आठवायचं की नाही


आठवायला बसले एकदा सगळ्या विसरलेल्या गोष्टी तेव्हा जाणवलं मी किती विसरभोळी आहे ते. तशी माझी स्मरणशक्ति चांगली आहे!
लांब लचक यादीच मिळाली पुस्तकात, ‘मेंदू’ नावाच्या.
कुणी लिहीलय कुणास ठावूक पण प्रतिभा अचाट असली पाहिजे.

बघा न त्या सागरगोट्यांपासुन ते brain-vita पर्यंत सगळ मिळालं. फ़क्त brain-vita जिंकायची ट्रिक नाही सापडली. पान फाटलं होतं मजकुराचं.
ते frocks, माझे आणि ताइचे, सारख्या कापडातुन शिवलेले, patterns सकट आठवले. मग ‘वागले की दुनिया’ आठवल्यशिवाय कस राहिल?
व्यापार डाव, भातुकलिची भांडी, ती अजागळ बाहुली…मी सुद्धा तिच्यासारखीच दिसायचे गाव भटकून आल्यावर, मळलेले कपडे आणि सुटलेल्या रिबिनी!
संक्रन्तिचे पतंग होते, लक्ष्मी bomb मधली काढून गोळा केलेली दारु सुद्धा. पेप्सीकोला, चन्या मन्या ची बोरं, शाळेच्या गेट्वरचे भाउ, आणि हे काय? चिंध्या मारूति? ..हा मला आमचे डॉक्टर काका म्हणायचे ‘चिंध्या मारुती..”
किती किती काय काय.

विसरतो कुठे आपण काही?
फ़क्त निवडतो, आठवायचं की नाही…
नाही?

Advertisements
 1. good

 2. तू असं काही लिहितेस की प्रत्येक वेळी वाटतं की तू माझ्या शाळेत तर नव्हतीस ?
  किती जुळणारे सन्दर्भ …मराठमोळ्या भाषेत..
  केवल जून झाल्यानं अत्यंत दुर्मिळ झालेले ..पण जगण्याचं मूळ असलेले सन्दर्भ..

  पु.लं.च्या भाषेत “मनुष्य म्हणजे गोळा केलेल्या संदर्भाँचं एक चालतं बोलतं गाठोडं..”

 3. वाघोबा आणि ढग्गोबा ही मस्त हां..
  blogspot वर कमेन्ट एरर येते..म्हणून इथे..

 4. Thanks. Hi kavita khas majhya mulisathi lihili aahe. tila aagobai-dhaggobai he gan khup aawadat aani waghoba suddha. Mhatal doghanna ekatr aanu ya!
  nilesh gadre aani nachiket gadre…kaahi naat aahe ka? ki yogayog?
  sahajach vicharate. mul baayki swbhav chaukasha karnyacha tyala kaay karnaar? 🙂
  happy voting
  sonal

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: