conspiracy


हल्ली हे अस का होत कळत नाही. खूप काही लिहावसं वाटत. पण तो टेम्पो च येत नाही. इतक्या विषयांची गर्दी असते आजू बाजूला. पण कोणताच विषय आवडत नाहीये सध्या. तशी माझी मत खूप strong आहेत बर्याच विषयांच्या बाबतीत. कधी कधी जरा अतीच. पण हल्ली हल्ली खूप गोंधळायला होतंय. म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन किंवा अनेकदा दोनपेक्षा जास्तच बाजू असतात. आणि कधी कधी सगळ्याच बाजू पटतात देखील. म्हणजे राज ठाकरे ची मुलाखत बघितली कि त्याचं पटत. मग एखाद सुंदर संपादकीय वाचलं, ठाकरे आणि अबू आजमी special , की त्यांचा anti Raj view सुद्धा पटतो. आणि मग त्यावर पुन्हा एखाद प्रत्युत्तर असतंच. ते पण त्याच्या जागी योग्य वाटत. हल्ली हे सगळ्याच बाबतीत होत. Too much information is enough to confuse and at times paralyse a person ‘s thought process !
युरेका….exactly हेच करतय media आणि आपले politicians .
जनतेची विचार करण्याची क्षमता. त्यावर ह्यांचं सगळ अस्तित्व अवलंबून आहे. तिच्यावरच हल्ला करायचा. कधी लोकांना अशिक्षित ठेवून, कधी त्याना आमिष दाखवून आणि कधी त्यांना दिशाहीन करून. आणि ही conspiracy समजत असूनही आपण दिशाहीन होण पसंत करतो हे त्याहूनही भयानक सत्य आहे.
कारण एक दिशा धरून शेवटपर्यंत वाटचाल करणं हे दिशाहीन असण्यापेक्षा खूप कठीण आहे. आणि हे तुमच्या आमच्या पेक्षा त्या धूर्त लांडग्यांना चांगलच माहित आहे. याला म्हणतात public ची नस ओळखण!

Advertisements
  • hemant Kadlak
  • नोव्हेंबर 18th, 2009

  Khup chan lihites tu…
  me vachato baryachda…comment karnyat thoda alshi ahe.
  Nehamich ek tallakhpana ani soundarya adhalat ale ahe likhanat.
  likhanavarchya premachi hi saksh patat ali ahe.

  Hemant

 1. अगदी मनापासुन खरं काय ते लिहिलं आहे. जेंव्हा मी एक आर एस एस चा स्वयंसेवक म्हणुन विचार करतो, तेंव्हा राज चं म्हणणं अजिबात पटत नाही. तेच जेंव्हा एक मराठी म्हणुन विचार करतो तर राज चं बरोबर वाटतं.. काही अंशी..
  असंही वाटतं, की आता पुर्वांचलातल्या राज्यांची नावं पण आपल्या कडे मुलांना- कशाला मोठ्या माणसांना माहिती नसतात. तिकडले लोकं इकडे आले की आपण त्यांना तिबेटी किंवा चायनिझ म्हणतो. इतकी आपली ओळख आहे त्यांच्याशी.. तुम्ही एक सांगा नागालॅंडची राज्य भाषा इंग्रजी आहे, हे किती लोकांना माहिती आहे? अर्थात इथे कोणाला किती ज्ञान आहे हे चेक करायला हे प्रश्न लिहिले नाहीत , तर केवळ एक भारतिय म्हणुन या प्रश्नाचि ग्रॅव्हीटी लक्षात यावी म्हणुन लिहिलंय. आपणच आपल्याच देशातल्या लोकांना फॉरिनर सारखे वागवतो.
  मी जेंव्हा सिक्कीम ला होतो, तेव्हा एका नदिच्या पलिकडे रहाणारे लोकं, जेंव्हा नदी पार जायचे तेंव्हा जरा ईंडीया जाके आता हू म्हणायचे. ऐकुन कसं तरी व्हायचं.. पण ….

  आता याच परिस्थितीशी महाराष्ट्र कम्पेअर करा.. आणि बघा, काय होतं ते.. नुसतं मराठी मराठी म्हणुन ते इतरांना इथुन घालवुच शकत नाहीत. कारण त्या अनधिकृत झोपड्या अधिकृत करणारे हेच ते नेते आहेत. यांच्या व्होट बॅंकला हात लावु देणार नाहीत कधिच.. आणि तुमच्या आमच्या भावनांशी खेळत राजकारण करतिल हे लांडगे..

  मला बरेचदा असंही वाट्तं की जसे आसाम मधली जनता विद्यार्थीनेत्यांकडे पहाते जास्त अपेक्षेने.. आणि त्यांना निवडुन देते. पण नंतर ते पण या सत्तेच्या मदलालसेने न्हाउन निघतात आणि लोकांना विसरतात.. नेमकं हेच तर होत नाही महाराष्ट्रात??
  असो.. माझ्या पण मनात या प्रश्नाबद्दल इतकं काही आहे, की सगळं लिहित बसलो, तर त्याचं पण एक पोस्ट होईल… म्हणुन थांबतो इथेच.. मला वाटतं की माझी भावना पोहोचेल इतक्या लिखाणाने..

 2. प्रत्येक गोष्टीला एकापेक्षा अनेक बाजू असणारच आणि त्या आपल्याला वेळोवेळी पटणारच. तू म्हटलेय तसेच होतेय हल्ली. बरं प्रत्येक जण त्यातून स्वत:ची पोळी भाजतोय हेही स्पष्ट जाणवतेयं. आणि त्याहीपेक्षा हे कळत असूनही केवळ उघड्या डोळ्यांनी पाहत बसण्या व्यतिरिक्त आपण काहीच करत नाही किंबहुना करू शकत नाही. मग मनात नुसता गोंधळ माजतो. आता हे मराठीकारणच घ्या नं…रोजची नवी व्यक्तव्ये व त्यावरचे नवे वाद. निष्पत्ती हीच का अपेक्षित आहे? पण नेत्यांना नुसते लाइम लाईट मध्ये राहायचे आहे मग त्यांचे पध्दतशीर हातखंडे चालूच….. सारं काही खुर्चीशी निगडीत आहे बाप….तेव्हां जनतेची अशीच दिशाभूल करत राहावे ….. अगदी प्रत्येकाच्या मनातले लिहीलेस.

  • sonalw
  • नोव्हेंबर 19th, 2009

  Thanks hemant, mahendraji, and Bhaasana.
  mahendraji, mala khatri aahe ki tumachyakade nakkich ya babtitale anek aspects asnaar share karNyasaarkhe. Kharach ek post howun jawoo de. majh likhan bhavnik paatliwar asat baryachda pan tumacha raajkarnaacha abhyas aahe. Tumhi he khup chaan mandu shakal. just ek request aahe hi.

  • ajay
  • नोव्हेंबर 19th, 2009

  माझंही बर्याच वेळा तुझ्यासारखंच होतं, राज करतोय ते निव्वळ भावनांचं राजकारण की ख्ररच मराठी माणसांचा कळवळा, बाकीचे पॉलीटिशियन्स वागतात ते चुक की बरोबर असे अनेक प्रश्न पडतात. एकापे़क्षा अनेक बाजु असतात हे तुझं म्हणण पटलं. काही वेळा आपण इतके कन्फयूज होतो की तो विषयच नको असं होतं. तुझं म्हणण पटल म्हणुनच दिलेली ही प्रतिक्रिया.

  -अजय

  • Vijay
  • नोव्हेंबर 19th, 2009

  kharach sahi lihilay….. same pinch…

 3. हा अतिशय सेन्सीटीव्ह विषय आहे. थोडंही मागे पुढे झालं लिहिण्यात तर मात्र अगदी आग्या मोहोळात हात घातल्या सारखं होईल. राजकारण आणि समाजकारण दोघांचिही सांगड घालण्याचा प्रयत्न करणं अतिशय कठिण वाट्तं.
  माझं स्पष्ट मत आहे, की हा मुद्दा फार जास्त उचलला, तर रशियाची जशी शकलं शकलं झाली, तशी पण होऊ शकतिल.

  पुर्वांचल तर संपुर्ण वेगळंच पडलेलं आहे, आपला कांही संबंधच उरलेला नाही, उत्तरांचलात काय सुरु आहे ते माहिती आहेच, काश्मिर अशांत.. गुजराथ, पश्चिम भागात पण सारखं टेन्शन असतं काही तरी…. म्हणुन या बाबतित मोहनजी जे बोलले आहेत ते योग्य आहे असे वाटते..

  • sonalw
  • नोव्हेंबर 20th, 2009

  khar aahe. mala watat aapal national spirit lata mangeshkar, Scahin tendulkar, bollywood ya saarkhya goshtinich jast tikawun thewlay.

 4. Powerful post.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: