भैय्या १०० का छुट्टा मिलेगा?


“भैय्या १०० का छुट्टा मिलेगा?”, हा प्रश्न विचारण्याची पाळी माझ्यावर बर्याचदा येते. कारण अनेक आहेत. सगळ्यात महत्वाच म्हणजे रिक्शा च व्यसन. आज काल घरी लवकर पोचणे किंवा वेळ वाचणे हे पैसे वाचवण्यापेक्षा महत्वाचे झालेले आहे. लवकरात लवकर माझ्या छकुली जवळ पोचण्याच एकमेव उद्दिष्ट माझ्या डोळ्यासमोर असत. पण व्यसन अशासाठी म्हटल कारण जेव्हा कुठलीही जबाबदारी नव्हती तेव्हा सुद्धा बस साठी थांबण्याचे patience नसणे, ट्रेन मधली गर्दी नकोशी होणे, निवांत गप्पा मारत घरी जाता येणे, तसेच जास्तीत जास्त वेळ टाइम पास करून मग घरी जायची घाई असणे (म्हणजे प्रवासाचा वेळ टाइम पास साठी वापरणे) अशी बरीच कारण होती. त्यातही डेक वाली रिक्शा शोधने हा आवडीचा छंद. मग तय रिक्षताल्या डेक ची audio quality, रिक्षावाल्या कड़े असणार्या cassets, त्यात त्याला आपल्या आवडीची गाणी लावायला सांगणे हे असे उद्योग असायचे. कधी कधी तर स्वतःच्या आवडीची कैसेट बरोबर सुद्धा ठेवायचे. त्या-त्या वेळची hit songs जाणुन घ्यायची असतील तर M-tv count down न बघता वेगवेगळ्या एरिया मधल्या फ़िल्मी रिक्शांमधुन प्रवास करावा.

गोविंदा हिट्स रिक्षवाल्यांची favorite. तसच जीतेन्द्र आणि श्रीदेवी चे जे टिपिकल टाइप चे पिक्चर एक काळात जोमात होते (थोड़े साउथ इंडियन छाप, ता थैय्या ता थैय्या ओ ओ टाइप ची गाणी) ते, किंवा नादिम श्रवण टाइप ची कुमार सानु च्या असह्य ‘घसा कम नाक’ आशा कुठल्यातरी अवायावातुं आवाज काढलेली आणि अनुराधा पोडवाल किंवा कविता कृष्णमुर्ती किंवा तत्सम गायिकेचा आधार घेत उभी केलेली, घासून गुळगुळीत झालेल्या समीर च्या lyrics ची गाणी यांची आवडती. (ठरलेली यमक…यार-प्यार, अपने-सपने, इकरार-इनकार, दिल दे-दिल ले, सनम-कसम, खफा-वफा वगैरे वगैरे. Templates ready असायची. जर गाळलेल्या जागा भरा किंवा कवितेची ओळ पूर्ण करा अशी स्पर्धा ठेवली असेल तर या गाण्यांचा अभ्यास नक्की करावा.)

‘तुम तो ठहेरे परदेसी” हे तर एक काळात हे रिक्षाव्वाले देवाच्या भक्तिने एइकाय्चे. नंतर त्याची जागा हिमेश रेश्मैय्या ने घेतली. या दोघांइतके इतर कोणी रिक्षावाल्यांना प्रिय नसेल, दैवतच जणू. नन्तर काही महीने सलमान खान च ‘तेरे नाम..’ प्रत्येक रिक्शा मधे वाजत होत. मी तर रिक्शा पकडण्या आधीच खात्री करून घेत असे. सद्ध्या ऑटो-रिक्शा hit कुठ्ल आहे त्याची फारशी कल्पना नाही. हल्ली तशा प्रकारची रिक्शा बर्याच दिवसात पकाडलेली नाही. हार्न च्या आवाजात गाणी एइक्णे दूर, स्वतःचा आवाज देखिल एइकू येत नाही. बर डेक वाली रिक्शा पकडायची तर survey आलाच. त्याला जरा वेळ लागतो…

बर मला लिहायच होत वेगळच. मला खर तर सुट्ट्या पैशांच्या प्रॉब्लम बद्दल लिहायच होत. पण ते राहील बाजूला आणि मी काहीतरी वेगळच सांगत बसले. तर होत अस की सुट्टे पैसे जवळ नसणे हा प्रॉब्लम फार common आहे. पण मला या बाबतीत फार कटु अनुभव आलेत गेल्या काही दिवसात. मागच्या महिन्यात, मी सीप्ज़ जवळ रिक्शा थांबवून उतरले. माझ्याजवल सुट्टे नव्हते. रिक्शावाल्याकडे सुद्धा नव्हते हे ओघाने आलाच नाहीतर प्रॉब्लम कशाला आला असता? बर तिकडे आस पास दुकान वगैरे पण नव्हती. इतर काही रिक्षावाल्यांना विचारून बघितल. कोणीच द्यायला तैयार नाही. मग मी हळू हळू सीप्ज़ च्या गेट मधून बाहेर येणार्या मुलींना (सो कॉल्ड IT professionals with fat salaries) विचारायला सुरुवात केलि. जवळ जवळ २५ मुलींना विचारल असेल. पण एकीनेही पाकिट उघडून बघण्याचे देखिल कष्ट घेतले नाहित हो. काहींनी तर माझाकडे पाहिल सुद्धा नाही. तशी मी दिसते बरी. चांगल्या घरातली वगैरे. माझ्यापासून कोणाला धोका वगैरे असण्याचा काही संभव नाही. मग?

असाच झाल काल सुद्धा. सुट्टे नव्हते म्हणुन मी दुकानात गेले जवळ्च्या. बर दूकान कशी तर फार उत्तम चालणारी. tobleron सारखी chocolates विकणारी, chemist वगैरे अशी. पण एकाहिकडे सुट्टे पैसे नसावेत? तेहि १०० चे? कास शक्य आहे? हा अविश्वास नाही. माझ्याकडे जसे एखादे वेळी नसतात तसे इतरांकडे नसू शकतात. पण एकाच वेळी सगळ्यान्कडे नसावेत? प्रश्न पडायच कारण हे की थोड फार face reading मला सुद्धा येत हो. खरोखर मनापासून मदत करायची इच्छा असुनही मदत करता न येणारा चेहरा वाचता येतो. आणि दार बंद करून, मदतीची कुवत असून मदत करण्याची इच्छा नसणार्या माणसांचा चेहरा सुद्धा बोलतो. मनाचा तो कोतेपणा अस्वस्थ करतो. बदल्यात कही मिळत असेल तरच मदत करायची का? मग ती मदत तरी कशी म्हणायची? अनोळखि माणसाकडे नेहमी संशायानेच बघायला हव का? चेहर्यावर अत्यंत तुच्छ भाव ठेवून, जेव्हा एखाद्या साध्या गोष्टीसाठी सुद्धा मानस हात पुढे करत नाहित न तेव्हा खुप त्रास होतो. फार काही मोठ नसतो करत आपण. एखाद हास्य, एखादी छोटी कृति, समाधान शिवाय काहीही जास्त देवू न शकणारी, जर कधी केली तर काय झिजत आपल? असे का होत चालोय आपण? फ़क्त स्वतः पुरते. हिशोबी. दगडाची ह्रदय घेउन, मन बंद करुन जगणारे? पैशाने हे समाधान सुद्धा विकत घेता का? हा माणसा माणसां मधला ओलावा मॉल मधे कधी मिळायला लागणार? म्हणजे कुठल्या brand चा विकत घ्यायचा, के पे एक फ्री आहे का वगैरे सुद्धा बघून घेता येइल. ही अतिशयोक्ति वाटेल पण जेव्हा रस्त्यावरचा फ़ळवाला चार ठिकाणी फिरून माझ्या साठी सुट्टे शोधतो (तेहि मी काही खरेदी केलेले नसतान), तेव्हा चकचकीत कपडे घातलेल्या, हातात ब्लूटूथ मोबाइल खेलवणारया, मक्ख चेहर्याच्या आणि मक्ख मन्नाच्या लोकांच्या बाबतीत मला पडणारे प्रश्न अधिकच गहिरे होतात.

Advertisements
    • ngadre
    • मार्च 19th, 2009

    saanunaasik avaj ha shabd khaas kumar sanu saathi banavalyasaarkha vatato na?
    Aani ae.. Sutte navhate tar ekhade Toblerone ghyayacha na..kinva Ferrero Rocher.. Oh my god. I can kill for it..

  1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: