ही पूजा म्हणुनच विशेष आहे…


१ में च्या दिवशी आमच्या सोसाइटी मधे सत्यनारायणाची पूजा आहे. त्यात काय विशेष? बर्याच ठिकाणी १ में, शिव-जयन्ती, वगैरेला हमखास असते सत्यनारायणाची पूजा!
कोणे एके काळी आमची सोसाइटी म्हणजे गोकुळ होतं. लहान मोठी मिळून जवळ जवळ २० एक मूल असू. तशी मोजुन २०-२५ कुटुंब होती. त्यामुळे, सगळे काका काकी, आजी-आजोबा, सगळ्यांना ओळख्णारे. सुट्टी लागली की काही विचारू नका! सकाळी १० वाजता जो गोंगाट, गोंधळ सुरु व्हायचा तो रात्री ७-८ वाजता संपायचा. दिवस भर डबा एस-पैस, बाठा चोर, डोंगर-का-पाणी, लगोरी, क्रिकेट, आबा-धुबी, असले काय काय खेळ खेळायचो. दुपारी कोणाच्या तरी घरी अड्डा जमायाचा. पत्ते,carom, भातुकली, पासून काय वाट्टेल ते खेळायचो. कारण दुपारच्या उन्हात अंगणात खेळायला बंदी होती. मग संध्याकाळी कधी कधी गच्चीत जाउन धुडगुस घालायचा. खालच्या मजल्यावरच्या मयेकर काकांचा ओरडा खायचा. कधी कधी आमच्या न्याय्य हक्कांसाठी लढा सुद्धा द्यायचा! 🙂
वाळायला घातलेल्या आम्बोश्या, पापड़ वगैरे नजरेतून सुटायचे नाहित. ते आमच्या पैकी कोण एकाच्या घरचेच असतील तर मग वेगळ्या कुठल्या परवानागिची गरजच नाही. badminton, हॉकी, फुटबॉल पासून सगळे खेळ मूल-मुली हा भेद न बाळगता खेळायचो. कुठलीही साधन, कुठलीही imagination आणि खेळ तैयार. घरातल्या खराट्या पासून, ते काठी पर्यंत सगळ्या वस्तु हॉकी स्टिक म्हणुन वापरल्याचं आठवतं.
मग कधी भांडणं, मारा मारया, पड़णे झड़णे, ठरवून एखाद्यावर, सात राज्य घेणे, आणि दुसर्या दिवशी पुन्हा नेहमीच्याच उत्साहाने एकत्र खेळणे! आदल्या दिवशीच्या अटी-तटीच्या भांडणाचा मागमूस सुद्धा नसायचा.
किती निर्मळ होतो ना!
मोठी माणसं सुद्धा कधी कधी आमच्या या छोट्या गमतींमधे अडकायची, ओरड़ता ओरड़ता मनातून हळूच कौतुकाने हसायची. कोणी घरातल्या रेनोवेशंनच्या कामाच्या सामानातून लागोर्र्यांची चवड बनवून द्यायचं, तर कोणी लहान मुलांच्या पार्टी साठी भेळ! दिवाळीतलं घरोघरी जावून wish करण, फ़राळ खाणं, होळी ला रंगणं, रंगवणं, सगळं सगळं आठवलं. वेडेपणातलं शहाण पण, शहाणपणातलं वेडेपण! निरागस भांडणं, जितक्या तन्मयतेने भांडायचो तितक्याच उत्स्फूर्त पणे दुसर्या क्षणी एकत्र व्हायचो.
किती किती आठवणींची रांग लागली नुसती. थांबवू म्हणता थांबेच नात.

नंतर म्हणे आम्ही मोठे झालो. मुली…लग्न करून लांब गेल्या. अंगणातली झाड़-फुलं जपणारी पीढी म्हातारी होवू लागली. तरुणाइला मोठ्या जागेचे वेध लागले. ही ३० वर्ष जुनी बिल्डिंग maintain करण्यापेक्षा जागा विकून मोठी जागा घेण्याचे बेत तडीस जायला लागले. आता फ़क्त आजी-आजोबच उरलेत हो!

खर सांगू? रयाच गेली हो आमच्या बिल्डिंग ची. आता अंगण खडबडित झालय पार. काम करून घ्यायला तरुण रक्तच नाही. झाड़ वाढली आहेत वाकडी तिकडी. ख़त घालायला, कापणी करून ते छोटसं का होईना, गार्डन maintain करायला कोणीच नाही आता उरलेलं. आजच्या इतक्या महागाईच्या दिवसात, retired म्हातार्या माणसांना कसा परवडणार रंग काढायचा खर्च?

पूजेच्या निमित्ताने सगळ्या उडून गेलेल्या पाखरांना आमंत्रण जातील. सासुरवाशिणि एकत्र येतील, नव्याने ओळखी होतील त्याच माणसांच्या! काही आठवणींवरची धुळ उडेल, काही आवाज कानात पुन्हा घुमातिल..जुन्या वाड्यात घुमावे तसे.
काही जण येतील आवर्जून, आणि काही जण मागे वळून फक्क्त हसतील. काही येतील, मजा करतील, निघून जातील, काही मात्र हळहळतील..माझ्यासारखेच, माझ्या लहानपणाचे अवशेष बघून.
या ना परत सगळे? सगळ्या आजी-आजोबांच्या नजरेत अजूनही प्रतीक्षा आहे. अजुनही त्यांचे कान मागोवा घेताहेत, त्या आवाजांचे ज्यांनी एके काळी अक्खी बिल्डिंग दुमदुमून निघायची! या ना..अंगण सारवायला, झाडांना पुन्हा एकदा पाणी घालू या, एकमेकांना भिजवत! या ना…

ही पूजा म्हणुनच विशेष आहे…

Advertisements
  • deepak
  • एप्रिल 20th, 2009

  mala he vachun majhya balpanachi aathvan jhali. aamhi pan asech hoto. pan aata kuthetari durvar nate tutat challya sarkhi vat tat . ekhadya prasangi jevha aamhi sarva ekatra yeto na tevha matr sarvanche dole bharun yetat.

 1. मस्त जमलाय लेख. आमच्या कडे पण वाड्य़ात पुजा व्हायच्या.. आणि पुजा महत्वाची नसायची , पण सोशल लाइफ डेव्हलप व्हायचं अशा प्रसंगामुळे. बरिच भांडणं संपायची अन पुन्हा मैत्री व्हायची.

 2. छान लिहिलयस.Nostalgic..

 3. thanks 🙂 everyone.

 4. प्रत्येकाच्या लहानपणाच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा लेख आहे.
  शेखर

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: