कालाय तस्मै नमः!


आज लंच टेबल वर माझी एक मैत्रीण सांगत होती, ” आज माझ्या शाळेचे प्रिंसिपल वारले. बहुतेक आता २-४ दिवस तरी सुट्टी असेल शाळेला…”
मी न-कळत भूतकाळात शिरले. मला माझी शाळा, आमचे प्रिंसिपल, शिक्षक, त्यांची आम्ही केलेली टिंगल, नकला, सगळ आठवल. हे सगळ मागे ठेवून आपण आयुष्यात कितीतरी पुढे आलोय नाही? म्हणजे प्रत्येकजण येतोच. गती हा आयुष्याचा नियम आहे. काळ थाम्ब्वून ठेवता येत नाही हे सत्य! पण अशी काही बातमी जेव्हा येते ना तेव्हा उगीचच काहीतरी हरवल्यसारख वाटत. आपल्याला आपल्याशीच बांधून ठेवनार्या साख़ळीमधलि एक कड़ी निखळल्या सारख वाटत.  अशा कितीतरी कड्या निखळल्यात नाही आतापर्यंत?
शाळेत असताना वाटायच की आपण या शाळेशिवाय , या मैत्रिणिंशिवाय एकही दिवस राहु शकणार नाही. send-off च्या दिवशी ओक्साबोक्शी रडले.
कॉलेज मधे कधी रुळलो हे कळलं ही नाही. पण मनात नेहमी असायच की आहेत सगळ्याजणी आस-पासच. हव तेव्हा भेटता येइल. दर सुट्टीत शाळेला भेटायच हेही ठरवलं होत.
कॉलेज कधी संपल तेहि कळ्ळ नाही. तेव्हाही वाटल नव्हत काही निसटेल म्हणुन. म्हणजे वाटायच की आता आपण सगळे नोकर्या करणार. म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहणार. म्हणजेच अधिक स्वातंत्र्य . निर्णयाचं, ख़र्च  करण्याच सुद्धा. हव तेव्हा भेटता येइल सगळंयाना, नविन नविन experiences शेयर करता येतील वगैरे वगैरे. पण मग एक एक जण वाटेला लागले. कोणी अमेरिकेला गेले, कोणी इतर कुठे. कोणी लग्न करून मोकळे झाले. प्रत्येकजण नविन विश्वात रमून गेला.
पण अस काहीतरी एइकल ना की एकदम धुन्दितुन जाग झाल्यासरख होत. अरे हो..आपण सुद्धा शाळेत होतो. आपल्या शिक्षकांची थट्टा करायचो. शाळा सुटली की निरर्थक गोष्टींवर हसायचो (आता निरर्थक वाटतात..तेव्हा त्या छोट्या छोट्या गोष्टी अक्खा अक्खा दिवस कारणी लावायला पुरायच्या) . ते दप्तर, ती चाइनीज फौंटन पेन्स, सुटलेल्या रिबिनी…सगळ सगळ अनमोल होत. कुठे गेल सगळ? कॉलेज चे दिवस आठवतात.  खिशात पैसे असण्याची गरज नव्हती. सगळे आनंद मोफत होते.
मग एक एक कड़ी निखळत कधी गेली ते कळलच नाही.
तेहि आपणच होतो. हेही आपणच आहोत. पण दोन भिन्न व्यक्ति वाटाव्या इतक अंतर आहे. ते जग खरच होत का?
एखादी बातमी आली ना..”की हेहे प्रोफ़ेसर आठवतात? ते वारले.” की एकदम एक दुवा निखळल्य सारख वाटत.
भूतकाळातल्या सगळ्याच गोष्टी चांगल्याच असतात अस नाही. पण त्या आपल्याला भूतकाळाशी बांधून ठेवणार्या असतात हे खर. आवडते की नावडते हा प्रश्न महत्वाच उरतच नाही. जे शालेच, कॉलेज च तेच जुन्या शेजार्यांच सुद्धा. एके काळी किती मजा केलेली असते एकत्र. पण आता भेटलो की काय बोलाव हे सुचत नाही. निवडक प्रश्नावली संपली की उगीच हवापाण्याच्या गप्पा मारायच्या. हरवलेल काहीतरी शोधत राहायच.

 

कधी कधी माझ्या मनात विचार येतो की आपल्या आई-वडिलांना जीवनाच्या या वळणावर काय वाटत असेल? आता तर मूलं सुद्धा घरट्यातून उडून गेलेली. किंवा घरट्यातच असून आपल्या नविन जगात रमलेली.  एक एक मित्र, एक एक नातेवाईक सुटत असताना मागे बघताना त्यांना काय वाटत असेल? एक एक कड़ी निखळत चाललेली बघण किती वेदना देत असेल?
कदाचित तस् नसेलही. शेवटी मी नाही का माझ्या वर्तमानात रमलेली असते? ते काही वरवरच नसत. आपण मनापासुनाच जगत असतो. काळा बरोबर जगण्याची ही कला सुद्धा काळाचच वरदान आहे. नाहीतर इथपर्यंत आलो असतो का? आणि इतक्या कड्या निसटून सुद्धा आयुष्याला सुंदर म्हणू शकलो असतो का?…
कालाय तस्मै नमः!

Advertisements
 1. ह्या लेखातला प्रामाणिक पणा मनःस्पर्शी आहे. आपल्या जवळ जे असते ते नकॊ असते. म्हणुनच तर इंग्रजीत म्हण आहे.. द अदर साईड ऑफ फेन्स इज ऑल्वेज ग्रिन!
  लहान असतांना मोठं व्ह्यायचं असतं.. मोठं झाल्यावर लहानपण आठवतं. मी रिअलाइझ केलंय, वयाची ४० ओलांडली की हे फारच प्रकर्षाने जाणवते.
  ह्या संपुर्ण जिवन प्रवासत किती लोकांनी हात दिला, किती मित्रांनी वेळेवर हात झटकला.. ह्या सगळ्यांची गोळाबेरिज म्हणजे आपण जगलेले जीवन!!

 2. Agdi khar aahe…

 3. त्या त्या वर्तमानकाळात कितीही समरसून जागलं तरी..
  फ़ट्टकन अर्धं आयुष्य गेल्याचं जाणवतं ..आणि मग ओळी आठवतात ..

  उम्र यूँ गुज़री है जैसे सर से
  सनसनाता हुआ पत्थर गुज़रे ..

  • ngadre
  • मार्च 2nd, 2009

  New entry on my blog.
  gnachiket.wordpress.com

  • Sulu
  • मार्च 4th, 2009

  Life is what happens to you when you are busy making plans.

  • अरुण
  • मार्च 5th, 2009

  Agdi khara aahe. Pratyekachya aaushyat he divas yetatach. Agdi Balwadi chya baain passun te College Madhlya prof paryant, koni na koni tari aaplyala khup jawalacha astach. Tatatut hote aani ekdam aikawa lagta te tyanchya marana vishayi. Ek vidyarthi mhanun apan khupach krutaghna asto, pan kay kara, Kalaya Tasmai Namah.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: