बेला के फूल


काल कपाट लावताना एक खोका सापडला. त्यात माझ्या बर्याचशा जुन्या cassettes होत्या.
ते दिवस आठवले. रेडीओवर एखाद favorite गाणं लागल, किंवा रविवार च्या पुरवणी मधे कोणा संगीतकार, गितकारावर लेख आला की त्यातली आवडती गाणी dairy मधे लिहून ठेवायची. मग एकदाच पुरेशी गाणी जमली की कैसेट रिकॉर्ड करून आणायाची. त्यात परत मूड्प्रमाणे sequence मधे टाकायची. आता दिवस CD चे आणि mp3 चे.
इन्टरनेट वर हव तेव्हा हव ते available असण्याचे. मला वाटत गोष्टी जपून ठेवण्याचा संस्कार या availability मुळे पुसत चाल्लाय. पूर्वी, जेव्हा सगळ “just a click away” नव्हत तेव्हा गोष्टींचा संग्रह करणे, त्या जपणे, त्यांची काळजी घेणे आणि मुळात त्या गोष्टी मिळवण्यासाठी passionately काम करणे हे सगळ आपसुक होत होतं…असो. जरा विषयांतर झाल.

काल त्यातली एक टेप काढून वाजवली. पुन्हा बरीच वर्ष मागे गेले. ही गाणी भिनालियेत अक्षरशः नसानसात.
लता रफी किंवा आशा किशोर ची duets वाजायला लागली की कुठल्याही grave mood मधून बाहेर येवू शकते.
मग ते “कांचा रे कांचा” असू दे किंवा, “वो है जरा खफा खफा” असू दे, “तेरी बिंदिया” असू दे वा ” कोरा कागज़ था ” ची पहडात घुमणारी साद. ही गाणी नुसती वेड लावतात. personally मला सोलो पेक्षा झकास जमलेली duets ऐकायला जास्त आवडत. त्यात लिहिणारे, संगीत देणारे, आणि गाणारे सगळेच अचाट, भन्नाट. माझ्या collection मधली काही गाणी तर फार ordinary आहेत. म्हणजे मुद्दाम कोणी रिकॉर्ड करून घेइल अस नाही. उदा. “नैनोमे काजल है, काजल में मेरा दिल है..” पण आशा कितीतरी गाण्यांना लता-किशोर च्या आवाजाचा परिस स्पर्श झाल्यावर त्यांच अक्षरशः सोन झालय. या गाण्यांवर मी वाढ्लीये. शाळा कॉलेज चा अभ्यास, नंतर ट्रेन बस मधला प्रवास, इतकाच काय तर प्रोग्रामिंग चे complex logics सुद्धा मी यांच्या साक्षीने लिहिलेत.

मला पडलेला एक घाबरवणारा प्रश्न सध्या हा आहे की माझ्या मुलीला जर ही सुंदर गाणी एइकण्याची गोडी मी लावली नाही तर ती प्रीतम वगैरे सारख्या लोकांची सूफी-कम-रॉक-कम-fusion कम confusion टाइप ची गाणी एइकू लागेल. ज्यातली यमक सुद्धा predictable असतात, ताना सुद्धा आणि आवाज सुद्धा. कुठे रैप typechi निरर्थक इंग्रजी बडबड येणार, आणि कुठे बेम्बिच्या देठापासून एखादी आर्त किंकाळी (ज्याला सूफी touch म्हणतात आजकाल ) हे सगळ तेच तेच आणि तेच तेच तेच असत.
ओह नो! ह्या सगळ्या cassettes युद्ध पातळिवर revive करायला हव्यात. आणि रोज मीही एइकयाला हव्यात आणि तिलाही एइकवायाला हव्यात. its a must do. coz its a promise that I will give her my Best, and moreover, give her all the beautiful things in life…

Advertisements
  • sahajach
  • मे 28th, 2009

  खरय तुझं सोनल….मुलांना या गोष्टीची गोडी लावणं ही आपलीच जबाबदारी……आम्ही सद्ध्या मुलाला सांगतो की आम्ही ऐकतो ती गाणी तु ऐकुन बघ आणि आवडली तर परत ऐक….आश्चर्य वाटतंय आम्हालाच त्याला ’जब वी मेट’ चे नगाडा किंवा मोजा रे मोज्जा न आवडता ’ना है ये पाना’ आवडतय..परवा तो मला म्हणे की ’कल हो ना हो’ चे टायटल सॉंग मस्त आहे…मराठी गाण्यांच्या बाबतही असाच अनुभव येतोय आणि मुलीचा सद्ध्या दादा म्हणजेच देव त्यामुळे तिच्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे नाही लागत….
  थोडक्यात काय आपण डोळसपणे पर्याय दिले की मुलांना आवडतात ते……
  बाकी 60 च्या किंवा 90 च्या कॅसेटस रेकॉर्ड करून आणण्यातही मजा होती की नाही……ती कॅसेट मिळेपर्यंत एक हुरहुर असायची….

  • ngadre
  • मे 28th, 2009

  Hmm.. avadala..

  By the way.. Juni gaani khoopashii melody yukt asataat..

  Naveen madhehi titkich darjedaar gaani aahet.

  Choose karayala jamana mahatvacha.

  nusatach junyaat ramanyaat arth naahi..kinva muddam junyaapasoon fatakoon rahanyachihi garaj nahi..

  changala kaay te kalana mahatvacha..

 1. आवड रुजवायचा प्रयत्न करण आपल्या हातात. बाकी त्याच implementation त्यांच्यावर सोडणं योग्य.
  एकदा कान चांगल एइकयाला सरावले की फ़क्त चांगल आणि वाईट एवढच शिल्लक राहत. नवं आणि जूनं हा प्रश्न उरतच नाही. पण जुन्या गाण्यन्मधे चांगल्याची मजोरिटी होती. नव्या गाण्यन्मधे तस नाही म्हणता येत. चांगले संगीतकार आहेत, गीतकार देखिल आहेत. नाही अस नाही. पण टीपता यायला हव कानाला.
  सुंदर,भिडणारं, अभिजात…फ़क्त गाण्यांच्या बाबतीत नाही पण ही निवड आयुष्यात कुठल्याही गोष्टीत करता येणं म्हणजे प्रवास सुंदर होत जाणं. तसा यांचा व्हावा म्हणुन सगळा खटाटोप.

  • ngadre
  • मे 28th, 2009

  you got it perfectly.. And said it perfectly too… As usual Sonal special clear concept..

 2. he mhanje jara jastach harbharyachya jhadawar chadhavtoyas ha…khar tar mi pan aayushyat baki saglyanitakich confused aahe 😀

  • ckt
  • जून 27th, 2009

  good post. title varun mala vatalela ki tu bela ke phool program baddal kahi nostalgic lihilayes ki kay. even i hv grown on those songs, and specially all my engg studies were possible becoz of those late night radio programs – bela ke phool by “ashok sonavane” being one of them.. “pyaar bharaa namaskaar” he shabd tyachya shivay dusarya kunachya thondi naaTki vaTatil, pan tyachya nahi.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: