तो तिला म्हणाला


तो तिला म्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे”
ती म्हणाली “पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे

तो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर॥”
ती म्हणाली ” आई रागावतील, दूध उतू गेल तर॥

“ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ”
पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ

“बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू”
नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू

“तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट”
बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट

आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
एइकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस

सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़की आडून

दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना

नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।

तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
रागावलास न माझ्यावर?” आणि तो विरघळला।

“थोडासा…” त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली “बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग

“माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल
अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस…
तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?”

बोललास हेच पुरे झाल..एकच फ़क्त विसरलास…
माप ओलांडून आले होते, मी-तू पण तेव्हाच गळलं
माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं?”

Advertisements
  • gnachiket
  • मार्च 24th, 2009

  kiti chhaan..kuthe asate ka kharach ashi god patni?

  • Mi, Sonal
  • मार्च 24th, 2009

  sagle nawre saarkhech…kunala meli kimtach naahi.

  • अरुण
  • मार्च 25th, 2009

  barayach kavita vachlya tuzhya , pan hi pahili ultimate aahe. khrach chaan aahe. Aaplyat krushna commom aahech.

  • gnachiket
  • मार्च 26th, 2009

  🙂 🙂 🙂

  • Maithili
  • मार्च 28th, 2009

  Altimate aahe kavita. jam chhan

  • Mi, Sonal
  • एप्रिल 15th, 2009

  Thanks everyone for the encouraging responses. 🙂

  • मी बिपिन.
  • एप्रिल 29th, 2009

  ultimate…. apan fan jhaalo !!!

  • Prabhas
  • मे 10th, 2009

  apratim!! navara-bayko madhale khare naate ekadumch chhan dakhavale aahe kavitemadhe. 🙂 hech khare pati-patni. http://my.opera.com/prabhas

  • Lokesh
  • जून 15th, 2009

  खुप छान कवीता आहे अगदी काळजात रुतली

  • Mi, Sonal
  • जून 15th, 2009

  Thanks Prabha, Thanks lokesh, Bipin. 🙂

  • shardul
  • जुलै 13th, 2009

  ही कविता तुमच्या नावाशिवाय(च) सगळीकडे ई-मेल मधून फिरते आहे..कुणीतरी एका छान चित्राच्या पार्श्वभूमीवर लिहिली (/उतरवली) आहे..

  • Mi, Sonal
  • जुलै 15th, 2009

  🙂 kharach? mala pathawal ka ti?

  • nandu0508
  • सप्टेंबर 16th, 2009

  itke chhane lihites aani mhane fakt don themb shaaeeche…

  • madhukarjadhav
  • जुलै 19th, 2013

  atisundar!!!!!!!!! bhavi bayokosathi japun thevat ahe! fb var pahili ani kavitakarch nav shodhavs vathal.

 1. फेस बुक वर तुझ्या नावाशिवाय प्रसिद्ध झालेली आहे ही कविता.https://www.facebook.com/pages/Time-Pass-Katta/317991068253736?hc_location=stream

  • gayatri r. sonawane
  • ऑगस्ट 19th, 2013

  khup sunder kavita aahe

  • piya
  • ऑगस्ट 19th, 2013

  its true…..

  • sonalw
  • नोव्हेंबर 27th, 2013

  @madhukarjadhav
  Thanks Madhukar. Thank you Piya, Gayatri.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: