३ बाय ५ ची गॅलरी


 

आपल्या ३ बाय ५ च्या गॅलरी मध्ये जेमतेम मावणाऱ्या आराम खुर्चीत बसून आप्पा करमरकर दूर टक लावून पाहात बसले होते. दूर पाहण्यासारखे तरी काय होते म्हणा. मुंबईतल्या गजबजलेल्या वस्तीत अर्ध्याहून अधिक आयुष्य सरल्य़ानंतर ह्या तीन मजली इमारतीमध्ये हा ३ खोल्यांचा ब्लॉक जेव्हा त्यांनी खरेदी केला तेव्हा त्यांना कोण समाधान वाटलं होतं! त्यावेळी ह्याच गॅलरीमधून दूर नजर टाकली की तुरळक इमारतींखेरिज बाकी सगळी शेतं होती. मोकळा वारा सैरभैर वाहायचा. दिवसाचा शिण विरून जायचा. कर्जाचे हप्ते सुद्धा विसरायला व्ह्यायचे. आता मात्र समोरचा रस्ता सोडला की नजर जाइस्तोवर फ़क्त खुराडी. कॉंक्रिट्ची. गाड्यांचे घणाघाती आवाज. या घरात वारा उजेड खेळायचे कधी काळी हे सांगून पटणार नाही. हे घर घेतलं तेव्हा वाटलं होतं की जीवनाची इतिकर्तव्यता झाली. या शहरात स्वतःचं हक्काचं छप्पर मिळवलं. इतकी वर्ष नोकरी केल्याचं सार्थक झालं.

आप्पांनी, घरात एक नजर टाकली. दिवाणखान्यात दाटीवाटीने बसलेलं फ़र्नीचर, शोकेस मध्ये दाटीवाटीनेच बसलेले काहीबाहि शोपिस, काचेत अडकवलेले फोटो, दारवरचं धुळित माखलेलं लोकरीचं तोरण. हे आक्काने स्वतः विणलेलं. वास्तुशांतेला दिलं होतं. अजूनपर्यंत ठेवलय तसच. सुरवातीला सौ आठ्वणीने धुवायची वारंवार. मग गात्र थकली तशी… मुलांचं चाललं होतं, काढून टाकूया म्हणुन. चांगलं नाही दिसत मित्र मैत्रिणींसमोर. तरी हट्टाने ठेवलं. आक्काची तेव्हढी एकच आठवण तर होती! पण या पोरांना तरी काय बोलणार? जग बद्लत गेलं, ते बघत तीही भारावून गेली. समोर टॉवर उभे राहिले, त्यांच्या खिडकीतून श्रीमंती थाट डोकावू लागला, आणि ते तोरण त्यापुढे अधिकच केविलवाणं दिसायला लागलं. आप्पांचे डोळे आक्काच्या आठवणीने भरून आले. तिच्या हातचं लिम्बाचं लोणचं अजुन आठवतं. ती गेली तेव्हा खराखुरा पोरका झालो! सौ सुद्धा सगळं आक्काला विचारून करायची.

सौ वरून आठवलं. आज तुळशीला पाणीच नाही घातलं! आप्पा धड्पडत उठले आणि स्वयंपाकघराकडे गेले. भिन्तीवरच्या देवघरातल्या मिणमिणत्या बल्बच्या प्रकाशात त्यांनी पाण्याची लोटी चाचपड्त्या हातांनी घेतली. त्यांचा जाड भिंगाचा चष्मा लकाकला पिवळ्या प्रकाशात. गॅलरी मध्ये कोपऱ्यातल्या कुंडीत त्यांची तुळस तग धरून होती. कुंडीवरच्या शेवाळ्याची तिला सोबत. बाकीची झाडं केव्हाच वाळली. पाणी घालता घालता पुन्हा आप्पांना सौ आठवली. ती आणि तिची झाडं! पोरकेपणा काय हे आक्का शिकवून गेली आणि एकटेपणा काय हे सौ गेल्यावर समजलं. आप्पाना आठ्वणी असह्य झाल्या! तसे ते टी व्ही कडे वळले. उगिच काही बाही बघत बसले. नाही नाही म्हण्ताना सुद्धा राहून राहून लक्ष सौ च्या फ़ोटोकदे जात राहिलं. आणि बाजुलाच ठेवलेल्या फ़ॅमिली फ़ोटोकडे सुद्धा. तरुण दिसतोय या फ़ोटोत नाही? सौ सुद्धा आपली आवडती साडी नेसलीये. रोहन आणि रश्मि..किती भाबडे दिसतायत. या जागेत आल्यावर काहि महिन्यातच काढलाय हा. आप्पा पुन्हा एकदा भूतकाळात शिरले. त्यांचं अडिच खोल्यांचं गोकुळ आठवताना जाड भिंगातूनही त्यांचे हसणारे डोळे कोणालाही टिपता आले असते. त्या फ़ोटोतल्या चेह्र्यांवरचं समाधान ते पुन्हा शोधायला लागले तसे त्यांचे डोळे अधिकच केविलवाणे झाले. पिल्लं मोठी झाली तशी त्यांचे पंख मावेनासे झाले या घरट्यात. उडून गेली. कशासाठी उभं केलं हे?

त्यांची नजर पुन्हा रीकामी झाली. सौ च्या फ़ोटोकडे पाहत त्यांनी विचारलच तिला, “कमी पडलो का मी?”. सौ च्या चेह्ऱ्यावर मात्र नेहमीचचं समाधान. अंगणातल्या बागेची हौस या ३ बाय ५ च्या गॅलरी मध्ये रुजवली तिने. पडवीतल्या झोपळ्यावर बसून निवांत गप्पा मारायचं त्या दोघांचं स्वप्न सुद्धा या डोलणाऱ्या आरामखुर्चीत माववून टाकलं. ही आरामखुर्ची तिनेच दिली होती साठीला. पैसे साठवले होते भिशिचे दोन वर्षं. पाहुणे, रावळे गेल्यावर हाच प्रश्न विचारला होता तिला त्या संध्याकाळी. तेव्हा कुंडितल्या अळवावरच्या थेंबाकडे बोट दाखवत म्हणाली होती,” त्या थेम्बाकडे बघा. अक्ख आभाळ आहे त्यात. याला म्हणतात समाधान. एरवी त्या आभाळासाठी समुद्र सुद्धा अपुराच ना? मला सामावून घेता आलं त्याहून अधिक देत आलात. मी समाधानी आहे.” आप्पांनी डोळे घट्ट मिटून घेतले. पापण्यांच्या कडेवरचं पाणी कधिचच सुकून गेलं. खुर्ची हलायची केव्हाच थांबली. आप्पांना कळलंच नाही. ३ बाय ५ च्या या गॅलरी मध्ये आता फ़क्त एक तुळस असते. सुकलेली.

 

Advertisements
  • mipunekar
  • जुलै 20th, 2009

  display madhe kahitari problem ahe. mala watala mach post vachata yet nahiye pan ajubajula pan konala kahi kalat nahiye. May be republish karavi lagel.

  sagali post [text] ashi disat ahe–> ” AÉmmÉÉÇlÉÉ MüVûsÉÇcÉ lÉÉWûÏ. 3 oÉÉrÉ 5 crÉÉ rÉÉ aÉäsÉUÏ qÉkrÉå AÉiÉÉ ÄTü£ü LMü iÉÑVûxÉ AxÉiÉå. xÉÑMüsÉåsÉÏ. “

 1. sagaLEe encoding try keli…pan kahee zepat nahiye :S

  • आल्हाद alias Alhad
  • जुलै 20th, 2009

  मला मात्र व्यवस्थित वाचता आलं… शेवट सुंदरच केलायंस.

  युनिकोड्शिवाय दुसरा कुठला तरी फॉंट वापरलेला दिसतोय. सगळं एकदा नोटपॅडमधे कॉपी-पेस्ट कर मग बरहातून युनिकोडून रीपोस्ट कर.
  @ Yawning Dog, mipunekar
  ANSI Encoding should work. Try it.

  शुभेच्छा!

  • Ckt
  • जुलै 20th, 2009

  sahee lihilayes. 😦

  • YD
  • जुलै 21st, 2009

  क्लासिक, आप्पांचे व्यक्तिमत्व उभे राहिले डोळ्यासमोर !

  ——————————————
  अडचण अशी होती की, बरहा ८ मधे लिहिले आहेस तू. बरहा ८ ttf इन्स्टॉल करते मशिनवर आणि मी बरहायुनिकोड वापरतो त्यामुळे हे फाँटस नव्हते माझ्याकडे.
  बरहा ८ टाकल्यावर दिसले पोस्ट.
  आल्हाद थँक्स फॉर द टिप.

 2. thanks for compliments. Weglya prayatnala daad dilyabaddal manapasun aabhar. aata disel nit. Unicode madhe save kelay aata.

  • mipunekar
  • जुलै 21st, 2009

  wow. khupach sahi. appa dolya samor ubhe rahile.

  कुंडीवरच्या शेवाळ्याची तिला सोबत. Ek number…. Keep it up…..

 3. मस्त. आणि फारच गंभीर. काही गरज आहे का एवढे गंभीर लिहायची 😀

 4. http://t13n.googlecode.com/svn/trunk/blet/docs/help_mr.html हे वापरून पाहिलेत का? आणि हे? http://www.google.com/transliterate/indic/Marathi

 5. पहिल्यांदाच लिखाणाचा हा फॉर्म वापरलास ?

  ए…!! रोजच्या जगण्यावर नेहमी लिहितेस तितकंच हे ही छान झालंय.. नवीन प्रयत्न वाटत नाहिये.. (माझ्या घरी पदार्थ बिघडला की मी त्याला “शिरा:एक निराळा प्रकार” असं म्हणतो..)

  पण तुझा निराळा प्रकार मुळीच झालेला नाही.. खूप सुगरण टाईप छान झालाय..

  लिही सोनल..लिही..

 6. Thanks nachiket. Kuthe gayab hotas itke divas?

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: