मुक्त


दिवसांची थडगी बांधून त्यांना दरवर्षी फुलं वाहून काहीच होत नसतं.
अजून काही फुलं तेव्हढी दूर होतात त्यांच्या आईपासून…हि सुद्धा हिंसाच.

आम्ही बांधलीयेत अशी थडगी जागोजागी
स्वातन्त्र्यदेवतेचा आत्मा व्हीव्हळतोय आत आत.
जखमा वाहतायत भळभळून, मिळेल त्या छीद्रातून.
अशीच थडगी बांधत राहिलो तर कधी या देशाचं स्मशान होईल
ते सांगताही येणार नाही.

जाळून श्राद्ध देखील घालू नका त्याचं.
आत्मे शांत होतात दहावं बारावं करून याचा पुरावा तरी कुठे आहे?
कावळे घास तेव्हढा गिळून जातील,
आणि त्या दिवसांचे अतृप्त आत्मे पुन्हा पुन्हा जन्माला येत राहतील.

मुक्तच करायचं असेल त्यांना तर सूड घ्या त्यांच्या बळीचा.
आपापल्या परीने.
कुठलाही गाजावाजा न करता…शत्रू सावध ह्यायला नको!
मुक्त होतील ते तेव्हाच आणि शांत होऊ आपणही.
——————————————————————–

२६ नोव्हेंबर २००८ च्या हुतात्म्यांना माझा सलाम आणि श्रद्धांजली.
आणि त्यांच्या आहुतीमुळे ज्यांची आयुष्य आजही शाबूत आहेत त्या सगळ्या जिवंत माणसांना एकच विनंती.
“अशा दिवसांच्या जखमा ओल्या राहू द्यात तुमच्या मनात. त्या भरून देवू नका. पण या दिवसाचं media-करण थांबवा. “

Advertisements
 1. I share the same feelingd

  • asmita pawar
  • नोव्हेंबर 26th, 2009

  अगदी बरोबर आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच
  अति सवंग प्रसिद्धीमुळेच आपल्या जाणीवा बोथट होतात असे मला तरी वाटते
  त्यामुळे २६/११ चे राजकारण न करता पुन्हा असे होऊ न देणे व यात ज्या लोकांची न भरून निघण्या इतकी हानी झालेली आहे त्यांची थोडी तरी मदत करावी असे मलावाटते.

 2. श्रध्दांजली..

 3. शब्द फुले तू वाहिलीस…
  त्या फुलांची यातनाही तू पाहिलीस…
  ओल्या जखमा जितक्या जास्त…
  तितकी संवेदना राहील तंदुरुस्त…

  संवेदना जागृत तर
  आपणही राहू जिवंत…
  शरीराने तर प्रत्येक जण जिवंत राहतो…
  मनाने खरा मनस्वी जगाकडे पाहतो…

 4. c my blog @ http://akhiljoshi.wordpress.com and keep coming back..

  • Milind Mohan Arolkar
  • नोव्हेंबर 28th, 2009

  26/11 ला एक वर्ष पूर्ण होताना त्यापासून काहिच बोध न घेता केवळ त्या घटनेचा जो ‘एव्हेंट’ केला गेला तो पाहून मन हल्ल्याच्या दिवशी पेक्षा जास्त विषण्ण झालं होतं. फारच चांगल्या शब्दांमध्ये आपण या भावना व्यक्त केल्यात…मिलिंद

  • ngadre
  • डिसेंबर 4th, 2009

  khoop khoop aatoon aani khara kharaihilayas..mast

  By the way..shuddhlekhan jalla mela tujha te..kadhi sudharnaar..

  • sonalw
  • डिसेंबर 7th, 2009

  @nachiket. thanks. Kaan dharun maafi maagte (google-indic che majhe navhet):)

 5. शब्द न शब्द भिडला !!

 6. नाही बुजणार ह्या जखमा अश्वथामा ची ओली जखम किती वेदना दायी असेल याची प्रचीती आली. शब्द दहकत्या अग्नी सारखा पण मनाला
  जाऊन भिडला. काळजात अंगार पेटता ठेवून गेला. पण डोळे मात्र भरून आले पुन्हा…..गमावलेल्या सर्वांसाठी, भारतासाठी……

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: