बरसणं तसं सोप्प नसतच


ही कविता, काही झोकुन देणार्या आधुनिक संतांना पाहून स्फुरलेली!
——————————————————————–
एक ढग सारखा सारखा दाटून यायचा पण बरसायला मात्र घाबरायचा
बरसणं तसं सोप्प नसतच, महित्येय मला.

ते म्हणजे फ़क्त पडणं नसतं,
ते म्हणजे घडण असतं
आभाळाच्या हृदयातून
मातीच्या गर्भात शिरणं असतं
पुन्हा उगवून पोटातून
कणाकणात झरणं असतं

वाटेवरती भेटत जातात काही कोम्ब निजलेले
दगड गोटे सुक्या फांद्या काही ओन्डके थिजलेले
सगळ्याना भिजवत जायचं,
जमलं तर रुजवत जायचं

कोम्बातून फुटून हिरवा होतो ढग जेव्हा
दगडाला पाझर फोडत सागर होतो ढग जेव्हा…
कोसळण्याची भीती नसतेच,प्रश्न असतो अस्तित्वाचा.
ढग जेव्हा पाणी होतो, तो ढग म्हणुन उरतोच केव्हा?

असेच ढग जास्त असतात तुमच्या आमच्यात, नुसतेच फ़क्त दाटणारे
सोनेरी कडा मिरवत कापूस पिंजत बसणारे
अस्तित्वाचा काळा कापूस शोषून घेतो पाणी सारे
उरतात मागे काही थेम्ब आणि थोड़े षन्ढ उमाळे

कोसळणारे ढग तेव्हा काळी ढेकळं शिम्पत असतात
सुकलेली तापलेली कोरडी मने लिम्पत असतात
पुन्हा हवेत विरत जातात, पुन्हा पुन्हा दाटत राहतात
अस्तित्वाच्या प्रवासाला पुन्हा पुन्हा भेटत राहतात…

म्हणुन म्हटलं, बरसणं तसं सोप्प नसतच, महित्येय मला

Advertisements
  • Ajay Sonawane
  • सप्टेंबर 11th, 2009

  khupach chane, specially khalil lines khup aavadlyaa "कोसळणारे ढग तेव्हा काळी ढेकळं शिम्पत असतातसुकलेली तापलेली कोरडी मने लिम्पत असतातपुन्हा हवेत विरत जातात, पुन्हा पुन्हा दाटत राहतातअस्तित्वाच्या प्रवासाला पुन्हा पुन्हा भेटत राहतात…"

  • क्रान्ति
  • सप्टेंबर 11th, 2009

  surekh kavita ahe.

  • मनमौजी
  • सप्टेंबर 12th, 2009

  Wa Kya baat hai!!!! Apratim aahe. . . वाटेवरती भेटत जातात काही कोम्ब निजलेलेदगड गोटे सुक्या फांद्या काही ओन्डके थिजलेलेसगळ्याना भिजवत जायचं,जमलं तर रुजवत जायचंHya 4 oli jagaav kas saangun jatat!!!

  • gnachiket
  • सप्टेंबर 17th, 2009

  do you know Sonal?? With each new poem and each new line you are taking youself 10 flight levels higher in maturity and depth..In flight terminology its like upwards gust of hot air taking you up by thousand feet before you can blink..Great yaar..Best till now…

  • Ravindra Ravi
  • नोव्हेंबर 20th, 2009

  बरसण तस सोप नसतच मुळी. वा वा काय कविता आहे सोनल!

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: