शापीत राजपुत्र


मायकल जॅकसन गेला.

अजुनही जग त्या धक्क्यातून पुर्णपणे सावरलेलं नाही.

शतकामधून एखद्याच व्यक्तीला असं यश मिळतं.

त्याच्या आयुष्यावर खुप लिहिलं वाचलं गेलय. त्यातल्या चढ उतारांनी खुपदा अस्वस्थ झालीत अनेकजणं. पण त्याच्या म्रुत्युनंतर देखिल आली नाही इतकी अस्वस्थता, मागोमाग येणाऱ्या बातम्यांनी आली आहे.

ज्याचं शरीर इतक पोखरलेलं होतं, त्याच मन किती पोखरलेलं असेल? इतकी लोकप्रियता की लोकांनी रक्ताने पत्र लिहावीत, त्याच्या एका दर्शनाने बेशुद्ध पडावं! रत्न्जडीत आयुष्याचा धनी. आणि त्या रत्नांखाली एक रक्त्बंबाळ, वाळवीने पोखरलेला सांगाडा? इतकी विटंबना? इतका विरोधभास?

अमेरिकन celebrity आणि ड्र्ग्स हे common च. शिखरावर माणुस एकटा असतो हे सत्य सुद्धा घोटीव. मग इतकी अस्वस्थता का?

असंख्य मनं जिंकणार्या या जादुगाराला, स्वतःचं दुबळं वारु मात्र नाही काबीज करता आलं.

वैयक्तिक आयुष्य सुद्धा अमेरिकन स्वैरचार आणि भोगवादाचा परिपाक.

एका सम्राटाचं आयुष्य, पड्द्यामागे आणि समोर..एखाद्या चांदीच्या सुन्दर नक्षीकाम केलेल्या प्याल्यात तितकच सुन्दर दिसणारं विष असावं तसं.

आयुष्यातला हा पोकळपणा भरून काढ्ण्यासाठीच का उभारायचे असतात महाल, झाकून टाकायची असतात सगळी ठिगळं जरीकाठांनी? सौंदर्य़ हे नेहमीच शापीत असतं का?

Advertisements
  • mugdhamani
  • जुलै 1st, 2009

  हो..कदाचित सौंदर्य हे शापितच असतं.
  छान लिहिलंय..

 1. एका सम्राटाचं आयुष्य, पड्द्यामागे आणि समोर..एखाद्या चांदीच्या सुन्दर नक्षीकाम केलेल्या प्याल्यात तितकच सुन्दर दिसणारं विष असावं तसं.

  Exact Words.. !!!

  • अनिकेत
  • जुलै 1st, 2009

  खरं आहे, त्या बातम्यांनी मनाला अजुन वेदना होतं आहेत. कित्ती सहन केले असेल त्याने? 😦 त्याचेच ‘You are not alone’ गाण्याचे काही बोलं :

  Another day has gone
  I’m still all alone
  How could this be
  You’re not here with me
  You never said goodbye
  Someone tell me why
  Did you have to go
  And leave my world so cold

  For you are not alone
  For I am here with you
  Though you’re far away
  I am here to stay

 2. खरोखरच शापित राजपुत्र. आणि तो त्याचं आयुष्य सुद्धा एखाद्या परिकथेतील शापित राजपुत्रासारखाच जगला. अतिशय योग्य उपमा वापरली. त्याने त्याचं मन आणि शरीर स्वत:च्या कृत्याने पोखरलं पण आता बातमीदार आणि टिव्ही चॅनेल्स त्याचं उभं आयुष्यच पोखरुन काढताहेत.

  • jivanika
  • जुलै 2nd, 2009

  खूप नेमक्या शब्दात लिहील आहे. का कुणास ठावूक पण त्या माणसाचा मृत्यू मनाला चटका लावून गेला. त्याच्या नशिबाने त्याला जितकं दिलं त्यापेक्षा जास्त त्याच्याकडून हिसकावून घेतलं. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो.

  • inkblacknight
  • जुलै 7th, 2009

  मला तरी त्याच्या अशा जाण्याच कितीही वाईट वाटल तरी खुप आश्चर्य अस नाही वाटल. एल्विस प्रीस्ले, (ज्याच्या मुलीशी ह्याने लग्न केल होत) शिवाय असे अनेक गायक, अभिनेते, मग ते अमेरिकेतले असोत किंवा आणखी कुठल्या देशातले, अशाच दुखांत शेवटाला सामोरे गेलेत …

 3. kay sahi lihlays g..
  kharya MJ fan la samjel tula kay mhanaychay!

  kadhi kadhi vatta, MJ la nakkich khup fan following hota, parantu mrutyu nantar jitka prem tyala milala titka adhi milala asta tar ?

  chatka lawun gelay yar to! Mrutyu, ekatepana, apali mansa, prem hi kahi antim satya asatat ani prasiddhi,paisa fame ya goshti kshanabhangur he tyani nakkich shikvla!

  • prakash
  • जून 6th, 2011

  khup chhan lihale ahe…mala mj baddal tyacya vaiyaktik jivana badal ajun mahiti havi ti pan marathi madun..kote milel..

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: