झोप


आजचा आपला विषय आहे झोप.
कारण?
कारण आज माझी झोप अजिबात पूर्ण झालेली नाही आणि झोपेच्या बाबतीत मी फार सेंसिटिव आहे.
अगदी लहानपणापासुनच. म्हणजे जेव्हा माला सेंसिटिव ह्या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता तेव्हा पासून.

मी अगदी बालवाडीत होते न तेव्हा पासूनच मला वर्गात झोपण्याची सवय होती. मग बाईनी सांगितलेली गोष्ट कितीही intersting वगैरे असली तरी मला झोप ही येणारच. बाईंचा नाईलाज झाला की त्या आपल्या मला मांडीवर घ्यायच्या. इतर वर्गाला गोष्ट सांगत सांगत मला झोपवायच्या. त्या वेळी ती गोष्ट मला अंगाई गीता सारखी वाटायची.

पुढे पहिली-दुसरीत सुद्धा माझी सवय कायम राहिली. म्हणजे शाळेचि वेळ बदलून सुद्धा काही फरक असा पडला नाही. परत आमची ऊँची लहान म्हणजे नेहमी पहिल्या बाकावर बसायच. लपण्याची सोय नाही. मग बाई शिक्षा म्हणुन मला बाकावर उभ करायच्या. पण झोपेवरच प्रेम हे शिक्षेच्या भितीपेक्षा कितीतरी पटीने अधिक होत ह्याची त्यांना काय कल्पना? नंतर नंतर तर मी स्वतःच बाकावर उठून उभी राहत असे. ती शिक्षा न वाटता, मला बहुतेक अधिक चांगली झोप यावी म्हणुन बाईंनी केलेली सोय आहे अस वाटण्याइतक ते माझ्या आणि बाईंच्या सुद्धा अंगवळणी पडलेल होत. 
मोठ्या वर्गात सुद्धा तेच. एव्हाना माझी किर्ती शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना माहिती झालेली होती. कधी कधी तर माझे तारवटलेले डोळे आणि मलूल चेहरा बघून त्यांना मला बर नाही की काय अस वाटू लागे. मग ते मला स्वतःच सांगत की “जा मागच्या बाकावर जाउन डोके टेकून पड़ जरा.”  त्यावेळी मला जो काही आनंद व्हायचा तो शब्दात नाही सांगता येणार. त्यावेळी अनेक मैत्रिनिंच्या डोळ्यात मला असूया सुद्धा दिसायची.(अर्थात अर्धवट झोपेत).
नाही म्हणजे मग माझ्या वहीतल्या नोट्स आधी मराठीत, मग मोडी लिपित आणि नंतर काहीशा उर्दूत लिहिलेल्या बघून बाईंना आश्चर्याचा धक्का बसत असे.

कधी कधी तर माझी पार फजीती झालेली सुद्धा मला आठवते. पहिल्या बाकावर बसून झोपण्याची माझी एक ख़ास पद्धत होती. पुस्तकावर कोपर टेकवून, आणि कपलावर हाताची छतरी करून मी आतमधे झोपत असे. बाहेरून पहाताना कोणालाही असेच वाटेल की मी मान खली घालून पुस्तक वाचते आहे. हे बर्याचदा यशस्वी होत असे. पण एकदा मला अचानक इंग्रजी च्या सरांनी प्रश्न विचारला. आधी मूळात प्रश्न मला विचारलेला आहे हे कळेपर्यन्त तो प्रश्न त्यांनी ३ वेळा विचारून झाला होता. नंतर प्रश्न समजुन घेण्यात काही वेळ गेला. बर प्रश्नाची पार्श्वभूमी माहीत असण्याची काहीही शक्यता नव्हती हे त्यांना बिचार्यान्ना कसे कळणार? तो पर्यंत पारा चांगलाच वर गेला होता. तरीही संकटाची चाहूल लागताच माझ्या मैत्रिनिन्नी मला सावध करण्याचा प्रयत्न सुरु केलेला होता. मला रेडीमेड उत्तर देण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न आठवला की खरी मैत्री काय हे वेगळे आठ्वण्यचि गरज पडत नाही.
तो प्रसंग कसा बसा निभावून नेला होता.
माझे आणि झोपेचे असे कितीतरी किस्से आहेत. आणि खरच माझ झोपेवर अत्तिशय प्रेम आहे.  पण माझ्या मुलीच्या जन्मानंतर मात्र माझी झोप हा एक रम्य भूतकाळ म्हणुनच मला आठवावा लागतो. कधी काळी उड़ता न उड़णारी झोप आता तिने झोपेत कूस बदलली तरी चटकन उडून जाते. सलग ६-७ तास झोप ही निव्वळ अशक्य गोष्ट झालेली आहे. बिचार्या पिल्लूचा त्यात काय दोष? पण झोप पूर्ण झाली नाही की मला “कशासाठी हे सगळ? का करायच असत लग्न, संसार वगैरे?  का मी माझ आयुष्य माझ्या मर्जीप्रमाणे जगु शकत नाही? का मला समाजाच्या चाकोरीतुनच जाव लागतय?” वगैरे हे असले फार गहिरे प्रश्न पडतात. आणि झोप पूर्ण होईपर्यंत (तात्पुरती का होईना) मला त्यांची उत्तर सापडण अशक्य असत.
आताशा मात्र जरा कधी कधी कहिस वेगळ व्ह्यायला लागलय. माझ्या मुलीला गाढ़ झोपेत पहिल की मला आपोआप झोपल्यासरख वाटत. आणि जेव्हा ती झोपेतुन उठून फ्रेश फ्रेश हसते न तेव्हा खुप थकून, १०-१२ तास झोपून थकवा दूर झाल्यावर जस वाटेल न तस वाटत.  काय म्हणता? मी झोपेत लिहितेय…? zzzzzz ssssssss……

Advertisements
 1. “माझ्या मुलीला गाढ़ झोपेत पहिल की मला आपोआप झोपल्यासरख वाटत. आणि जेव्हा ती झोपेतुन उठून फ्रेश फ्रेश हसते न तेव्हा खुप थकून, १०-१२ तास झोपून थकवा दूर झाल्यावर जस वाटेल न तस वाटत.”
  माझ्या मुलींचं लहानपण आठवलं.

  आणि ते शाळेतलं बाकावर उभं राहुन झोपणं…. नुसतं वाचुनच खुप हसुं आलं.

 2. धम्माल एंट्री..

  नेहमीपेक्षा जरा हटके..

  झोपाळू कुठची..!!

  आवडलं..

  मी पण आज काहीतरी नवीन लिहिलंय.

  वेळ झाला तर वाच..

 3. Third day in a row I posted a new entry.

  Blog addiction?

  vel jhaala tar vaach..

  • Priti
  • मार्च 4th, 2009

  hi sonal
  ekdam sahich vatal vachun aani mast hasale pan me..pan to english cha kissa kitavya std madhe asatana zala hota g..karan mag me tya velache sir aathavun ajun hasen:):):)

  • Minal
  • मार्च 4th, 2009

  Hi Sonal,

  I am the witness for this. Specially dahavicha englishcha taas!!!!!!!!!!

  I cann’t forget that…Mast blog. Vachun chaan vatala ani junya aathvani jagya jhalya.

  • अरुण
  • मार्च 5th, 2009

  Hi Sonal, Thodya phar pharkane saglyach lahan mulancha zhope babtit sarkhach asta. Tu lihilay te agdi khara aahe. Lihaychi padhhat ekdam sadhi saral, tyamule jaast aawadli. Gamtishir prasang chan padhatine lihile aahet. Maja Aali.

 4. hi Priti..english cha kissa 10 wit astaana. joshi sarancha taas!

 5. झोप इतकी अनिवार असायची शाळेत आणि कॉलेज मधे..(अजूनही असते तशीच..खरं सांगायचं तर..!!)

  पण त्यावेळी आमचे फिजिक्सचे जमदग्नी प्रोफेसर कच्च करून खडू फेकून मारायचे…

  मग खाडकन डोळे उघडायचे ..

 6. Jhop ha saglyanchyach jivhalyacha vishay aahe he waachun far bar watal.
  Navin entry takliye. wel milala tar wach.

  • mipunekar
  • जून 4th, 2009

  भारी…………
  मी पण प्राथमिक शाळेत झोपायचो, एक दोन वेळा तर बाईंनी काही स्टाफ रूम मध्ये नेऊन गादी वर झोप्वाल्याचा पण आठवतं आहे. आणि वर्गात,ऑफिस मध्ये झोपायच्या क्लुपत्या जरा जास्तच तंतोतंत जुळत आहेत,
  कितीही काम असला तरी दुपारी जेवणानंतर १:३० ते २:३० हि एक घातक / killing वेळ असते माझ्या साठी. लोक म्हणतात चहा प्यावा झोप जायला पण मी किती वेळा मित्रांबरोबर रात्री चहा पिऊन झोपतो. कशी जाणार चहानी झोप.
  मी शनिवार रविवार पण झोपत नाही. सवय लागते २ दिवसांची.आणि मग सोमवारी झोप अनावर होते. तुझा बरं आहे ऑफिस मध्ये डुलकी काढता यायची. मला ऑफिस मध्ये पण झोपता येत नाही.मी हायवे बर बसतो. नुसती वर्दळ असते. जरा डुलकी लागली तर कंपनी भर पसरेल बातमी.
  आणि समजा यदा कदाचित १ मिनिटाची जरी झोप ऑफिस मध्ये मिळाली न तरी इतका फ्रेश वाटता म्हणून सांगू. आईशप्पथ.

  मी विसरलो कि कॉमेंट लिहितोय.मुद्दाम थांबतो नाहीतर माझी कॉमेंट तुझ्या पोस्ट पेक्षा मोठी होईल. 🙂

 7. hahaha. last statement aawdal.

 8. अरे वा वा, माझ्यासारखे झोपेवर अनावर प्रेम करणारे बरेच जण आहेत की. 😀 वार्षीक परीक्षा सुरू असताना तर मी उभी/ताठ बसून/ फिरून/ डोळ्याला सारखे पाणी लावत/ एवढेच काय काही ना काही खात राहून जागे राहायचा प्रयत्न करीत असे आणि झोप तत्परतेने ते हाणून पाडत असे. मग आईचा ओरडा……:D
  मात्र माझ्या लेकाच्या जन्मानंतरची अडीच वर्षे सलग दोन तास झोप म्हणजे दुर्मिळ प्रकार झाला होता.
  पोस्ट आवडली.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: