Three cheers for this friendship!


“वाचलास माझा ब्लॉग आज?” मी.
“नाही ग, वेळच नाही मिळाला. खुप काम होत आज.” माझा नवरा.
“ते नेहमीच असत तुला. नकोच वाचुस तू कधी. पिल्लू मोठी झाल्यावरच वाचेल आता. परत सांगणारच नाहिये मी तुला कधी” मी.

हे नेहमीचे dialogs. आणि नेहमीच एखादं पोस्ट, माझच, माझ्या पसंतीला उतरलं (याला आत्मस्तुति, आत्मप्रौढी, self obsession वगैरे काहीही म्हटलत तरी मी अजिबात मनावर घेणार नाही. 🙂 ) की पहिलं त्यालाच सांगणार वाच म्हणुन. मग पुन्हा तेच dialogs. आणि मग एखाद्या दिवशी अगदी हट्टी अवखळ पोराला दामटवून अभ्यासाला बसवल्यासारखं त्याला मी बसवते माझा ब्लॉग वाचायला.

नाहीच शक्य झालं तर सरल printout कोम्बते त्याच्या हातात.  आणि मग माझ पुढचं पुराण सुरु होत. या ब्लोग्वर न नाचिकेत ने ही कमेन्ट टाकली होती, किंवा तो खुप कंटाळलेला असेल तर  “तू न कंटाळा ब्लॉग वाच तुला सॉलिड मजा येइल” वगैरे माझ चालू असतं.

खर तर तुमच्यापैकी कोणालाच मी कधी पाहिलेलं नाही. कधी तुमच्याशी बोलले नाहिये, किंवा तुमचे चेहरे सुद्धा धड माहित नाहित (ब्लॉग वरचे thumbnails आणि प्रत्याक्षताले तुम्ही नक्कीच वेगळे असणार.{ हे ज्यांनी स्वतः चे फोटो टाकलेत त्यांच्यासाठी आहे. फुलाबिलांचे टाकलेत ते तर obviously तसे नसणार दिसत. हीहीही })
पण तरीही तुम्ही इतके ओळखिचे झाला आहात आता!
संध्याकाळी टीवी समोर बातम्या एइकयाला बसलं की महिन्द्रजी येवून बसतात, हातात चिवड्याची प्लेट घेवून. आणि आमचं त्या बातम्यांबद्दल डिस्कशन चालू होतं.
ऑफिस मधून कंटाळून, वैतागून मी घरी जात असते. रिक्शावाले माज दाखवत मला नाही म्हणत असतात म्हणुन जिवाची चिडचिड झालेली असते. अशा वेळी नको नको म्हणताना सुद्धा YD ची अखंड बडबड चालू असते रस्त्याने जाता जाता. मी कानावर हात ठेवते, हसायच नाही अस ठरवते, पण हसायला येतच.
नाचिकेत प्रत्येक गोष्टीवर इकडून तिकडून punches टाकत असतो. एखाद्या दादाने लहान बहिणीची वेणी ओढावी येता जाता तसा. कधी खिडकीतुन चिड्वेल, कधी मागून टपल्या मारेल. कधी मेल करून spam कमेंट्स बद्दल सावध करेल. 🙂
अनिकेत म्हणजे संध्याकाळी सहज शेजारच्या घरातून येतो आणि “ऐ आज काय झालं माहितेय?” म्हणत एखादा सॉलिड किस्सा सांगुन जातो. जेवणापुर्वीच्या wine सारखा. 😛
विद्या, तन्वी रोजभेटतात कैंटीन मधे, मनसोक्त गप्पा मारायला अशा मैत्रिणी हव्यातच न रोज?

कित्ती बोलते मी सगळ्यांशी रोज? आणि सगळे किती गप्पा मारतात माझ्याशी.
खरच प्रत्यक्ष भेटायची गरज आहे का? भेटलो तर मजा येइल की हे असं भेटणंच जास्त छान आहे? बहुतेक हे असं भेटणंच छान आहे. आपले ब्लोग्स म्हणजेच आपला चेहरा, आपल मन. प्रत्यक्ष भेटलो तर कदाचित या भेटीची उत्सुकता कमी होइल. किंवा “अरे, हा आपल्याला वाटला तसा नाहीये अजिबात” असही वाटेल आणि उगाच सवयीप्रमाणे आपण मत बनवायला भाग पाडू स्वतःला. . त्यात पाणी गढुळ व्हायचीच शक्यता जास्त.
ही निर्मळ, पारदर्शी, मैत्री अशीच राहिली तर काय हरकत आहे? 

कुठलीही गोष्ट पूर्ण झाली की ती थाम्बते.  अपूर्ण, अधुरया गोष्टी, मग त्या खरोखरच्या गोष्टी असोत की नाती, नेहमीच आपल्याला उत्सुक ठेवतात, जिवंत ठेवतात. . जे नात्यांचं तेच जगण्याचं. सगळ पूर्ण झालं तर ध्येय ते काय?नजरेतलं वाट पाहण संपल की ती नजर उरत नाही, त्याचे डोळे होतात.
म्हणुनच मला imperfection जास्त आवडतं, perfect गोष्टीँपेक्षा.

जरा विषयांतर झालं. पण बरेच दिवस मनात घोळत होतं हे सगळं. तुम्ही सगळे कधी भेटलात आणि माझ्या रोजच्या जीवनाचा एक भाग झालात हे मलाही कळल नाही. पण माझी लेखणी (की टाईपणी?) लिहित राहिली कारण त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांशी जोडलेली राहिले. तुम्हाला भेटण्याचं ते एक निमित्त झालं. तुमच्या समोर माझ मन व्यक्त करण्याच ते एक साधनही झालं.  आणि शब्दांच्या पलिकडलं ज्ञाणुन घेत, तुमच्या अंतरंगात डोकावायची एक खिड़की सुद्धा.

Three cheers for this friendship!

Advertisements
 1. खरच गं… एकमेकांचे blogs वाचता वाचता त्यावर comments करता करता नकळत आपण मैत्रिचे धागे विणत असतो…. bloggers च्या ह्या मैत्रिला virtual friendship म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही. आणि माझ्या नवरयाला सु्द्धा माझा blog नियमित वाचायला वेळ होत नाही… आताच त्याला chat वर सांगितलं आहे की मी blog वर नवी post टाकली आहे ती वाच… बघु वाचतो का 🙂

  • ngadre
  • जून 4th, 2009

  माझंही अगदी असंच होतं..

  मला वाटलं फ़क्त माझंच होतंय म्हणून..

  प्रत्यक्षही आपण भेटत असतो..काय माहीत बाजूच्या रिक्षात सोनल असेल किंवा एखाद्या झम करून ओवरटेक करून गेलेल्या कारमधे महेन्द्रजी..

  पण आपल्या नेहमीच्या जगात त्यांना भेटण्यात काय अर्थ ?? आपलं हे जग वेगळं आणि ते जग वेगळं..

  इथले आपण वेगळे आणि तिथले वेगळे..

  तेरे देस में मेरे भेस में.. कोई और था.. कोई और है.. !!

  हो.. आपला लाईफ पार्टनर कधीच ब्लॉग वाचत नाही..वाईट वाटून घेऊ नको.. तेच बरं आहे.. जवळचे लोक फार सब्जेक्टिव्ह होतात..जजमेंट करतात..

 2. खरंच.. अगदी खरं आहे. पण व्हर्चुअल लाइफ आणि रिअल लाइफ मधे कधीच गुफ अप होऊ देउ नये!

  माझा ब्लॉग पण सौ वाचत नाही. मी तिला अजुन सांगितलं नाही..( ४ महिने झालेत आता) कारण तिला सांगितलं तर शुध्दलेखनाच्या कमित कमी ५० चुका काढेल एका पोस्ट मधे. 🙂

  पुर्वी मी ऑर्कुटवर बराच वेळ घालवायचो , पण हल्ली अकाउंट डिलिट केल्यामूळे ब्लॉग हाच एक विरंगुळा आहे.

  सोनल, आजच पोस्ट मात्र खुपच सुंदर जमलंय.. मी सकाळपासुन थोडा बिझी होतो, म्हणुन आत्ता चेक केलं.. आणि आता कॉमेंट पोस्ट करतोय..

 3. hahhaahha..now u get it right…you are sounding like my previous blog entry…”chawtay…” ?? 😀

 4. majhi maagchi comment nachket sathi hoti. तेरे देस में मेरे भेस में.. कोई और था.. कोई और है.. !!

  @mahendraji, thanks for your comment.

  @all, life partner aani blog hya babtit saglyanche common experiences aahet he waachun far bar waatal. aata majhya nawryaache kahi divas tari katkatishiwaay jatil 😀

  • YD
  • जून 4th, 2009

  😀

  “. . त्यात पाणी गढुळ व्हायचीच शक्यता जास्त. ही निर्मळ, पारदर्शी, मैत्री अशीच राहिली तर काय हरकत आहे? ”

  Agree 100%

  • Ckt
  • जून 4th, 2009

  very nice post! 🙂

  tula khup changalya maitrya miLot hya shubhechchha.!!!

  • mipunekar
  • जून 4th, 2009

  Hip hip hurrrrrayyy!…..
  सगळ्यांची छान गट्टी जमली आहे. अशीच चिरंतन जमून राहू दे.

 5. e mast lihlays he post!! ashi maitri vegLach rasayan aste.. tu perfect mandlays! awdla..

 6. @YD, kantala jhop aani aata he post…solid agree karato aapan hya points war.
  @ ckt, mipunekar: thanks. Shubbhechhanbaddal aabhar.
  @bhagyashree: thanks once again. aaj backlog purn karteyas ka baryach divsanni?

 7. yes yes.. mala tujha dusrach blog mahit hota! ha nahich.. 😦

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: