धा.द.घा.ग., मुंबई.


धावपळ दगदग घाई आणि गर्दी (धा.द.घा.ग.) ह्या अवघ्या चार शब्दात अक्खी मुंबई सामवालेली आहे.

धावपळ कसली? कसली घाई? कसली नाही ते सांगा? चाळीतल्या संडासच्या रांगेत नंबर लावण्यापासून, ते ट्रेन पकडण्यापर्यंत, मुलांचे डबे भरण्यापासुन ते त्यांना स्कूल बस मधे बसवण्यापर्यंत, ऑफिस च काम पूर्ण करण्यापासून ते वीकएंड च्या प्लान साठी बुकिंग करण्यापर्यन्त, पावसामुळे वाहतुक बंद पडेल या भीतीने तर कधी bomb च्या अफवेने सुद्धा प्रत्येक गोष्टीत धाव आणि पळ.
गर्दी तर पाचवीला पुजलेली. आणि इतकी धावपळ केल्यावर दगदग सुद्धा होणारच.

आणि या विक्रमी वेगाने कुठे पोचायचय हे विचारवं तर त्याचं उत्तर द्यायला सुद्धा वेळ नाही. किंबहुना उत्तर नसावंच. वेळ मारून नेण्यासाठी वेळ नाही हे कारण सगळ्यात सोयीचं.

मुम्बापुरीत विर्घळून गेलेल्या प्रत्येकाला या चार गोष्टींची इतकी सवय झालेली असते की एखादा दिवस निवांत मिळाला की माणूस भाम्बावून जातो. वाट चुकलेल्या पाखरासारखा. मुंबई सोडून इतर कुठल्या शहरात गेला की त्याला ते लाइफ स्लो वाटायला लागत. बोरींग अळणि वाटायला लागत. सकाळी निवांत पेपर वाचायला वेळ मिळाला म्हणजे नक्कीच काहीतरी चुकतय. संध्याकाळी ६ वाजता घरी पोचलो म्हणजे नक्कीच काहीतरी abnormal आहे. अस व्ह्यायला लागलं म्हणजे आपण नक्कीच निरुपयोगी, टाकावू, किंवा outdated होतोय असे गंड पछाडायला लागतात.

रस्त्यात आपल्यापुढे एखाद couple जरा आरामात आजुबाजुची गम्मत बघत, गप्पा मारत, हातात हात घालून चालत असलं की साधारण reaction म्हणजे उद्वेगाची. कारण आपण घाई घाई ने चालायला इतके सरावलेले असतो की त्यांच्या पुढे जायला जर एखादी फट मिळाली नाही तर आपला संताप गगनाला भिडतो. “बागेत चालतायत का?” पासून “कामधंदे नाहित काय?” ते “ही काय प्रेम करायची जागा आहे?” पर्यंत सगळ्या reactions उमटतात. हा घाई चा सराव की या चार (धा.द.घा.ग.) गोष्टिन्मधे जास्तच मुरल्याचे side-effects हे काही कळत नाही.

हे side effects इतके डोकावत असतात रोजच्या आयुष्यात की तेहि अंगवळणी पडलेले असतात. realize च होत नाही की आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून कोणत्याही माणसावर किती भड्कतो पटकन! रेलवे मधे धक्का लागो की रिक्षवाल्याचा एखादा turn मिस होवो, रागाची पातळी एकदम extreme. सिग्नल सुटला की समोरची गाडी स्टार्ट होण्याआधीच आपला horn इतका रागारागाने किन्चाळायला लागतो की तेहि आपल्या आक्रोशाच प्रतिकच जणू. गाडी सुरु व्ह्यायला वेळ लागतो म्हणजे काय? त्या क्षुद्राला मुम्बैच्या हाईवे वर गाडी चालवायचा अधिकारच नाही ही मागच्या सगळ्या गाड्यांची भावना.
समोरच्याच्या position मधे आपण असलो तर? हा विचार राग शांत झाल्यावर येतो कधीतरी. पण त्या क्षणी आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रतिकूल गोष्टीला हा आणि हाच माणूस जबाबदार असल्यागत राग.
मजेचा भाग हा की हाच राग खरोखरीच्या समस्या समोर आल्यावर इतक्या वेगळ्या रुपात समोर येतो की…”ऊफ़ाळून” वगैरे तर नाहीच येत. रस्त्यावरचे खड्डे, hiaghway च्या दोन्ही बाजुने दिसणारे आपल्या शहराचे ओंगळवाणे रूप, बिल्डर lobby ने केलेला हिरवाईचा, मूलभूत सोयींचा केलेला अनन्वीत छळ, त्यांना आणि वोट बैंक ला लाचारपणे शरण गेलेले धूर्त नेते…या पैकी काही काही बघून राग येतच नाही! आला तरी सांभाळून जपून येतो. उगीच उपाय करता करता आपल्यालाच व्याधि जडायचि! बोथट, अपंग राग!

पण तरीही ‘आमची मुंबई’ , ‘आम्ही मुम्बैकर’, ‘मुंबई करांची जिद्द’, ‘मुम्बापुरीत कोणी उपाशी राहत नाही’, ‘स्वप्नांची नगरी’ ‘शेवटी मुंबई ती मुम्बैच’ असल्या सगळ्या चकचकीत, सुंदर packaging मधे मुंबई च मार्केटिंग चालूच.
मुंबई म्हटल की सिगरेट चा पैक आठवतो. सिगरेट म्हणजे आनंद, धुंदी, स्टाइल, status, …सिगरेट म्हणजे व्यसन. आणि त्या finished, stylized pack वर छापलेली वार्निंग “Cigrette smoking is injurious to health”.

Advertisements
  • Bhavinee
  • मे 6th, 2009

  पण ह्याच मुम्बैत इतक्या शांतपणे आणि सुन्दर्तेने विचार करणारी लोक आहेत ना, त्यापर्यंत I am not losing hope 🙂

 1. मुंबई म्हटल की सिगरेट चा पैक आठवतो. सिगरेट म्हणजे आनंद, धुंदी, स्टाइल, status, …सिगरेट म्हणजे व्यसन. आणि त्या finished, stylized pack वर छापलेली वार्निंग “Cigrette smoking is injurious to health”.

  Thats the perfect analysis of the mumbai..!

  • ngadre
  • मे 6th, 2009

  छान सोनल..

  सर्वजण टाईप A पर्सनालिटी होत चाललेत.. अस्वस्थ..अधीर..त्रस्त..स्वकेंद्रित..

  मस्त पोस्ट..

  • milindarolkar
  • मे 7th, 2009

  सुंदर…छान लिहिलंय…अजब रसायन आहे मुंबई….मिलिंद

 2. Thanks Bhavinee.
  Thanks Mahendra, Nachiket,Milind.
  Hi duniya maayajaal manuja jaag jara!

  • अनिकेत
  • मे 7th, 2009

  मला तर बाबा मुंबईची भीतीच वाटते. कित्तेक ऑफर मिळाल्या नोकरीसाठी पण मला शक्यच नाही तिथली धावपळ जमतच नाहि. २ महीने वाशीला कामानिमीत्त राहिलो होतो अगदीच गरज होती म्हणुन पण नाही झेपलं. लोकलने दादर ला जाईन म्हणलं पण गर्दी बघुन पुढची लोकल, पुढची लोकल करत ४-५ सोडुन दिल्या आणि नाहीच जमलं म्हणुन परत आलो.

  एक किस्सा सांगतो. पुण्यावरुन मुंबईला बसने जाताना एकदा बेलापुरलाच वाशी समजुन उतरलो होतो. अहो सेमच दिसते ते रेल्वे स्टेशन आणि तो हाय-वे. शेजारी झोपलेल्या मित्राला गदा गदा हलवले, कंडक्टरला घाईघाईने बेल मारुन बस थांबवायला लावली आणि उतरल्यानंतर काही वेळाने कळले हे बेलापुर. मग काय झक-मारत लोकल पकडुन वाशी गाठावे लागले.

  माझ्या सारख्या आळशी, संथ, पुणेकर माणसाला खरंच नाही झेपायची मुंबई.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: