ससा तो कसा!


ससा तो कसा कि कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली…
वेगे वेगे धावू नि डोंगरावर जावू हि शर्यत रे आपुली…

गोड गाणं. त्या दिवशी पिल्लू ला ऐकवत होते. पुढचे शब्द आठवेनात. म्हणून म्प३ मिळवून ऐकली. आणि चक्क एक आख्ख नवीन तत्वज्ञान सापडलं!
युरेका again .
ही गोष्ट मुलांना वर्षानुवर्ष सांगतोय न? slow but steady wins the race . बरोबर?
पण हल्ली जरा उलट होतंय. GT बियाणांच्या जमान्यात आहोत न. त्यामुळे कासवाचा steadiness , आणि सशाचा speed हे दोन्ही हवंय. आपल्याला ‘काससा’ हवाय. ‘सासव’ सुद्धा चालेल.
हे कूर्मगतीने जिंकण कालबाह्य होत चाललय. मुलं त्यामुळे confuse होत असावीत. moral of the story एक आणि प्रत्यक्षात काही वेगळंच. नाही?
जरा लक्ष देवून ऐकल गाणं तेव्हा हे दुसर कडवं ऐकलं आणि खजिना गवसल्याचा आनंद झाला मला.

‘हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे हे पाहुनिया ससा हरखला…’
आपला हा ससा होता सुरवातीला जरा गर्विष्ठ. मान्य.
शर्यतीच आव्हान पण त्यानेच दिल. मान्य.
गाफील देखील राहिला तो. हेही मान्य.
लेकीन सफर का मजा तो उसीने लुटा बॉस! जिंकायचं कसं हे त्याला नाही कळलं. पण जगायचं कसं हे त्याने शिकवलं!

आपल्या सशांना या शर्यतीत धावताना आपल ध्येय गाठताना कासवाची चिकाटी तर शिकवायलाच हवी पण त्याहून महत्वाचं हेही शिकवायला हवं कि ‘winning is not always important .’ ध्येयाकडे वाटचाल करताना त्या वाटेतला आनंद भरभरून घेता आला पाहिजे. पाखराचं गाणं ऐकता आलं पाहिजे. काही क्षण स्पर्धा विसरून झाडाच्या सावलीत निजता आलं पाहिजे.
आणि आम्हाला तुम्हाला ती सावली होता आलं पाहिजे.

Advertisements
  • ngadre
  • डिसेंबर 8th, 2009

  gammat thavook ahe ka tula? Javal javal sarv baal geete ani baal katha kahitari ulate kinva confusing kinva vaeet shikavtat..

  English baalgeete tar khoopshi kroorhee ahet..

  Bodhkathanmadhe sarvatr chukicha bodh dilela aahe. Majja aali vachoon. Kuniyari ha soft point hit kelach pahije hota..kelas..koutuk tujhya innovative thought process che. Lucky is your pillu..

 1. एकदम आवडलं. “जिंकायचं कसं हे त्याला नाही कळलं. पण जगायचं कसं हे त्याने शिकवलं!” हे तर बेस्टच.. आमच्या पिल्लाला पण रोज ऐकवतो हे गाण. पण असं आउट-ऑफ-बॉक्स थिंकिंग नाही जमलं.. आता नवीन अर्थ पण शिकवतो पिल्लाला.

  • sonalw
  • डिसेंबर 24th, 2009

  @nachiket,@Heramb: thanks. Apanach ya rat-race chya jagat aaplya mulanch mulpan tikawu shakto. karan tyanch jagach aapan asato nidan lahan aseparyant tari. baki konakadun kahi apeksha karnyasaarakh faras uralay kuthe?

 2. सोनल,
  खूप दिवसांपासून इथे वाचतो आहे. नवीन काही आले असेल हे पाहतो आहे. पण प्रत्येक वेळी ही एवढी सुंदर कविता आणि त्याबद्दलचे स्फुट वाचून जातो. जेव्हा परत जातो तेव्हा नवीन काही तरी गवसल्याचा आनंद घेऊनच…!!!

  • sonalw
  • जानेवारी 12th, 2010

  thanks Pankaj. 🙂

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: