आठ्वणीतल्या गोष्टी


काही आठ्वणीतल्या गोष्टी…परत परत आठवते आणि इथे उतरवायला विसरते. म्हणुन आज लिहून ठेवतेच.

१. शाळेतला फ़ळा: त्याच्या डाव्या हाताला कोपर्यात “दिनांक” आणि खालोखाल वार लिहिलेला असायचा. सगळ्यात वरती, मध्यभागी आजचा सुविचार, त्याच्या खालोखाल विषय, आणि उजव्या कोपर्यात उपस्थिति म्हणजे एकुण, प्रेसेंट, आणि अब्सेंट चे नंबर.
सगळ्याच शाळांमधले फळे काहीसे असेच दिसायचे.

२. शाळेचा पहिला दिवस: वह्या पुस्ताकांच वाटप व्ह्यायाच. बहुदा पावूस पडत असायचा. तेव्हा पावूस जून च्या ठरलेल्या तारखेला यायचा. तय नव्या कोर्या वह्यांचा वास खुप आवडायचा. That still connects me to those beautiful days. त्या दिवशी संध्याकाळी, बाबांबरोबर बसून cover घालण्याचा प्रोग्राम असायचा. labels लावायची आणि नाव घालायची, वर्गपाठ आणि ग्रृह्पाठ वेग्वेग्ळे. पहिल्या पानावर श्री लिहायच. मगच सुरुवात.

३. परीक्षेचा शेवटचा दिवस: कधी एकदा पेपर संपवून शाळेबाहेर पडतो अस व्ह्ययच. त्या दिवशी भूक लागायची नाही, फ़क्त खेळ. uniform बदलायची सुद्धा शुद्ध नसायची. पण त्या दिवशी आई कुठलेच प्रश्न नाही विचारायची.

४. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी: सकाळी लवकर उठून शाळेत जायच. वेगळच वातावरण असायच. शळेच अंगण सडा शिम्प्डून, पांढर्या पावडरीचे पट्टे आखून एकदम चकचकीत केलेल असायच. त्या दिवशी सकाळी उठायचा अजिबात कंटाळा येत नसे. बहुदा मी राष्ट्रभक्ति पर गीतांमधे किंवा संचालाना मधे असायचे. band वाजायला लागला की भारावून जायला व्हायचं. देश, देशभक्ति, वगैरे शब्दांची खोली आणि ऊँची दोन्ही कळत नव्हते. तरी उगाच अभिमानाने उर फुलून यायचा. प्रभात फेरी निघायची. तेव्हा आपल्या वाडीतले सगळे आपल्याकडे बघतायत म्हणुन उगीच स्टार झाल्या सारखं वाटायचं.
घरी जावून टीवी वर झेंडा वंदन, राष्ट्रपति पुरस्कार, वेगवेगळ्या राज्यांच्या परेड सुद्धा आवर्जुन बघायचो. सुट्टी त्या नंतर सुरु व्हायची.

५. रविवार संध्याकाळचं विक्रम वेताळ आणि दादा-दादी की कहानिया, आणि सकाळी he-man, मोगली, महाभारत इत्यादि. हे सगळ माझ जाम favorite होतं.

६. सुट्टी पडली खेळ खेळ खेळणं, आंबे खाणं, पुन्हा खेळणं, आणि दमदमून मग रात्री आलेली शांत झोप….owesome.

७. T.Y. ला असताना केलेला झपाटल्यासारखा अभ्यास. कॉलेज ची बाकीची वर्ष झोपेची आणि हे मात्र झपाटून जाण्याच होत. जागुन कम्प्लिट केलेली journels, खंडीभर reference बुक्स मधून टिपून काढलेल्या नोट्स. (त्या मी अजुन जपून ठेवल्यात.)

८. कैंटीन मधला गणेश चा वडा पाव आणि कटिंग. तासंतास गप्पा आणि गाणी, annual डे ची प्रक्टिस आणि स्वतःच गाणं सोडून दुसर्यन्चीच गाणी गात घालवलेला दिवस.

९. बिल्डिंग मधल्या मित्र मैत्रिणींबरोबर केलेला अहोरात्र टाइमपास. absolute non sense जोक्स वर पोट धरधरून हसणे. आणि औदुम्बराच्या पारावार बसून रात्री पर्यंत अड्डा जमवणे. या पेक्षा जास्त छान ते काय असणार आयुष्यात?

Advertisements
  • sachin
  • मे 28th, 2009

  Present = हजर
  आणि
  Absent = गैरहजर

  • ngadre
  • मे 28th, 2009

  sundar likhaan…May I add ?

  1) “You just wait !!” naavachi 10 minutes chi cartoon serial. Sunday evenings. Kolha ani sasa..

  Oh Rabbit.. You Just Wait..!!

  2) Shala sutalyavar vande mataram..kinva konalatari shraddhanjali saathi ek minute shantata..

  vareel donhi cases madhe fiss karoon hasoo yena.. aani mag maar khana..

  3) Graph chi vahi..choukat choukat vali hiravi

  4) Itihaasacha pustak- Thoranchi olakh..

 1. 🙂 thanks for adding nachiket. graphchi wahi khaas. wargatala Gandhijincha, aani shivaji maharajancha photo raahilach. jyala jo hava to aadarsh maanun ghya! 😀

  Thanks Sachin. Shabd aathwat hote pan falyawar ‘Pr” aani ‘Ab” lihilel ase. Tyamule Present aani absent..:D
  Sonal

 2. Simply nostalgic! While reading your post I travelled through my school/college days again. I have also written something nostalgic on my blog… read here
  http://anaamik.blogspot.com

  -Amol

  • YD
  • मे 28th, 2009

  ahaaha, shaaletalyaa aathavanee mastach. Specially phala , amacha same asach asaycha 😀
  nachiketne taakalelya athvanee pan chhanch…fiss karun hasu yene, kharach 🙂

  • mipunekar
  • मे 28th, 2009

  तू मराठी माध्यमात शिकलेली दिसतेस. मी मराठी शाळेत होतो. ती तारीख,तो सुविचार शाळा भरल्यावर १ तास शाबूत असायचा. मग एक एक शब्द गायब वयाचा,अर्थाचा अनर्थ पण झालाय किती वेळा.

  मी मागे वळून पहिला तर मी पण अगदी हेच केलं असं वाटलं.

 3. Thanks YD, Thanks Punekar. ho. mi marathi madhyamat shikaley. saglya marathi shaletale references thodya far prmanat saarkhech astaat na?

  • Sudarshan Apte
  • मे 29th, 2009

  नुसते शाळेचेच नाही तर तुझे points no ५,६,७,९ एकदम बरोबर जुळतात…
  तुझ्या या post ने मला एक post लिहायची स्फूर्ती आली आहे. आणि त्या post मध्ये तुझ्या post ची लिंक अपरिहार्य असणार आहे. बघतो जमेल तसा लिहीन आता.

  • ngadre
  • मे 30th, 2009

  mi hi marathi shalet hoto..amchyakade ek lezim talim asayachi..P.T.

  Ya kundendutusharhaardhavala…


  Nishesh jadya paha..

  Ashi ek prarthana hoti..
  Ani mi jarasa jadya hoto..

  Ata faarach aahe..

 4. @sudarshan..thanks. tumachya blog cha url dya na. ikde link yet naahiye profile name war.
  @nachiket- jadya ekdam dhammal… 😀

 5. hehe mazahi same asach!! saglech nostalgic zalet ka? mi hi mage asach post lihla.. 🙂

 6. @bhagyashree…mi waachala tujha post. khup chaan lihilayas.

  • kewal ingale
  • मार्च 27th, 2010

  ya…it’s very awesome blog it taken me to my past school unforgetable days……….thank’s for posting..
  but one thing is missing to call someone in school with is Nickname…..

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: