डुक्कर ताप


आई डुक्कर: अरे किती वाजले बघ. उठ. …अरे डुकरा उठ.
बाल डुक्कर: (आळोखे पिळोखे देत) अग मला डुक्कर काय म्हणतेस? माणसं एकमेकांना डुक्कर कुत्र वगैरे म्हणतात. तू मला माणुस म्हणत जा.
आई डुक्कर: कळला तुझा शहाणपणा. चल उठ. शाळेला उशीर होईल.
बाल डुक्कर: आज सुट्टी आहे पण.
आई डुक्कर: कसली आता सुट्टी?
बाल डुक्कर: आता दहा दिवस सुट्टी आहे. डुक्कर तापाची साथ चालु आहे.
आई डुक्कर: त्यात काय नविन? दर वर्षी या दिवसात येत्तातच साथी. ज़रा चिखल नीट गरम वगैरे करून खायचा. मग नाही होत काही.
बाल डुक्कर: अग डुकराना नवीन नाही ते. पण माणसांना यावर्षी डुक्कर ताप येतोय.
आई डुक्कर: अग बाई हे नवीनच काहीतरी. आपले रोग त्यांना कधीपासून व्हायला लागले?
बाल डुक्कर: बातम्या बघत नाहीस का तू? बरीच माणसं मेली ह्या तापाने. बरोबरच आहे म्हणा. त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. आपल्यासारखी घाण चिखल खाती तर त्याना इतका त्रास न होता. त्याचं झालं असं. तिकडे दूर अमेरिकेत माणसं डुकरं फार खातात. एक प्रकारचा जुलुमच तो आपल्या बांधवांवर. त्यामुळे त्यांच्यात चिड पसरली होतीच. त्यात एक ठिणगी पडली. ह्या डुकराला आला होता ताप. त्यामुळे डोकं आधीच जड़ झालं होत. त्यात हा गोरा त्याला कापायला आला. ह्याचं डोकं जाम भड्कलं. ह्याचे खापर पणजोबा पण असेच भड़क डोक्याचे होते. अशाच एक गोर्याने त्यांची चरबी म्हणे काड्तुसाला लावली होती. त्यातून जो इतिहास घडला तो तुला माहितच आहे.
(डुकराची आई हे सगळं अगदी मन लावून कौतुक मिश्रित भावनेने एइकत होती. किती मोठा झाला माझा पोर हा हा म्हणता!)
त्यामुळे ह्या डुकराला ती चरबी वारशानेच मिळालेली. त्याचीच परिणिति म्हणुन हे डुक्कर त्या गोर्या माणसावर चक्क थुकलं. झालं. त्या गोर्याने अजुनच त्वेषाने त्याला धरून नेल. पण तोपर्यंत काम झालं होत. डुक्कर गेलं जिवानिशी आणि मग गोराही. त्याला डुक्कर-तापाने धरलं. आणि मग पसरतच चालल हे लोण.
असाच लढा मागे नन्दुरबारच्या कोंबड्यांनी देखिल आरंभला होता.
आई डुक्कर: पण बिचार्यांचं बंड चिरडून टाकलं!
बाल डुक्कर: खर तर हा लढा अहींसेच्या मार्गांनी लढायचा असच ठरवल होत डुकरानी. पण त्यांना काय माहीत, की एक डुक्कर-तापाचा विषाणु सशस्त्र बंड करेल म्हणुन! यात त्या विषाणुचा काय उद्देश आहे ते मात्र मला काही समजत नाही.
आई डुक्कर: असो. पण या ना त्या मार्गांनी डुक्कर समाजालाच मदत होतेय न.
बाल डुक्कर: ह्म्म्म.
आई डुक्कर: बर पण हे झाल अमेरिकेत. मग इथल्या माणसांना कशी काय बुवा लागण झाली?
बाल डुक्कर: जग जवळ येत चाललय आई. h1 घेवून गेले आणि येताना h1n1 घेवून आले झालं!
(आई डुक्कर आपल्या बाळाच्या द्यानावर अजुनच खुश झाली आणि कौतुकाने तिने आपली बोट कानशिलावर मोडली.)

Advertisements
 1. Majja aali..

  Dukkar taap..

  ha ha ha..

  …Varah-Jvar…

  • YD
  • ऑगस्ट 12th, 2009

  ha ha ha, bal dukkar anee aai dukkar, lol !

 2. “….h1 घेवून गेले आणि येताना h1n1 घेवून आले…”
  😀

 3. Good one.. h1n1!!

  • Jay
  • ऑगस्ट 12th, 2009

  Ha ha .. .very funny !! Keep it coming .. !!

 4. “जग जवळ येत चाललय आई. h1 घेवून गेले आणि येताना h1n1 घेवून आले झालं!”

  lol…:D:D

  • देवेंद्र चुरी
  • ऑगस्ट 16th, 2009

  mast aahe post….

  • sachin
  • ऑगस्ट 18th, 2009

  farach chan……….

 5. Out of imagination!
  It’s really genuine!!

 6. 🙂 अरे वा! झक्कास.. एक नंबर!!

  • sahajach
  • ऑगस्ट 22nd, 2009

  h1 घेउन गेले आणि h1n1 घेउन आले…मस्त

  • ngadre
  • ऑगस्ट 28th, 2009

  lihi ki ataa….khoop vel jhala..kevadhi gap??

 7. kay suru ahe??

 8. @nachiket, Jara project madhe budale aahe. Hopefully ya week madhe wel milel. Tyatlya tyat ek kavita khradali aahe blogspot war.
  @mahendraji: project suru aahe..jorat te pan. mala suddha chain padat nahiye lihilya shiway.

 9. छान संकल्पना मांडलीय.

 10. छान संकल्पना मांडलीय. http:mazyamana.wordpress.com, http:manachyakavita.wordpress.com,

  • Aparna
  • सप्टेंबर 11th, 2009

  1 घेवून गेले आणि येताना h1n1 घेवून आले झालं! sahi….

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: