सिंपल लॉजिक


“अय्या काय मस्त धावतायत बघ दुड दुड करत ते गाय आणि वासरू..” आरे कॉलोनी मधून जाताना रहदारीच्या रस्त्यात त्या माय लेकरांना बघून मी म्हणाले.
“ते मस्त दुड दुड करत अंगावर आले न की बघ. अजुन मस्त वाटेल” माझा नवरा.
हे असलं नेहामिचच. मी कित्ती छान, गोड, क्यूट, वगैरे आशा एकेक पायर्या चढत स्वप्नांच्या ढगाशी जाउन पोचणार इतक्यात माझ्या पायाखालची शिडी काढून घेत हा मला जमिनीवर धड़कन आपट्णार.
हा स्त्री आणि पुरुष यांच्यामुलभुत फरक आहे. अगदी हमखास. YD च्या भाषेत ‘विचार करणारे मेंदुताले थ्रेड’ हा टैग फ़क्त मुलांच्या डोक्यात असतो. मुलींच्या डोक्यात ‘स्वप्न बघणारे मेंदुताले थ्रेड’ असतात फ़क्त.
हे असं अगदी पावलोपावली होत राहतं.
मी ह्याला फोनवर म्हणायच प्रेमाने की मी तुला मिस करतेय…आणि याने तिकडून पचका करायचा “मिस काय करायचय? बोलतोय न तुझ्याशीच फोनवर? कायमचा गेलो नाहिये मी अजुन”
आता ही वस्तुस्थिति माहीत नाहिये का मला? फोन पण मीच लावलाय न? कारण ‘सुखरूप पोचलो’ हे सांगण्यापलिकडे फोन करत राहणे म्हणजे ‘फालतू बडबड’. ‘काय जेवलास?’ हा तर अतिशय अनावश्यक बाळ्बोध प्रश्न. मुलांच्या दृष्टीने.
घरातली तमाम कामं पार पडल्या शिवाय माझा वीकएंड सुरु होत नाही. आणि वीकएंड ची काम पुढच्या वीकएंड वर ढकलण्याइतक सोप काम नाही त्याच्या लेखी.
हा अचानक पिक्चर च प्रोग्राम ठरवून मोकळा होणार. आणि मी मनातल्या मनात आधी “घरी काय काय commitments दिल्यात, उशिरा पोचलो तर काय काय होइल, मग सकाळी उठलो नाही तर अजुन काय काय होइल किंवा होणार नाही” याचा हिशोब मांडत बसणार. आणि मग घरातल एखादं कबूल केलेलं काम न होणे, आपल्यावर इतरांनी अवलंबून असणे वगैरे या गोष्टींच गांभीर्य कळलं तर ते पुरुष कसले? सगळ्या ठिकाणी यांच प्रैक्टिकल लॉजिक लावून मोकळे!
आम्ही मुली सगळं एक्सप्रेस करत बसणार. सांगत बसणार, सगळ्या आजुबाजुच्या गोष्टींची संगती लावत बसणार. हे कधी कधी खुप कठिण होत जात तेव्हा तुम्ही लोक तड़क मुळ प्रश्नाला हात घालत सगळ पाल्हाळ कापून टाकणार. अशावेळी ते बरही वाटतं. . बाकी घरात कित्तीही पसारा घालोत. कितीही काम विसरोत. आयुष्य सोप करून जगणं पुरुषाना जास्त चांगल जमतं. हे आपल माझं आणि निव्वळ माझ generic मत आहे. I am not gender bias.

याच पार्श्वभूमीवर हा पुढला संवाद.

…………………………………………………………………………………………

“माला कंटाळा आलाय आयुष्याचा”
“अरे बापरे! एकदम आयुष्याचा कंटाळा?”
“हो…”
“म्हणजे अधल मधल काहीच जमणार नाहिये का? negotiable आहे का हा कंटाळा?”
“नाही…मला काहीही negotiate करायच नाहिये..”
“अच्छा. म्हणजे आयुष्याच्या खालोखालाच काहीच चालणार नाहिये तर!”
“नाही. ”
“तुला माहितीये का की आपल्याला ज्या गोष्टीचा कंटाळा येतो तीच आपण काय करतो ते? एकतर ती गोष्ट संपवून टाकतो, किंवा avoid करतो. यातला पहिला पर्याय नाही स्विकारू शकणार तू…दूसरा…”
“माला चैलेन्ज करतोयस?”
“छे  चैलेन्ज काय करायचे त्यात? हे सिंपल लोजिक आहे. अजुन तू आयुष्याच्या निम्म्यावर पण पोचलेली नाहीस. म्हणजे तुझ्या हातात फ़क्त २८ वर्ष आहेत..हक्काची, तुझ्या मालकीची. उरलेली वर्ष म्हणजे आयुष्य अजुन तुझ्या नावावर झालेलच नाहिये.  मग ते तू संपवणार कस? आणि तुझ्या मालकीची वर्ष तू already जगलेली आहेस. ते पण ‘undo’ करण शक्य नाहिये. anyways, लोकांना इतक्या वर्षात अजुनही आयुष्य सम्पवणे आणि शरीर सम्पवणे यातला अर्थ कळलेला नाहिये”
“तुझ्या लॉजिक चा पण विट आलाय माला”
“There you said it right…”
“?”
“आता कस to the point  बोललीस. नेमका कसला कंटाळा आलाय ते समजल की अर्धा प्रॉब्लम solve होतो. म्हणजे मग ती गोष्ट सम्प्वायाची की avoid करायची ते ठरवता येत.”

“मला नाही समजत हे सगळ. मला इतकच कळ्तय की मला सगळ्या गोष्टींचा कन्टाळा आलाय. नुसतच धावायाच दिवसभर. सकाळपासुन संध्याकाळपर्यंत. राग यायला लागलाय सगळ्यांचा. सकाळी बेल वाजवणार्या दुधवाल्यापासून, ते कामवाली पर्यंत, त्या मुरकुट्या बॉस पासून ते त्या नतद्रष्ट क्लायंट पर्यंत. आणि .”
“नाही धावालिस तर काय होइल?
“माहीत नाही. पण नाही धावले तर सगळ्यांचा नजरा रोखतिल. अंथरुण पांघरूण तशीच राहतील, ओट्यावरचा पसारा तसाच राहील, टेबल वरच्या files धूळ खात पडतील. जेवायला  कोण घालेल तुम्हाला? आधीच रात्री उशिरा आल्यावर माझ्या साठी जेवायला थाम्ब्लेल्या तुम्हा सगळ्यांचा सुद्धा राग यायला लागलाय. अजुन अपराधी वाटायला लागत. त्यात भरच पडेल. ”

“राहू दे पसारा तसाच. बाहेरून मागवून जेवू. डबा लावू. आजपासून तू यायच्या आधीच हव तर . जेवून ओटा आवरून झोपुनही जावू. चालेल? नाही गेलीस ऑफिस ला तर कोणीतरी तुझ काम करेलच. तुझा मुर्कुट्या बॉस स्वस्थ थोडाच बसेल?  दूधवाला बेल वाजवून निघून जाईल”
“अस कस म्हणतोस  तू? इतक सोप नसत सगळ.रोज बाहेरच जेवण? माझ्या हातची चव येइल का? नुसती पोट भरण्यात काय अर्थ आहे? आणि झोपून जावू म्हणायला काहीच वाटत कस नाही? म्हणजे जेव्हढ्या होतात तेव्हढ्याहि गप्पा होणार नाहित. ”
“पण याच सग्ळ्याच कंटाळा आलाय न तुला?”   
“नाही रे. तस नाही.”
“तुझ्या आवडीची गाणी लावुया? तलत महमूद किंवा RD?”
“त्याचा सुद्धा कंटाळा आलाय. नको वाटतात ती गाणी.”

“मग काय करायचय नक्की?”
“माहीत नाही. पण राग येतोय मला सगळ्यांचा.”
“ओफीसमधे काही झाल का? मुर्कुट्या बारोबर? की त्या तुझ्या लाडक्या अत्रे बाई काही बोलल्या?”
“त्या बोलल्याच. नेहमीसारखाच खवट. काय आज पण मुलीच्या शाळेत गेली होतीस वाटत..ह्या ह्या ह्या, जस काही मी खोट बोलले होते. आता त्यांना काय सांगू? रिक्शा वाल्या बरोबर भांडण झालं म्हणुन? त्याने मुद्दाम लाम्बुन आणली रिक्शा. मी सांगत होते त्याला तरी. मग मी पण अडून बसले. म्हटल नाही देत इतके पैसे जा. त्याला पण चरबी कमी नाही. सुट्टे नाहीत म्हणतो. असे माजलेत न हे सगळे. त्यांना माहिती आहे, त्यांच्या शिवाय चालणार नाही लोकांच.”
“ओह…त्याचा राग होय? by the way रिक्षाने का गेलीस आज? नेहमी तर जात नाहीस.”
“ते अजुन एक सकाळी सकाळी. उशीर झाला न. रस्त्यात ते नेहमीचे काका भेटले. फुकट सल्ले द्यायला कोण पैसे देत का त्यांना. म्हणे आता भावंड आणा छकुलीला. ह्यांच काय जात? मग एक lecture, pant घालण्यवरून, तरी बर यांची नात काय काय घालून फिरते ते सगल्या जगाला माहिती आहे”
“बर पुढे?”
“आता काय पुढे? उशीर  झाला म्हणुन रिक्शा केलि..सग्ळ्यानि मिळून आज डोक फ़िरवलय. ”
“गरीब बिचार्या चिमणीला सारे टपले छळण्याला…”
“तुला काय जातय गाणी म्हणायला? भांडी घासायला गेले तर पाणी गेल नेमक. ही लक्ष्मी आली असती वेळेवर तर एव्हढा गोंधळ झाला नसता न. आणि यायच नव्हत तर काल सांगायला का झालं होत? तोंड धरल होत का तीच मी? या कामवाल्या बायका पण न फायदा घेतात अगदी. इतक्या सुट्ट्या होतात तिच्या. कधी काही बोलते का? पैसे सुद्धा कापत नाही तिचे. जाऊ दे बाई, देतोय न देव मग कशाला त्या गरीबाच्या जिवावर उठा! पण तिला काही कदर आहे का बघ. सांगुन रजा घे असं हजारदा सांगीतलय. कालच बोलली असती तर आयत्या वेळी घाई झाली नसती न माझी. पुढ्च्या अक्ख्या दिवसाची वाट लावली नुसती…”
“ओह्ह्ह्ह..so the root cause is लक्ष्मी. त्याच्यासाठी अक्ख्या आयुष्याचा कंटाळा? एक काम करुया. दूसरी बाई शोध किंवा मग dishwasher घेउन टाकूया.”

…………………………………………………………………………………

Advertisements
 1. अगदी सही सही लिहिलंय.. आमच्या घरी पण कामवाली मावशी आली नाही की अगदी अस्संच होतं !! मस्त लेख आहे. मनापासुन आवडला..

  • Gayatri
  • जुलै 28th, 2009

  छान लिहिलयेस 🙂
  कंटाळा/चीड-चीड हा accumulated result असतो घडलेल्या, बिघडलेल्या अन अडलेल्या गोष्टींचा…

  • Catch
  • जुलै 28th, 2009

  मस्त ! वरचा परिच्छेद व संवाद एक्दम झकास. लग्न न करता सुद्धा लग्नानंतरचे संवाद मनात तरळुन गेले. धन्यवाद/

  • Ckt
  • जुलै 28th, 2009

  सही.. मी मागे ’मेन आर फ़्रॉम मार्स, वूमेन आर फ़्रॉम व्हिनस’ पुस्तक वाचलं होतं त्याची प्रकर्षाने आठवण आली. त्यात सिंपल ऍनॉलॉजी दिली होती – वूमेन आर लाईक होम इम्प्रूव्हमेण्ट कमिटी, आणि मेन आर ’मिस्टर फ़ि़क्स इट!’.. आणि अजून बरंच काही.. तिला वाटतं की त्याने तिचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते फ़क्त सविस्तर ऐकून घ्यावेत. तिला त्याबद्दल सिम्पथाईज करावं. पण तो असतो की, आला प्रॉब्लेम समोर की काढ तोडगा, पाड त्याचा फ़डशा! अशाने ’कम्युनिकेशन’ कसं होणार बरं दोघांत? ही तिची नवी समस्या!

  • आल्हाद alias Alhad
  • जुलै 28th, 2009

  @ सोनल वायकूळ,
  मस्तच जमलाय लेख! आयुष्याचं असू दे पण ब्लॉगिंगचा मात्र कंटाळा येउ देउ नका!!

  @ Ckt,
  ’कम्युनिकेशन’ साठी काही चांगलं बोलता नाही का येणार? त्यासाठी प्रॉब्लेम्स का बरं सांगावेत??

  • Ckt
  • जुलै 28th, 2009

  alhaad, tu punha purusha sarakha vichar kelas. kadhi baai chya manaane vichar karun bagh. problems share karun ji ek jawaLik nirmaaN zalyacha vaTata, te dusarya kashsha-kashshaane vaTat nahii. :-p

 2. @ gayatri, mahendraji, Ckt, Alhad, catch:
  Manapaasun Thanks. asach lobh raahude.
  @ckt, “tu punha purusha sarakha vichar kelas” LOL 😀

  • आल्हाद alias Alhad
  • जुलै 29th, 2009

  पण अहो Ckt उर्फ सर्किट,
  मला फक्त पुरूषाप्रमाणेच विचार करता येतो! थोड्या वेगळ्या प्रकारे विचार करुन पाहिल्यावर लक्षात आलं की अरेच्या हो की … … … तमाम मैत्रिणींचे हेच तर उद्योग असतात! अर्थात, सठीसामाशी फोन करून प्रॉब्लेम्स गिरवत बसतात म्हणून डोक्यातही जातातच. आणि फोन केला म्हणून बरंही वाटतंच!

  • Sachin
  • जुलै 30th, 2009

  छान लिहिलयेस 🙂

 3. मला खरंच नाही वाटत की मुलींच्या अशा काही ख़ास ट्रेट्स असतात फ़क्त मुलगी असल्यामुळे एंड इन इटसेल्फ़.. ..

  साधारण या सर्व अक्वायर्ड गोष्टी आहेत की काय असं वाटतं..

  ..मुलगी म्हणून मोठं होताना हळुहळू डेव्हलप होणाय्रा..

  पुन्हा म्हणशील की पुरुष असल्यानं analytical झालो.. 🙂

  … आवडलं हे पोस्ट..

  मुख्य म्हणजे इतक्या छान विचार करणाय्रा मुली जगात आहेत याचा आनंद आणि आपल्या वाट्याला आलेलं कलत्र तसं का नाही याचा खेद…

  • YD
  • जुलै 31st, 2009

  Oochha ahe he post.Me itakya usheera ka vachale he kalena.

  Kiti patiently sagale aikun ghetale ahe bicharyane 🙂

 4. malahi jaam awdlay post ! mi tujhyasarkhich, ani maza navra hi tujhya navryasarkhach distoy!! 🙂 jam hasle.. 🙂

 5. @YD: . ek future (ki present?) nawra boltoy he.nawre nehmich swatahla bichare samjtaat. 😀
  @bhagyashree: Thanks. kahi goshti baapjanmat badlat naahit. tyatalich hi ek. 🙂

  • Prasad
  • ऑगस्ट 18th, 2009

  khupach chhan lihale aahe……
  khup aavadala lekh…

  • sahajach
  • ऑगस्ट 22nd, 2009

  किती दिवसानी वाचतेय तुझ्या पोस्ट…..आणि एक खर खर सांग ही पोस्ट लिहिण्याआधी माझ्या घरात डोकावली होतीस का सहजच…….त्याशिवाय हे डिटेल्स येव्हढे कसे जुळतात!!!!

  शब्द आणि शब्द पटला…….असेच असतात हे नवरे आणि आपण बायका सुद्धा……
  @ Ckt मी पण वाचलय ते पुस्तक त्यामुळे पटतय तुझे म्हणणे…..

  • Sonal
  • सप्टेंबर 1st, 2009

  hehehehhe. kasal mandate milalay mala ‘navra’ hya wishyawar!

 1. सप्टेंबर 5th, 2011
  Trackback from : Twitted by SEOBmallow

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: