एखादं कुस डोळ्यात खुपत राहवं


काही माणसं. गणवेशातली. आणि काही सिविल ड्रेस मधली.
खण्खणणारे सेल फोन्स. हातात फड्फड्त आपली ताकद दाखवणारे कागद. थोडी अरेरावी, थोडी बाचाबाची. थोडी सारवासारव. आणि मग घणाचे घाव. भिंतींवर, दरवाजावर.
वाटेतल्या वस्तु पटापट बाजुला करत, बावचळलेल्या लोकांना समजावत, दुसरीकडे हलवण्याची लगबग करणारे हाउस-कीपिंग वाले आणि सिक्यूरिटी गार्डस…
केस illegal जागा occupy केल्याची, एका multinational company ने.

पण अर्ध्या तासात सगळ नॉरमल. माणसं आपापल्या कामात. वारिष्ठांच्या चेहर्यावर ‘काहीही न झाल्याचा’ आव आणण्याची केविलवाणी धडपड. आणि कोणाची चुक हे अजुनही न उमगलेल्या सामान्य कर्मचार्याच्या मनात संशय, खेद, अनेक प्रश्न, आणि आपण यात दुरून दुरून का होई ना पण सहभागी नसतो तर फार बरं झालं असतं असा भाव.

प्रश्नचिन्ह बरीच. आपण अप्रत्यक्ष रित्या का होइना या पापाचे भागीदार आहोत ना? हे पाप आहे कशावरून? हे BMC वाले का आले इथे? कोणाची चिथावणी होती? की आज चुकून खरच प्रमाणिक पणे आले होते? की वखवख संपली नाही म्हणुन अजुन खायच्या अपेक्षेने आले होते?
खरं कधीच समजणार नाही आपल्याला. पण टोचणी मात्र कायम राहणार त्याचं काय? आपण सगळ्या corrupt systems ना मनापासून शिव्या घालणारे, स्वच्छ चार्रित्र्याचं तत्वद्यान डोक्यावर घेणारे… आणि भारतात कुठलीच गोष्ट स्वच्छ आणि पूर्ण प्रमाणिक पणे घडत नसते हे मनातून पक्के ठावूक असनारे. इथला सूर्यप्रकाश तरी कुठे स्वच्छ राहिलाय आताशा? business, corporate world वगैरे तर दूरच राहोत.
पण आपण जिथे प्रामाणिकपणे घाम गाळतो, त्या मोठ्या साखळीतली एक कड़ी मात्र कुठेतरी चुकीच्या गोष्टीत फसलेली आहे हे सत्य जेव्हा समोर उभं राहतं ना तेव्हा…नाही सांगता येत काय होत ते. फसवणूक झालेली असते. कोणी केली हा मुद्दा नाहीच. अपमान, फसवणूक, लाज, सगळच वाटत.
तसं विशेष काहीच नाही घड़लेलं, बघायला गेलं तर. हलकासा तडा गेलाय फ़क्त काचेला. hair crack. वरून दिसत सुद्धा नाही. पण ग्लास ठेवला की आवाज जरा कमकुवत येतो इतकच.
विचारच करायचा म्हटला तर बराच खोल उतरता येईलही. काय झाल त्या code of conduct आणि कंपनी एथिक्स चं?

एखादं कुस डोळ्यात खुपत राहवं, दिसू नए, सांगता येवू नए..डोळा लाल व्हावा, पाणी याव, आणि धुवायाचा प्रयत्न केला तर अजुन चुरचुरावा अस काहीसं.

Advertisements
  • ngadre
  • मे 27th, 2009

  सोनल..
  या अशा गोष्टी तुला या प्रकारे भिडतात..
  नेमकं जे दिसायला हवं तेच तुला दिसतं..
  म्हणूनच तुझं वाचायला आवडतं..

 1. Thanks.
  baryach divasanni bhettoyas? aahes kuthe?
  navin likhan?

  • ngadre
  • मे 27th, 2009

  Naveen Likhaan kelay aajach..

  • YD
  • मे 27th, 2009

  Chaanach…visheshatah
  “खरं कधीच समजणार नाही आपल्याला. पण टोचणी मात्र कायम राहणार त्याचं काय?”

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: