ये रे ये रे पावसा…


ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा….

वर्ष नु वर्ष पावसाची वाट पाहत हे गाणं घराघरात लहान मुलांना शिकवतोय आपण.  माझ्या मुलीबरोबर हे गाणं म्हणताना मात्र मला हे गाणं एकदम नवं नवं वाटायला लागलं.
एखाद्याला मज्जा म्हणुन फसवणं, फिरकी घेणं आणि त्यातली गम्मत लुटणं आणि  एखाद्याला अगदी खरं खरं फसवणं…फरक आहे ना खूप?    
आहेच. मजेमजेत गाता गाता या पावसाला माणसाने वर्ष नु वर्ष फ़सवलय. खरं खरं!
माणसांच्या जगातले नियम निसर्गाच्या व्यवहारात वापरून चालत नाही राजा. आपली काम भले होत असतील पैसे देवून, त्याची कशी व्ह्यायची? त्याला हवं पाण्याच्या बदल्यात पाणी, आणि हिरवी हिरवी झाडी..हिरव्या नोटांनी थोडच जग हिरवगार होणारे? ‘ग्रीन अर्थ’ म्हणे.
नेमक हेच तर नाही न कळत त्या मुर्ख ‘माणूस’ नावाच्या प्राण्याला. बर लाच दिली तर दिली, पण खरा पैसा नाही नं दिला. 
आणि आता पुन्हा पावसालाच दोष,  ‘कुठे गेलाय देवजाणे?’, ‘का परीक्षा बघतोयस?’ इत्यादि इत्यादि.
आता तुम्ही इतकी वर्ष फसवलत..कधीतरी तो शहाणा होणारच नं? किती दिवस खोट्या पैशावर भागणार त्याचं?
तेव्हा आता तुम्ही सुद्धा शहाणे नको का व्ह्यायला? त्याच्याशी त्याच्या जगातले व्यवहार करायला नकोत का? आपण सुद्धा एक देशातून दुसर्या देशात गेलो की त्यांच्या currency मधून व्यवहार करतो. मग पाउस पाण्याशी, झाडा-फुला-पांनाशी, त्यांच्या जगातली currency वापरून नको का देव घेव करायला?

आणि हो…प्रत्येक पुढच्या पिढीला हे खोट्या पैशाचे संस्कार देण आधी बंद करा बरं!

नाहीतर ‘खोटा झाला पैसा, आणि, पावूस झाला नाहीसा’ अस म्हणावं लागेल, लवकरच.

Advertisements
 1. हिरवंगार ओलं सुंदर तात्पर्य आहे तुझ्या छान छान गोष्टीचं..

  • अनिकेत
  • जून 18th, 2009

  मस्त. अगदी साध्या भाषेत सहज समजणारे, realistic त्रिवार सत्य

 2. बरेच दिवसा नंतर आज वेळ मिळाला, आणि तुमचं पोस्ट वाचलं. खरंच खुपच रिअलॅस्टीक लिहिलंय..

 3. तुम्हा लोकांची( नचिकेत, अनिकेत , सामंत साहेब वगैरे) भाषेवर छान कमांड आहे . प्रयत्न करुनही असं लिहिणं जमत नाही. खुपच सुंदर! 🙂

 4. Thanks saglyannach.
  mahendraji, khar saangu ka? tumchyasaarakh rokh thok lhin hi suddha ek wegali style aahe. aaplyala nahi jamnaar. Tumach likhan wachun mala watat ki tumhi patrakarita keli astit tar aamhala navhe tar saglya lokanna tumachi raajkiy bhashy waachayala milali asti.

 5. As far as blogging is concerned, we all should consider Mahendraji as icon.

  • YD
  • जून 19th, 2009

  Shevat farach sundar

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: