काही माणसं भिजतच नाहित…


काही माणसं भिजतच नाहित
भिजली नाहित तर रूजणार कशी?
रूजली नाहित तर फुलणार कशी?

झाडं यांच्या दारातली धुळिने माखलेली
अंगणामधली माती सुक्या गवताखाली झाकलेली
दव जरा पिवून घ्या
अंग जरा धुवून घ्या
बघा कशी दिसतात पानं न्हावू माखू घातल्यावर,
कसं घर दरवळतं माती दवात न्हाल्यावर,

आठवतय का चार-चौघात कधी मोठ्याने हसला होतात?
सगळी काम गुन्डाळून मँच बघत बसला होतात..
कधी पाहिले बायकोसोबत फोटो आपल्या लग्नातले?
बातम्या सोडून वाचले होतेत चुटके फ़क्त पेपरातले?

खाल्लं होतं शेवटचं कणिस केव्हा पावसातलं?
झाडावरच्या कैर्या पाडणं उन्हाळ्याच्या दिवसातलं…
पहिला पाऊस आला की तुम्ही छत्री बाहेर काढता
पारा ज़रा खाली गेला की अंगावरती पांघरूण ओढ़ता
ज़रा झेला पाऊसधारा
श्वासात भरा गार वारा
बघा कसं वाटत ते कोशाबाहेर आल्यावर
फुलपाखराचे रंग दिसतील आयुष्याच्या पंखावर

न जगण्याची कारणं तुम्हाला किती किती सापडली
मनासारखं जगताना मात्र तुमची मनं आखड्ली
मनाभोवती घालून घेतल्यात असंख्य तुम्ही बेड्या
कडीकुलुपात कोंडून ठेवल्यात सगळ्या इच्छा वेड्या
लावून ठेवलीत पाटी बाहेर धोक्याच्या चिन्हाची
देत राहिलात जंत्री स्वतःलाच न जगण्याच्या कारणांची
कधी म्हणे ‘कर्तव्य’ कधी म्हणे ‘समाज’
आणि कधी ‘पाप’ म्हणत दाबुन टाकलात आवाज

उशीर कधीच होत नसतो चांगल्या गोष्टी घडायला
मनातल्या बेड्या तोडायला,
मनावर जीव जडायला,
एव्हढ नक्की समजून घ्या
चिम्ब चिम्ब भिजून घ्या

का कुणास ठावूक,
काही माणसं भिजतच नाहित…

Advertisements
  • Yogesh
  • एप्रिल 16th, 2009

  मस्त आवडली कविता …. काही माणस तर मेणाची असतात त्याना भिजून पण काही फायदा होत नाही.

  • Mi, Sonal
  • एप्रिल 17th, 2009

  Thanks Yogesh,

  • Nikhil
  • एप्रिल 21st, 2009

  Khup bhari!!!Ashi manasa pahanyat ahet, ekdam hasu ala.Kavita farach chhan ahe 🙂

  • Mi, Sonal
  • एप्रिल 27th, 2009

  Thanks Yogesh, Thanks Nikhil. 🙂

  • Pravin
  • जून 19th, 2009

  ek number.. Mastch aahe kavita 🙂

  • a Sane man
  • जुलै 14th, 2009

  पाडगावकरछाप झाल्या. आवडली! 🙂

  • vaishali
  • मार्च 28th, 2011

  So true 🙂 Nice!

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: