शब्दांच्या पलीकडले!


कानात शिरत नाही का? बहिरा आहेस का? कानपुर में हरताल है क्या? ही वाक्य आपण येता जाता किती सहजपणे एखाद्याला बोलत असतो.
शनिवारी मात्र मी काही वेळासाठी का होई ना ह्या जगात प्रत्यक्ष प्रवेश केला. जव्हार ला प्रगति प्रतिष्ठान तर्फे चालवली जाणारी मूक बधिर विद्यार्थ्यांची शाळा आहे. वसतिगृह सुद्धा आहे. ही मूल अतिशय गरीब वर्गातली. आदिवासी पाड्यांमधली! आज पर्यंत कधीही आली नव्हती त्या आयुष्याची कल्पना! वास्तव. तिथली मूल जवळून पाहिल्यावर लक्षात आल की नशीबवान म्हणतात ते काय असत!
घरात टीवी वर गरिबीची, अशा अपंगांच्या शाळेचि चित्र बघून किंवा एखादी documentry बघून नाही कल्पना येवू शकत त्या जगाची. ती मूलं, त्यांना घडवणारे शिक्षक, त्यांची परिस्थिति, हे सगळं मुम्बइच्या चकचकीत सुखलोलुप सोन्याच्या पिंजर्यात बसून नाहीच समजू शकत कधी!
ह्यामुलांच आयुष्य म्हणजे निव्वळ अंधार. घरात पोटाला अन्न नाही. घालायला कपडा नाही. कानावर पडणारा प्रत्येक ध्वनि म्हणजे दगड फ़क्त. शाळा, डॉक्टर, ह्या गोष्टी म्हणजे luxuries, त्याही फाइव स्टार म्हणाव्या अशा. 
त्या अंधारात दिवा घेवून काही जगावेगळी ‘माणसं’ उभी आहेत. जन्म घेवूनही ज्यांना भविष्यच नव्हत अशांच्या आयुष्यात स्वप्न पेरू बघणारी.  
ह्य मुलानी आमच्यासमोर आदिवासी तारपा नृत्य सादर केल. कानावर सुर ताल काही पडत नसताना! एकही मूल चुकल नाही. संगीत असावं तर असं.
‘भाषा’  ह्या शब्दच अर्थ काय हे समजायचं असेल तर ह्या शब्दाशिवायच्या दुनियेत जावून यावं. माझी
दिड वर्षाची मुलगी त्यांच्या वर्गात जावून बसली. त्यांच्याबरोबर चित्र काढायला. त्यांच्याशी ती आणि ते तिच्याशी कुठल्या भाषेत बोलत होते हे ठावूक नाही. त्या वेळचा तिचा निष्पाप, कुठलेही ‘संस्कार’ न झालेला चेहरा, आणि मन, एखद्या कुपित बंद करून जपून ठेवावसं वाटलं मला. सहानुभूति दाखवण्यापेक्षा त्याना हे असं सहज आपल्या जगात सामावून घेण जास्त कठिण.
भाषा येणारे शब्दांना महाग, आणि शब्द सोडून बाकी सगळ्या भाषा जाणणारे हे खरे भाषा पंडित.

Advertisements
  • sahajach
  • सप्टेंबर 8th, 2009

  किती दिवसानी लिहिलस ग!! नेहेमीप्रमाणेच मस्त!!
  आमच्या नासिकच्या कॉलेजच्या बसमधे मुक बधीर शाळेतले मुलंही येत….स्वत:च्याच नादात संवाद साधत हसत खेळत प्रवास करत…….त्यांची आठवण आली.
  भाषा येणारे शब्दांना महाग, आणि शब्द सोडून बाकी सगळ्या भाषा येणारे हे खरे पंडित……..मनापासून पटले….

 1. सोनल
  आज खुपच सेंटि विषय घेतलाय लिहायला…..
  एका वाक्यात सांगायचं तर शब्दा वाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडचे.. असंच म्हणावं लागेल. जर ऐकु पण येत नसेल आणि तरिही जर इतका सुंदर नाच केला असेल तर खरंच क्रेडीटेबल आहे… सुंदर..

  • ngadre
  • सप्टेंबर 9th, 2009

  खूप छान केलंस तिथे जाऊन..
  मुलांना असंच जग दाखवलं पाहिजे..
  अनुष्काला नेलंस ते खूप मस्त..

  मलाही माझ्या पोराला न्यावंसं वाटतंय..

  लिहिलयंस ही खूप मस्त..

  • sonalw
  • सप्टेंबर 9th, 2009

  Nyayla haw mulanna agadi lahan wayapaasun. aadhich halli sagal materialstic hot challay, tyat hi competition aani bhar mhanun ‘hum do hamara ek’ he hi aahech! Mhanunach tyana tyanchya palikade ek jag aahe he baghayla shikawan khup mahatwach aahe. majhyakadun jitaka hoil titka prayatn karen. baghuya!

  • Aparna
  • सप्टेंबर 21st, 2009

  tu changala kaam keles ani ha anubhav tumchya doghinchya lakshat rahil…mala watata jas jaashi mula mothi astat tevha tyana kahi gosthichi celebrations dusaryana madat karun sajari karawun ghyawit..pahuya kasa kasa jamatay te….

  • Avdhut Joglekar
  • सप्टेंबर 27th, 2012

  छान आहे म्हणण्यापेक्षा. तिथे जाऊन पहा आणि नक्की काय करायला हवे ते कळेल. ….. ऐकू येण्यासाठी धडपड केली पाहिजे . .वयाच्या ३ वर्षापर्यंत मुलाला / मुलीला आवाज ऐकू येण्याचे प्रशिक्षण देण्यात हवे जेणेकरून तो बोलायला लागेल आणि जगाची संपर्क साधू शकेल……. हेलन केलर या व्यक्ती स्वतः मुकी बहिरी आणि आंधळी होती .. तिने एका पुस्तकात म्हटले आहे कि कोणतेही अपंगत्व यावे पण बहिरेपण येऊ नये.. हे तिने असे का म्हटले असावे? आवाजाचे महत्व आहे हे नक्कीच ओळखले असलेच…….. अनुभव म्हणून उदहरणसाठी तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेऊन पहा…….. तुमचा कार्यक्रम टीव्ही वर पहा तेही आवाज बंद करूनच…… खरेच कल्पना करवत नाही ….असे तुम्ही म्हणाल पण ते काल्पनिक नको आहे.. प्रत्यक्ष अनुभव घ्या म्हणजे आवाजाला किती महत्व आहे हे पण समजेलच…आणि मुख्य म्हणजे मूकबधीर हा शब्द चुकीचा आहे.. बहिरेपण आहे त्यामुळे मुकेपण येते. म्हणून कर्णबधीर हा शब्द योग्य वाटतो.. मी एक कर्णबधीर. (अवधूत जोगळेकर )

  • sonalw
  • सप्टेंबर 27th, 2012

  @Avdhut Joglekar
  Avdhut, Thank you.
  Tumach mhanan khar aahe. Fakt bolan khup sopp aahe. aapan sukhwastu asato tevha aapan fakt bolnyat aani aple wichar changle aahet yawarach samadhan manato. Kruti karnyasathi sonyachya pinjara todawa laagto. te dhadas far kami janat aahe.

  • Avdhut Joglekar
  • सप्टेंबर 27th, 2012

  आपण सगळ्यांनीच मनावर घेतले तर सहज शक्य आहे.. आजच लोकमत पेपर ला सखी पुरवणी मध्ये महत्वपूर्ण माहिती दिली आहे . कानान बहिरा मुका परी वर लेख आला आहे डॉक्टर अश्विनी गोडबोलेंचा लेख वाचा .. तुमचे सगळ्यांचे सहकार्य मिळणार असेल तर मी प्रोजेक्ट करतोय त्याला पण बळकटी येईलच… एक कर्णबधीर, अवधूत जोगळेकर . डेफ चे फायदे तोटे आहेत यावर प्रोजेक्ट करतोय आहे मी..

  • Avdhut Joglekar
  • सप्टेंबर 27th, 2012

  facebook var asal tar pls request kara. mi mostly Fb var asto..aplya vicharanchi saman aslele member ektra group karaycha vichar ahe only Deaf var project karanesathi

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: