जस आहे तस्


“अग मुग्धाचा मुलगा काय मस्ती करतो! अजिबात ऐकत नाही कोणाच…” आजीबाई / काकू no. १
“होय हो. अश्विनिचा मुलगा सुद्धा. भीतीच नाही हो कसली त्याला..” आजीबाई / काकू no. २
“पण सांगू का..हल्लीची ही पिढिच जरा आगावू आहे. म्हणजे सगळिच पोर हो. मुलिसुद्धा..काही कळत नाही.” आजीबाई / काकू no. १
“मी म्हटल सुद्धा अश्विनिला की बघ बाई कुंडली दाखवून घे..काही शांत वगैरे करायला हवी का विचार.” आजीबाई / काकू no. २

प्रत्येक घरात जिथे २ ते ७ वयोगटातलं मूल आहे (मुलगा / मुलगी) तिथे हे dialogs कोणा न कोणाच्या मुखातून देव वदवून घेत असतो असा माझा अनुभव आहे. प्रत्येक आजी/काकू/आत्या टाइप च्या या अवताराला (देवाच्या) आपल्या घरातला दिवा / दिवटी जगातली सगळ्यात द्वाड वाटत असते. त्यात सुद्धा सुप्त असूया असते. आपलीच केस कशी unique आहे हे पटवून देण्याची अहमहमिका लागलेली असते.

But imagine. ही पोर मस्ती नाही करणार तर कोण? imagine करा की 4 वर्षाच पोर सकाळी ६ वाजता उठून दात घासून, “कराग्रे वास्ते लक्ष्मी …” वगैरे म्हणुन, शी शी वगैरे करून, शहण्यसारख अभ्यासाला बसलय ( a b c d jack n jill etc. घोकत ). घरात अजिबात गडबड मस्ती नाहिये. सांगितलेल सगळ एइकतय. त्याच्या वयाची चार पोर मिळून अगदी शांतपणे एक कोपर्यात अटक मटक किंवा तत्सम अनुपद्रावी खेळ खेळतायत….

शीईईई काय बोरिंग लिहीतेय मी. अशी असतात का मूल?

बर “अत्तिशय हुशार आहे डोक्याने..” हे सांगायला त्या आजी/काकू/आई विसरत नाहित. अजुन २० वर्षांनी या देशात भरभरून बिल गेट्स आणि विश्वनाथ आनद असणार या बद्दल मला जराही शंका वाटत नाही.

आजवर कुठलीही आई किंवा आजी हे म्हणताना मी ऐकली नाही ” आमचा बंड्या मद्दड आहे अभ्यासात. बुद्धिच मूळात कमी आहे. पण स्पोर्ट्स मधे अव्वल आहे….” नाही. इतक प्रांजल स्पष्टीकरण?
” आहे अतिशय हुशार हो. पण एक जागी बसताच नाही. Concentration चा प्रॉब्लम आहे. सगळ लक्ष खेळात. केला न नीट अभ्यास तर कुठल्या कुठे जाइल…”
अरे कशाला पांघरुण घालता?
कबूल करा न की अभ्यासाची गोडी नाही त्याला. त्याच डोक अमुक अमुक प्रकारात चालत. त्यात त्याचा हात धरून दाखवा हिम्मत असेल तर…

आणि हाच प्रकार अति शांत मुलांच्या आया वगैरे पण करतात..”काही नाही..तुमच्या समोर शांत आहे. खुप मस्ती करतो. घरी येवून बघा…” , “तुम्ही गेल्यावर इतकी बडबड केलि..पण समोर बोलणार नाही. त्या दिवशी काय झाल होत काय माहीत, इतका शांत नसतोच कधी..”
अरे का पण? म्हणा न की हो बाबा आहे आमच पोर स्वभावाने शांत. आमच्या डोक्याला त्रास कमी.
पण नाही.

समूहाचा भाग बनायाच असेल तर आपल सगळ त्यांच्या सारखाच असायला हव हा अलिखित नियम सगळी पाळत असतात. अरे पण हे लक्षात घ्या न की वेगळे पण सिद्ध करण्याच्या नादात तुम्हीच त्याला कळपात फिट करू पाहताय. ओळखा आणि मान्य करा त्याच वेगळेपण खर्या अर्थाने.. जस आहे तस्. मग बघा काय मजा येते ते.
Let them just be…

Advertisements
  • ngadre
  • मार्च 26th, 2009

  बच्चों के छोटे हाथों को चाँद सितारे छूने दो..
  चार किताबें पढ़कर ये भी हम जैसे हो जायेंगे..
  – निदा फ़ाजली

  • Maithili
  • मार्च 26th, 2009

  Chhan lihita tumhi. pahilyandach vaachtey tumcha blog. changale aahe.

 1. Thanks Maithili.
  Ek request karu ka? mala ‘tu’ mhana. ‘tumhi’ nako. ugich antar wadhat.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: