. असंच ’दिल से’ लिहित जा. मस्त जमलंय..

 2. wow.. inspiring! 🙂

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: