बरेच प्रश्न पडतात रोज…


बरेच प्रश्न पडतात रोज. आज काल जरा जास्तच.
का जगतोय? असे का जगतोय आपण? आयुष्यात कधीतरी निदान काहीतरी अर्थ सापडणार आहे का? किती दिवस, वर्ष, महीने आपण हे अस चाकोरीतलं आयुष्य जगणार आहोत? काहीतरी अर्थ कधीतरी देणार आहोत की नाही? कुठल्यातरी ध्येयाने कधीतरी झपाटून जाणार आहोत की नाही? की आयुष्यभर, आपल घर, मूल, बैंक बैलेंस, आणि दोन वेळच्या जेवणाचे मेनू ठरवत राहणार आहोत?
आयुष्य इतक अळणि कधी झाल? आठवत नाही. पण समाधानाच्या तुटपुंज्या कल्पनांभोवती फिरत असतं आपलं ज्ञगणं. कधी येणार धाडस, त्या झुगारून देण्याचं? कोणी ठरवलं चांगलं काय आणि वाईट काय? कोणीतरी…माहीत नाही. पण आपण मात्र आन्ध्ळेपणाने सगळं स्वीकारून मोकळे!
कोणी ठरवलं ही कामं बायकांची आणि ही पुरुषांची? कोणी ठरवलं चूक आणि बरोबर? काय व्याख्या? आजपर्यंत मलातरी नाही सापडली. समोरचा माणुस जो पर्यंत आपल्या मताने वागत असतो तो पर्यंत तो बरोबर, चांगला. आणि त्याने आपल्या मतापासून फारकत घेतली की तो चुक? मग लगेच निंदा नालस्ती, रुसवे फुगवे, आरोप, मनस्ताप. कधी दुसर्याला, कधी स्वतःला.
का प्रत्येक माणुस आपापल्या जागी नेहमी बरोबरच असतो?
कोण ठरवत की दुसर्याला दुखेल अस वागायाचं नाही? हे सुद्धा सापेक्ष नाही का? नेहमीच दुसर्याच्या अपेक्षा, इच्छा योग्य असतीलच कशावरून? मग अयोग्य असेल तरी न दुखावता वागायाच की योग्य मार्ग निवडायचा? पुन्हा योग्य काय आणि अयोग्य काय हा प्रश्न उरतोच? कोणी ठरवल? ‘समाज’ नावाने आपण ज्याला ओळखतो त्या काही बलाने आणि बुद्धीने जास्त असणार्या समुदायाने? कारण इतिहास जसा नेहमी जेत्यांचा असतो तसाच समाजाचे नियम, चांगल्या वाईटाचे निकष हे देखिल जेतेच ठरवत असतात.
आणि प्रत्येक गोष्ट चुक की बरोबर , योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला दिला कोणी? का अट्टहास सगळंयानी आपल्या कल्पनांना स्वीकारून जगावं हा?
प्रत्येकाने एक मर्यादेनंतर स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्विकारालीच पाहिजे न? घेतले काही निर्णय चुकीचे तर त्याची शिक्षा मिळत असतेच आपोआप. त्यात आपण का भर घालायची कावळ्यासारखे टोचून एखाद्याला? चुकतच प्रत्येकच कधी न कधी. चुकू दे न. काय बिघडलं? आपल्या तंत्राने जग चालवायला काय आपण देव आहोत?
पुन्हा आलाच प्रश्न चूक काय आणि बरोबर काय?
कुठेतरी मोकळ करता आलं पाहिजे न? नियमांच्या चाकोरीतून, चांगल्या वाईटाच्या जुनाट कल्पनांमधून. आयुष्य एकदाच मिळतं. तेहि जर धाड़साने स्वतःच्या मनाप्रमाने जगता येत नसेल, त्याला स्वतःच्या संसारा पलिकडे जाउन काही अर्थ देता नसेल, तर काय उपयोग? मरण्याआधी देवा समोर उभं राह्ण्या आधी, स्वतःच्या नजरेला नजर देता यायला नको?
बरेच प्रश्न पडतात रोज. आज काल जरा जास्तच.

Advertisements
  • Bhavinee
  • एप्रिल 17th, 2009

  Beautiful, touching writing. I really think you should write a book soon. 🙂

 1. Thanks. but the later one was little too much 🙂 no?

  • अनिकेत
  • एप्रिल 17th, 2009

  1. “कधी येणार धाडस, त्या झुगारून देण्याचं?”
  2. “नेहमीच दुसर्याच्या अपेक्षा, इच्छा योग्य असतीलच कशावरून?”

  अगदी खरंय, फार वैताग आणलाय या प्रश्नांनी. सतत डोक्यात फिरत रहातात. कित्ती दिवस चालणार हे असेच आयुष्य?? कधी पडणार यातुन बाहेर?

  टाटा-सफारीची जाहीरात सारखी डोळ्यासमोर तरळते “When you look back at your life? Your office desk?, longue??” आणि तो माणुस मात्र निसर्गात मुक्तपणे फिरत असतो, एकटा, जगापासुन खुप दुर.. जाहीरात संपता संपता एक वाक्य जे डोक्यात सारखं भुणभुणतेय.. “Reclaim your life!!”

 2. मुंबईतलं आयुष्य, विशेषत: रोज एक दोन तास प्रवास..

  कंपनीनं रोज स्वत:च्या घरी झोपायला (आणि फ़क्त झोपायलाच..!) जाऊ देणं हां एक पर्क..!!

  रोज पहाटे उठून ऑफिस कड़े पळत सुटणं आणि रात्री पोरं बाळं झोपल्यावर घरी येणं..

  डोम्बिवली कल्याण वाल्या नवीन लग्न झालेल्या मुली तर घरी रात्री येताना बाळाला घेऊन येतात पाळणाघरातून.. आणि मग त्यापुढे स्वयंपाकही करतात..

  या सर्वात कसले आलेत प्रश्न.. आणि कसली उत्तरं..

  नो क्वेश्चंस, नो लिविंग.. जस्ट एक्झिस्टिंग

  ..नो Adventure ??

  नाही..

  धाडस मात्र आपल्यात खूप खूप..

  रोज त्या लोकल ट्रेन मधे खूप खूप चान्स असतो घरीच न पोचण्याचा..बस मधे पण ..

  तरीही रोज जाणं..!!

  आहे की नाही .. ??!!

 3. पण इतकं डिप्रेशन कां??
  लाइफ इज ग्रेट.. एंजॉय इट!

 4. this is not depression.
  Pan prashn padayalaach havet. prashn padan aani tyachi uttar milawanyasaathi jhagadan hech aayushya naahi ka?
  dahavi f madhlya kavitechya oli aathavtaat..
  kon hoto aapan? kaay aahot aapan…he shodhat shodhat jan mhanjech jivan navhe kaay?…

  • deepak
  • एप्रिल 20th, 2009

  kharach tar aahe , mothyanchy cukancha dosh matra lahananach ka ? Jase koni muddanmunach chuk karta ho na ? mi tar hech nehmi tharvato ki koni kitihi chukle pan aapan matra chukayache nahi. Kharatar tadjod he aayushyache dusre navach aahe. Prashna padave pan tyachi uttare matra kalavar sopvavi. karan kal ha ekach aahe ki jo sarvanvar mat karto.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: