मराठी?


रविवारी मटा सन्मान पुरस्कार पाहिले. कोणीतरी फडनिस आणि मुग्धा गोडसे हिला सन्मानाने पुरस्कृत केल गेल.
या दोघी स्टेज वर येवून कस बस मराठी बोलल्या आणि सवयी प्रमाणे इंग्रजीचा आधार घेत त्यांनी आपल आभार प्रदर्शन पूर्ण केल. ही किंवा अशी मंडळी जेव्हा हिंदीत झेंडे गाडून अशा कार्यक्रमाला येतात तेव्हा कधी तोडक्या मोडक्या आणि कधी अस्खलित मराठीत बोलतात. याच प्रेक्षकांना कोण कौतुक असत? का? मातृभाषा आहे त्यांची. अस काय मोठ केले त्यांनी मराठीत बोलून? बोलणार्यांच्या चेहर्यावर उपकार केल्याचे भाव आणि एइकणर्यच्या चेहर्यावर उपकृत झाल्याचे. कशाला?
का देता असले पुरस्कार? का पेक्षा कोणाला देता? ज्या व्यक्ति मराठी बोलू शकत नाहित? किंवा मराठी असून ज्याना ती आपली भाषा वाटत नाही त्यांना? किंवा कितीही छोटी किंवा मोठी भूमिका असली तरी चालेल पण हिंदी चित्रपट स्रुष्टित प्रवेश झाला की ती व्यक्ति कौतुकास पात्र आहे अस समजायाच? कर्तुत्वाची व्याख्या काय? आज त्यांनी भूमिका केलेले चित्रपट जर पडले असते तरी त्यांना पुरस्कार मिळाले असते? लोकप्रियता आणि कर्तुत्वा यांचा एकमेकाशी सम्बन्ध आहे पण ते सामान अर्थी शब्द नव्हेत. असे अनेक कर्तुत्ववान आहेत जे आज महाराष्ट्राच्या हिता साठी झटत आहेत. पण ते लोकप्रिय नाहित. त्यांना मटा ओळखत नाही? ही हिंदी चित्रपट सृष्टि ची गुलाम गिरी कधी संपणार? आपली किंमत आपल्याला कधी कळ्नार? जगभरात प्रत्येक क्षेत्रात कर्तुत्वा गाजवणारी मराठी माणस आज कितीतरी आहेत. मला त्यांचा रास्त अभिमान आहे. पण मग हिंदी चित्रपट हा निकष इतका महत्वाचा का आहे? मटा सारखी जबाबदार वृत्तपत्रे देखिल जेव्हा अशा उथळ विचारंच दर्शन घडवतात तेव्हा वाईट वाटत.

ज्या स्टेज वर प्रकाश आणि मंदा आमटे अत्यंत साधेपणाने आपल्या असामान्य कर्तुत्वासाठी पुरस्कृत केले जातात (ते सुद्धा त्यांना मग्सेसे मिळल्य नंतर..तो पर्यंत दुर्लाक्षितच) त्या स्टेज वर जेव्हा अशा उथळ निकषांवर आधारीत लोकांचा गौरव करण्यात येतो तेव्हा अस्वस्थ झाल्या शिवाय राहवत नाही.

Advertisements
  • ngadre
  • मार्च 31st, 2009

  utkrusht..
  agadi manaatala bolalees..
  Nothing against other languages..
  Pan marathichi laaj vatana he matr atyant lajirvana…

 1. मराठी माणसाला जो पर्यंत इतर भाषीक ऍक्नॉलेज करित नाहीत, तो पर्यंत ते पण करित नाहीत.

  खरं तर बरेच असे लोक आहेत मराठी , की जे १००टक्के योगदान देत आहेत बऱ्याच गोष्टींसाठी, पण केवळ मिडीया सॅव्ही नसल्य़ामुळे त्यांना ऍक्नॉलेज केलं जात नाही.

 2. हिंदी सिनेमामधे मग ते नोकराचे का होइना पण काम मिळाले तरिही लक्ष्मिकांत ब्रेर्डे सारख्या नटाला कृत कृत्य वाटते. तशीच अवस्था अशोक सराफची पण आहे.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: