विनाश आणि उत्पत्ति


काल आणि आज दोन परस्पर विरोधी बातम्या वाचण्यात आल्या.
पहिली बातमी: इस्त्रो च्या शास्त्रद्न्यांनी अंतराळामधल्या काही महत्वाच्या जिवाणूंचा शोध लावला. प्राध्यापक जयंत नारळीकर यांचा या संशोधनात प्रमुख वाटा आहे.  हा शोध महत्वाचा असण्याच कारण म्हणजे या मुळे पृथ्वी वरच्या जीव सृष्टीच्या उत्पत्तिवर प्रकाश पडेल. पृथ्वी च्या वातावरणा बाहेरच्या थरातून हे जीवाणु सापडले असून त्याचे नमूने इकडच्या जिव सृष्टीशी साधर्म्य दाखवतात.
दूसरी बातमी: सियाचिनची हिमनदी ध्रुवेतर भागामधली जगातील दुसर्या क्रमांकाची हिमनदी आहे. ती आक्रसत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.  ही global warming ची म्हणजेच पर्यायाने माणसाच्या उप्द्व्यापंची देणगी आहे. जगभरातील तापमान वाढण्याबद्दल गेल्या काही वर्षात बरेच लिहिले वाचले गेलेले आहे. माणसाची हाव न थांबल्यास उत्तर ध्रुव उन्हाळ्यात बर्फ विरहीत होण्यपासुन, ते समुद्रनाजीक ची महत्वाची शहरे बुड्ण्यपर्यन्त, आणि जगभरातील हवामानाची चक्र उलटी फिर्न्यापर्यंत अनेक परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. 
निसर्गाच्या चक्रा प्रमाणे, हिमयुग हे पुन्हा अवतरेलच. पण त्याची गति वाढवण्यास सम्पूर्ण मानवजात हिरीरीने हातभार लावते आहे. 

या दोन्ही बातम्यातील विरोधाभास पाहून माणसाच्या बुद्धीच्या व्याप्तिच्या आणि विचारातील भिन्नातेच्या कक्षा फार वेगळ्या स्वरूपात दिसतात.
एकीकडे जगाच्या उत्पत्ति च शोध लावण्यासाठी माणूस आपली सगळी शक्ति पणाला लावतो आहे. याच ध्यासाने मानाव्जातिची उत्क्रांति घडवून आणली. दूसरी कड़े तोच ध्यास जेवा अतीरेकी रूप धारण करू लागला तेव्हा त्यातच जगाच्या विनाशाची बीजे रोवली गेली.

आज जरी information age असल तरीही तय information च योग्य वापर होण जास्त महत्वाच आहे. पर्यावरणाच्या, global warming च्या, इंधन तुटवाड्याच्या प्रश्नांची माहिती बहुतेक सगळ्याच देशातील सुशिक्षित  जनतेला आहे. पण त्यासाठी आपला खारीचा वाटा उचलण्याची मानसिक तयारी अजुन होताना दिसत नाही. अजुनही आपल्या हयातीत तर प्रलय होणार नाही न , मग कशाला जगाची चिंता वहा..हा प्रवाह मोठ्या प्रमाणावर आहे.
स्वतःच्या घरापासून सुरवात करता येणार असली तरी तेव्ह्ढ्याशाने काय होणार असे म्हणत प्रत्येक जण दार बंद करून घेताना दिसतो. मग ती कृति अनावश्यक दिवे बंद करण्याइतकी छोटी (?) का असेना.
अजुनही नवनवीन शोध लावण्याची उर्मी माणसाला स्वस्थ बसून देत नाही. हे चांगले लक्षण आहे. पण त्या उर्मीला न्याय देताना जी उपकरणे, तन्त्रद्यान लागते ते निर्माण करताना देखिल फार प्रचंड प्रमाणावर इंधन खर्च होत,  घातक वायु, रसायन सोडली जातात, electronic आणि nuclear कचार्याची निर्मिती होते.
या बाबतीत सगळ्यांचाच approach ‘सो चूहे खाके बिल्ली चली हज को’ असा असलेला दिसतो.

विनाश आणि उत्पत्ति हे चक्र जरी  नैसर्गिक असल तरी ते नैसर्गिक क्रमाने होणेच चांगले. आज विनाशाची गाती मानवजात आपल्या हातानेच वाढवते आहे. आपण काय करू शकतो? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारणे आज गरजेचे आहे. नाहीतर आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण केवळ एक समस्यांनी ग्रासलेल जग द्यायची तयारी करतो आहोत हे निश्चित.

Advertisements
 1. हिमयुग आलं किंवा सगळीकडे वाळवंट झालं तरी पृथ्वीला काहीच फरक पडत नाही..
  त्या त्या प्रकारची इकोसिस्टीम डेव्हलप होते आणि शिल्लक रहातेच..
  निसर्गाला काय ?? हिरव्यागार झाडीऐवजी कोरडं वाळवंट..

  त्याला सर्व पंचमहाभूतं सारखीच..

  मरणार आहोत ते आपण .. माणसं… !!

  आणि हेच आपल्याला कळत नाही..

  गीदड़ की जब मौत आती है.. ….. …!!!

  तसंच..

 2. ग्रिन हाउस इफेक्ट साठी केवळ थर्ड वर्ल्ड कंट्रिज ला दोषी धरलं जातं … कोणिच ऍनलाइझ करण्याचा प्रयत्न करित नाही.. कारण प्रॉपर ऍनॅलिसिस केलं तर वेस्टर्न वर्ल्डच रिस्पॉन्सिबल आहे असं दिसुन येइल.

 3. Completely agree to both of you.
  in fact I am planning to make a list of small things that we can do at a personal level in our day to day lives that can impact environment positively.
  I will be posting the first list today. I request you to circulate it and keep adding to it.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: