पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत!


आजकाल बोकाळलेल्या काही गोष्टी आणि त्याबाबत मला पडलेले हे प्रश्न.

1. प्रत्येक IT कंपनी मधे प्रत्येक employee ला आपल्या KRA मधे ‘innovation’ आणि ‘organizational contribution’ ह्या गोष्टीँमधे भरीव कामगिरी का दाखवावी लागते? जरी तो बिचारा एखादा लो एंड कॉपी-पेस्ट जॉब करत असेल तरी सुद्धा त्याने त्यात innovation दाखवावं ही कसली अपेक्षा? आज पर्यंत असल फुटकळ lecture देणार्या बॉस ला एखाद्याने भर मिटिंग मधे फटकावून काढ्ल्याचं का एइकिवात नाही?
२. अमुक अमुक मेल ५ किंवा १० लोकांना फॉरवर्ड करा नाहीतर तुमच्या आयुष्याच वाटोळं होइल अशा अर्थाच्या धमकी वजा emails आपला काहीएक बिघडवू शकत नाहीत हे माहित असुनही अशा मेल लोक का इतरांना पाठवत बसतात?
३.प्रत्येक न्यूज़ चॅनल वर माहिती पेक्षा प्रश्न जास्त असतात. “क्या होगा इस शहर का?’,”क्यों बन गया वो खुनी?”, “क्या मिल सकेगा न्याय?”, “क्या हुआ था उस रात को?”…इत्यादि. पण फ़क्त प्रश्नच. उत्तर मात्र कधीच का नाही देत हे लोक? आम्हाला हे सगळं माहित असतं तर तुम्हाला सहन करत बसलो असतो का?
४.जागोजागी उघडलेली रेस्तोरंट्स आणि हट्टाने त्यांना दिलेली वेगळीशी नावे. उदा. ‘salt n paper’, ‘ginger’, ‘sweet chilly’ etc. etc. अजुनही एकही मराठी होटेल ‘आलं लसूण’, ‘मिरची कढीपत्ता’ वगैरे अशा नावाने का नाही उघडलं कोणी?

आजकाल च्या अनेक हिंदी मराठी सेरिअल्स बद्दल मला असंख्य प्रश्न रोज पडतात. ते लिहिणे म्हणजे स्वतःच्या चांगल्या आवडी निवडींचा अपमान आहे अस वाटल्यामुळे इथे लिहित नाही. तरी पण एक मात्र लिहिल्यावाचुन राहवत नाही..
५. अमुक अमुक गोष्टीवर / व्यक्ति साठी ‘पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत..’ हे वाक्य आता चावून चोथा झालय आणि त्या एकाच एक tone मधे ते आम्हाला एइक्वत नाही, किंबहुना एइकल्यावर चिड येते हे पल्लवी जोशीला अजुन कोणीच सांगितल का नाही? टाळ्या उत्फुर्त असल्याशिवाय काय मजा? तरीही जर प्रेक्षकांना फसवायचच असेल तर दूसरी काहीतरी खूण का नाही ठेवत कैमरा मागुन करायला?

Advertisements
  • Amit W
  • जून 19th, 2009

  Pallavi Joshi chya talya + judges chi badbad + Advertisements hya sagla nantar ganee aikaychi icha marte. 1 diwashi saglee ganee 1ka magomag 1 dakhva anee lokana (mala) kalva.

 1. hehehe. ek episode badbadicha aani breaks cha aani ek ganyancha…

 2. pallavi joshi halli jara jadi jhaleli disate nahi ka? she must go now!!

  • milindarolkar
  • जून 22nd, 2009

  Yaa post cha PART 2 sudhddaa liha. Changala ahe …vichar pravartak…

  • mipunekar
  • जून 22nd, 2009

  ती पल्लवी जोशी सदानकदा त्या डाव्या डोळ्यासमोरच्या केसांच्या बटी मागून कसं बघते समजत नाही. मलाच ते बघून त्रास होतो. वाटते कि सरळ जाऊन ती बट कानामागे तरी टाकावी नाहीतर १ तिला साजेसा hair band भेट द्यावा.

  आणि ते हृदयनाथ मंगेशकर कोणाच्या गाण्याबद्दल technical बोलू लागले कि पल्लवीचा चेहेरा बघण्यासारखा असतो. त्या कॅमेरा मन ला पण तो capture करण्यावाचून राहवत नाही. 🙂

 3. There has been much munching of “jordaar taalya” in public and print.

  She has taken it as compliment and it she thinks it is her claim to fame rather than a purely tasteless boring filler…

 4. @nachiket: “mag tar prashnach mitala…”
  @punekar: ya programs madhalya technical comments ha suddha eka swatantra post cha vishay aahe. 😀
  @Milindji: thanks. jas jas suchel tas tas nakkich lihit jaain.
  @mahendraji: Jadepanashi wawad nahiye pan tichya kapdynachi color combinations ha matr amha stri jaticha aawadata vishay aahe, tika karnyasathi. 😀

  • ckt
  • जून 27th, 2009

  pallavi joshi tar pakawatech, ti vaishali samant agadi dokyat jaate mazya. pratyek baLache gaaNe zalyavar hiche laaDelaaDe “kaay baai, kaay madam, masta barr kaa.. majja ahe baai” vagaire suru zale ki mi channel badalatoch. gharache vaitagatat mazyavar pan mala agadi sahanach hot nahi.(that’s so strange becoz I’m well known for my gr8 patience 4 handling irritating people!)

  sahi lihilayes.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: