गेले बरेच दिवस हे चालु आहे


गेले बरेच दिवस हे चालु आहे. सकाळी सकाळी पेपर उघडला की दोनच प्रकारच्या बातम्या. पाकिस्तानात कोणी न कोणीतरी धुमाकुळ घातलेला असतो. किंवा बीजेपी-सेना , कांग्रेस-राष्ट्रवादी, इत्यादि इत्यादि जगावाटपा वरून भांडत असतात. दुसर काही नाहीच. अशावेळी मला माझ्या लहानपणीची मासिक आठवतात. ‘चम्पक’, ‘चांदोबा’,’किशोर’…
आज काल ती आणून वाचाविशी वाटतात.  किंवा मग टुकार फ़िल्मी मासिक. filmfare, मायापुरी, चंदेरी वगैरे. काहीच नाही तर मिड-डे, बॉम्बे टाईम्स वगैरे सुद्धा बरी वाटायला लागतात.

एक बाकी बघितलत का? निवडणुक जवळ आल्यानंतर सग्ळे पक्ष जनतेचे पश्न कसे विसरून गेले ते? 

“दहशतवाद? कोण तो?
ताजवर हल्ला? असल्या छोट्या मोठ्या घटना व्ह्याय्च्याच.
आर्थिक संकट? तुम्हाला न प्रत्येक छोट्या मोठ्या प्रॉब्लम चा बाऊ करायची सवय लागलेली आहे.

इकडे आमच्या समोर किती मोठे प्रश्न आहेत माहित आहे?
आणि आम्ही हे सगळ आमच्यासाठी थोडाच करतोय? तुमच्या भल्यासाठीच चाललय हे सगळ.  तुम्हाला एक चांगला नेता मिळावा, दारीद्र्यात आणि दुःखात खितपत पडलेल्या तुम्हा क्षुद्र पापी जिवांचा उद्धार करणारा तारणहार मिळावा म्हणुन चाललय हा खटाटोप. 
शेवटी ही लोकशाही आहे. हा काय पाकिस्तान आहे का? एकमेकांच्या जिवावर उठायला? हे सग्ळे प्रयत्न सग्ल्यान्ना बरोबर घेवून न भान्डता राज्यकारभार करता यावा म्हणुन आहेत. नाहीतर तुम्हीच म्हणाल की या राजकीय पक्षांना फ़क्त एकमेकांची उणी दूणी काढता येतात. शेवटी आपली संस्कृती काय शिकवते आपल्याला? सगळ्यांना सांभाळून घ्या. त्यातच सगळ्यांचा फायदा आहे. एक तीळ सात जण वाटुन खातात ही आपली संस्कृती. आम्ही सुद्धा सगळे वाटुन खाय्च्याच मागे आहोत. तुम्ही मात्र आम्हाला आप्पलपोटे ठरवून मोकळे झालात…शेवटी तत्वांचा झगडा असला तरी तत्व ही काही जीवंत माणसांपेक्षा मोठी आहेत का?”

मी आपली अशावेळी बॉम्बे टाईम्स सारखा पेपर उघडून आणि मेंदू बंद करून बसते.

Advertisements
  • ngadre
  • मार्च 13th, 2009

  क्या बात है..
  ए.. संध्यानंद वाच.. खूप शांत वाटेल..

 1. hey, nice attemp.

  • ngadre
  • मार्च 15th, 2009

  when I used to live in Pune for job, sandhyanand was famous in timepass groups. It never gives news that are around your city and matter. It used to have headlines like, Boston university study shows that smoking increases the lifespan or cow delivers baby with two heads..and yeah..goats heart transplanted yasasviritya in a man in Norway etc etc. Dokyala taap nahi. Aso..

  • milindarolkar
  • मार्च 16th, 2009

  किती सोपा उपाय शोधलात….प्रश्नांची उत्तरं आपल्यापुरती सोपी केली की आपली जबाबदारी संपते…पण प्रश्न मात्र तसेच राहातात.

  कठीण प्रश्नांची उत्तरं कधीच सोपी short term नसतात…असं मला वाटतं….त्यात संध्यानंद वाचणं कित्ती सोप्पंय!

  आपण आपल्या देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या बद्दल “दे दी हमें आजादी बिना खद्ग बिना ढाल…..” या खोट्या, दिखाऊ आणि लाचार प्रतिमेला स्वीकार्ल्यामुळे हजारो देशभक्तांनी प्राणाची बाजी लाऊन जे स्वातंत्र्य मिळवलं त्याबद्द्ल अनभिद्न्य आहोत. त्यामुळे आज देशासाठी जगण्याची सर्वाधिक आवश्यकता असताना शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड खूपसून बसतो किंवा आपली जबाब्दारी न मानता…..संध्यानंद वाचण्याचा पर्याय स्वीकारतो….

  सद्यस्थिती मुळे जरा निराशा येणं स्वाभाविक असलं तरी आपली लोकशाही सकारात्मकतेने जपणे ही आजची गरज आहे.

  व्यक्तिगत मत…कोणाला उद्देशून नाही….

 2. Namaskar Milind,
  Paristhiti paasun door palnyashi mi suddha sahmat naahi.
  Aani paristhitimule nirash dekhil jhaleli naahi. He uprodhik lihinyach karan hech ki itke mothe prashn dehsasamor astaan suddha sattechya rajkaranat aaple nete (jyanna nete banwanyat aaplahi tevdhach sahbhag aahe) kiti aandhle jhalele aahet, kiti chikhalat utarlele ahet he baghun waait watate, laaj hi watate. media dekhil mahtwache prashn sodun ya saglyala prasiddhi det raahte. kaahi welela te mahtwache suddha aste karan tyamulech asha netyancha chehra samor yeto. pan aapan aapla wel kharch karun tyanchya baddal waachawe itkihi tyanchi laayki aahe ase mala watat naahi.

  • milindarolkar
  • मार्च 16th, 2009

  Comment लिहून झाल्यावर मला वाट्लं की उगाच प्रतिक्रिया दिली. कारण गैर समज होऊ नये असं वाटंत होतं. पण आपण योग्य तो भाव समजून घेतलात याबद्दल धन्यवाद!

  काय झालंय…आपल्या देशात सध्या, specific म्हणायचं तर २६/११ च्या हल्ल्यानंतर राजकीय नेते, पक्ष, निवडणुका यांच्याबद्दल अविश्वासाचं पीकंच आलंय…किंवा आणण्यात आलंय. राजकीय नेता हा कोण्त्यातरी वेगळ्या ग्रहावरचा प्राणी असून तोच देशाच्या दुर्दशेला जबाब्दार आहे असं अनुमान सर्वत्र ऐकायला मिळत आहे. यात वास्तव किती आहे?

  पण केवळ बाहेरून शिव्या घालून प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी काही प्रयत्न आतून व्हायला हवेत. माझ्या ब्लॉगवर अजून्ही जनतंत्र २००९ या आम्ही केलेल्या उपक्रमाचं पोस्टर आहे. तो एक लोकशाही कडे समाजाने सकारात्मकतेने पाहावे, आपले प्रतिनिधित्व करणारे राजकीय पक्ष व आपण यांत संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न होता.

  १९४७ साली आपल्याला स्वराज्य मिळाले पण त्याचे सुराज्य करण्याचे आपण विसरून गेलोय. त्याअर्थाने लोकशाहीतील प्रक्रियांबद्दल आपण अधिक सजग आणि सक्रीय होण्याची खरी वेळ आली आहे असे मला वाटते.

  पण हे सर्व लिहावंसं वाटलं याला कारण आपण लिहिलेला मूळ पोस्ट…तो छानंच आहे…अभिनंदन आणि धन्यवाद…

 3. Thanks. Majhya dusrya blog var mi 26/11 nantar hyach baddal lihile hote. wel milala tar jaroor wacha. mi-sonal.blogspot.com var. January mahinyachya posts madhe asel bahuda.

 4. Link ikde det aahe.

  http://mi-sonal.blogspot.com/2008/12/aswasth.html

  jamlyas abhipray kalwa.
  dhanywad.

  • ngadre
  • मार्च 17th, 2009

  Aho..kharach sandhyanand roj nahi vaachat ho. Sonal chya tya velchya mood la halka karayala halki fulki comment keli..aho aj khoop varshani sandhyanand che ek paan localmadhalya shejaryache chorun vaachale.. Jagaatlya sarvaat mothya bun paavachi baatmi hoti. 42 kilo cha bun pav..

 5. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4273204.cms

  Changla lekh aahe mata madhe. jarur wacha.

  • अरुण
  • मार्च 25th, 2009

  Mendu Band karun ghene hi kala chanach aahe mhanaychi. Mazhya shabda koshat shich ek kala aahe. Mi ty goshti la swich off karun gheto. aani toch prakar mansa sathi suddha. Hava tevha aani hava tevdha vapar — Bass.
  Shevati takau kahich nasta ga. Kiti aani kuthe vapraycha he kalala ki saglyachach aanand gheta yeto, khara na?

 6. Agadi khar..ekdamperfect principal.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: