अपूर्णांक


तसं माझं आणि गणिताचं कधीच जमलं नाही. देवाच्या कृपेने बरी बुद्धि अस्ल्यामुळे निभाव लागला. पण गणिताची गोडी अजिबात नव्हती. खरं तर आजही नाही. त्यातुनही अपूर्णांक हा विषय फार वैताग द्यायचा.
जो पर्यंत छेद २ किंवा ४ असतो तोपर्यन्ताच मी comfortable असते. म्हणजे १/२, १/४, २/४, ३/४ एवढंच. इथून पुढे जसा जसा छेद स्थानीचा आकडा वाढत जातो तसा तसा माझा अस्वस्थपणा सुद्धा वाढत जातो.
मग मी आकड्यातून बाहेर पड़ते आणि चित्रात शिरते. मनातल्या मनात एक मोट्ठ वर्तुळ तयार होतं. त्याचे छेदा एव्ह्ढे भाग पडतात. मग त्यातले अंश स्थानाइतके भाग वेगळ्या रंगाचे होतात. …तेव्हा कुठे मला पुस्तक वाल्यांचं म्हणणं कळतं!
पण यातही एक मोठ्ठा प्रोब्लेम आहे. जो पर्यंत छेद स्थानी सम संख्या आहे (equal number) तो पर्यंत वर्तुळाचे भाग पाडणं सोप्प असत. विषम संख्या आली की पुन्हा मग चित्रकलेतून भूमिति मधे शिरावं लागतं.
मग कर्कटक घ्या, कोनमापक घ्या, ते angle मोजा, मग त्याचे विषम भाग करा…त्यातही अपूर्णांक आलेच. मला माझी लाल पिवळी कैमलिन ची कंपाँसपेटी आठवते.

त्यापेक्षा मला परसेंटेज बरे वाटायचे. १०० पैकी किती..सरळ हिशोब.
पण मला कधी कधी अजून एक मज्जा वाटते. आता २५ % म्हणजे १/४, बरोबर? पण २५.५ % असेल तर? किंवा दोन सप्तमांश असतात. पण अडीच सप्तमांश का नसतात?
छे जाम कठिण असतं हे सगळं मनातल्या मनात करणं. कधीतरी करून बघा तुम्ही. त्यासाठी काही अपूर्णांक देते तुम्हाला …३/७, १३/१७, १९/२१… सांगा बर नक्की किती भाग म्हणायचे आहेत ते.. काढा चित्र, करा भाग…

Advertisements
 1. Hey..Great post..

  People are still counting the decimals in pi.. 22/7

  • milindarolkar
  • एप्रिल 16th, 2009

  छान लिहीलंय….मला माझी आणि गणिताची जी झटापट चालायची ती आठवली. आणि गणित सुटलं नाही की सर जी झटापट करायचे…ते ही आठवलं…

 2. Thanks nachiket, thank you milind.
  Milind, tumacha ‘vedya bahinichi vedi hi maya’ post waachal. far aawadal. chaan jamun aalay.

 3. तुमची जी अवस्था आहे तशीच माझीही अवस्था आहे.
  पण तुमचा हा अभिप्राय पाहुण गणिता विषयी जवळीकता निर्माण झाली हे मात्र खरं!

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: