assignments


मुलांनो
आजचा आपला विषय आहे ‘assignments ‘. हो तीच ती. तुम्हाला दर आठवड्याला अभ्यासा सारख्या फ़ालतू कामातून थोडा विरंगुळा मिळवून देणारी.
याला तुम्ही ‘प्रोजेक्ट’ सुद्धा म्हणु शकता. पण म्हणु नका. कारण मग त्या नावातली उपजत गम्मत आणि ‘सोय’ दोन्ही निघून जाईल. ‘assignment ‘ या नावातच ‘assign ‘ आहे.
म्हणजे सरांनी तुम्हाला ‘assign’ केली की तुम्ही तुमच्या आईला, बाबांना, किंवा तुम्हाला योग्य वाटेल अशा कोणत्याही व्यक्तीला ती assign करायची. कधी कधी अक्ख्या ग्रुप ला सुद्धा करू शकता.
पण ‘आई’ हीच ग्रुप लीडर असली पाहिजे हे विसरु नका. याला पुढील कारणे आहेत:
१. ownership : मुलाचं प्रत्येक प्रोजेक्ट आई स्वतःच समजुन करते. मुलाला त्या विषयाशी काही देण घेण असो अथवा नसों!
२. competitive spirit : आपल (म्हणजे मुलाच, पण एकदा ownership आली की…) प्रोजेक्ट दुसर्या मुलांच्या आयांपेक्षा जास्त चांगल झालेच पाहिजे ह्या जिद्दीने त्या काम करतात.
३. people management : प्रसंगी अक्ख्या घराला तय या noble cause मधे सामिल करून घेवू शकतात. (म्हणजे वेठीस धरु शकतात).

…..जोक्स अपार्ट! पण आजुबाजुच्या प्रत्येक शाळेत आज सर्वांगीण प्रगतीच जे खूळ संचारलाय त्यात ‘सब घोडे बारा टके’ हा न्याय चालू आहे. वेगवेगळ्या विषयांवरची मुलांच्या वयाला आणि कुवतीला न झेपणारी प्रोजेक्ट्स दर आठवड्याला माथी मारली जाताहेत. हे विषय पुरते समजलेले नसताना त्या आधीच प्रोजेक्ट्स ची धोंड गळ्यात पडते. अगदी इयत्ता पहिली पासून. ज्या मुलाची basic skills अजून विकसित व्हायची आहेत त्याला अशी प्रोजेक्ट्स देणे म्हणजे त्याच्यावर अन्याय आहेच. पण या अतिरेकामुळे त्याचा विषयातला रस कमी होण्याचच प्रमाण अधिक आहे. यात कुठल्या बोर्ड ची शाळा हे हल्ली महत्वाच राहिलेलं नाही. ‘अनुकरण’ एव्हढी एकच गोष्ट करत वेगवेगळ्या शाळा compete करतायत. ही प्रोजेक्ट्स मुलांपेक्षा पालकांसाठीच असावीत. किंवा तसं गृहीत असावं. अशा वेळी पालकांची अवस्था केविलवाणी होते. त्यातूनही सुशिक्षित, बदलत्या ‘technology ‘ शी संपर्क राखून असणार्या पालकांना काही गोष्टी सहज शक्य होतात. पण आज जो तो उठ सुठ मुलांना ICSC / CBSC / IB school मध्ये घालू पाहतोय. स्वतःच्या बुद्धीची कुवत आहे किंवा नाही हे न बघताच. अभ्यासक्रम काळाच्या पुढे धावतोय. त्यात भाषा हे महत्वाच माध्यम परकीय. त्यामुळे मूळ विषय समजताना मुलांची आणि पालकांची दोघांचीही दमछाक होतेय. त्यात वरून ही प्रोजेक्ट्स. कुठलाही विचार न करता आखलेली.
उ.दा. पहिलीतल्या मुलांना वेगवेगळ्या बियांचे नमुने गोळा करून त्यांची माहिती मिळवून तक्ता तयार करायला सांगणे. (इंग्रजीतून हे गृहीत)
बिया गोळा आम्हीही करत होतो. गुंजेच्या, बित्तीच्या. खेळता खेळता सहज शिक्षण खूप छान आणि तेही नकळत होत होत. पण याला जेव्हा ‘बाजारी’ स्वरूप येत तेव्हा मन अस्वस्थ होत.
मुलांना बिया गोळा करून आणायला सांगण त्याची माहिती त्याच्या पालकांनी त्याला करून देण इतपत ठीक. पण ती ‘सादर’ करायची. म्हणजे ‘packaging ‘ आलं. मग सगळ लक्ष माहिती सोडून सादारीकरणाकडे. आपला तक्ता सगळ्यात छान कसा दिसेल?
‘हा ठीक आहे. २-३ ओळीची माहिती पुरे झाली. इंटरनेटवर मिळेल’. बस द्यान हा विषय इथेच संपला.
पण आता ती मांडायची कशी? decoration कस करायचं? ह्यावर सगळा focus shift होतो.
यात मुलांची गुंतवणूक किती? कापणे चिकटवणे हे आधीच या इतक्या लहान मुलांना व्यवस्थित येत नसतं. आणि करायची उत्सुकता असेल तरी ‘नको रे, तो तक्ता खराब होईल..तुला नाही जमणार. ताई करेल नीट’ अस खच्चीकरण जास्त. म्हणजे माहिती काढायची बाबांनी, इंटरनेट वरून. बिया गोळा करणार आई. तक्ता सजवणार पुन्हा इतर कोणीतरी.
मुलांना त्यांच्या कुवतीप्रमाणे करता येईल अशी छोटी projects नकोत का? सगळ्यात उत्तम म्हणजे ती शाळेत शिक्षकांसमोर त्यांनी करावीत. त्यावर चर्चा (गप्पा..) आणि देवाण घेवाण व्हावी. चुरचुरीत गोष्टींची सजावट असावी. त्यातून मुलांना त्यांच्याही नकळत शिकता येईल. ह्या प्रोजेक्ट्सना मार्क नकोत कि grades नकोत. हवा तो मुलांचा सहभाग. (पालकांचा हवाच पण फक्त पालकांचा नको). आणि साहित्य गोळा करण्यापेक्षा द्यान गोळा करण्यावर भर.

Advertisements
 1. हे असंच चालायचं.. आम्ही पण गेलोय यातुन. हेच प्रकार गेले १५ वर्ष सुरु आहेत. सेकंड स्टॅंडर्डला असतांना मुलीला शिवाजीच्या किल्ल्यांची माहिती काढुन आणायला सांगितली होती..

  • sonalw
  • डिसेंबर 23rd, 2009

  @mahendraji..mi manachi tayaari suru keliye halu halu. 🙂

  • sahajach
  • डिसेंबर 24th, 2009

  सोनल कळीचा मुद्दा मांडलास……अग पण पळवाट नाही याच दिव्यातून पार पडावे लागते ना!!!!!
  अगं पण ईशानच्या मित्रांच्या आया जेव्हा पुस्तके, वर्कशीट्स, वह्या घेउन तासन्तास चर्चा करत ग अभ्यासाविषयी तेव्हा हसावे का रडावे कळत नाही….दुसरीत ईतका किस पाडताहेत जो आम्ही ईंजिनीयरींगला केला नाही……..अश्या वेळी आपण वेडे वाटायला लागतो मग ……कारण सगळेच धावताहेत गं!!! पण धावताना त्या लहानग्याच्या गतीचा विचारच नाहीये………
  मी तर ईशानला पुर्ण मुभा दिलीये वाच बाबा काय वाचायचे ते, काढ काय काढायचे ते……आपले लक्ष असतेच ना तसेही!!!!!
  अग तेरे बच्चे को ’Very Good’ मेरे बच्चे को ,”Excellent’ वाल्या तुलना आया करतात आणि त्याचवेळी मुलं मस्त खेळत असतात…..मग कोण खरे शहाणे?
  शाळा तर त्याहुनही दिव्य गं!!!!! काय बोलावे…..कर कर मनाची तयारी कर…….

  • sonalw
  • डिसेंबर 24th, 2009

  hahahhaha…kharach g. i majhya bhachya putanyana baghtey sadhya. kadhi kadhi watat mulanna khelu dya divasbhar aani aayannach pathwa shalet.
  tu khup chaan karteyas ishaan chya babtit. mihi tech karnaar he anushkachya babtit. aapan nahi tar kon japnaar g tyanch balpan? tu lata katdarench ‘aanandyatra sangopanachi’ he pustak waachlayas ka? nakki waach. khup shikwun jat te pustak.

 2. सोनल तुझ्या व तन्वी च्या मताला अनुमोदन. आपण काय करतो याचे निरीक्षण मुल करतात त्यावरून मोट्ठे झाले कि ते स्वतः करतात. परंतु एवढ्या लहान वयात त्यांना नीट करता येत नाही हे मात्र अगदी पटले. सध्या आपल्या बरोबरीने शेजारी बसवून काय करतेस ते समजावून सांग. अजिंक्य पण असाच होता. आता करतो व म्हणतो मी लहान असताना तू कशी करायचीस हे मी पाहीले आहे. सो लगे रहो…..पोस्ट एकदम सही. मला पण सगळे दिव्य आठवले….

  • sonalw
  • डिसेंबर 24th, 2009

  @anukshree, thank you. Tumachya anubhawanwarun mala encouragement milate, kharach.

  • Aparna
  • डिसेंबर 29th, 2009

  बापरे आणखी काही वर्षांनी कुठल्या दिव्यातून जावं लागणारे त्याची चांगलीच कल्पना दिलीस….बापरे पळालं पाहिजे….

 3. मला वाटत आहे मुलांनी जे चालवील आहे त्याने सर्व ब्लोग मित्र विषन्न झाली आहे म्हणूनच त्यांच्या साठी आप आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. मी सुद्धा त्या दिशेने गणित या विषयी एक पेज तयार करून आपल्या ब्लॉग वर टाकल आहे. अनिकेतने निबंधावर लिहायला सुरुवात केली आहे. हे असाच सुरु ठेवावे असेवाटते.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: