आपलच चुकतय!फुल जेव्हा दवासकट पाकळ्या सगळ्या मिटून घेतं
समजुन जावं,
भुंग्याची ही खोडी नाही, आपलच चुकतय!

ढगामध्ये दाटलेला पाउस जेव्हा न फुटताच आटून जातो
समजुन जावं,
वार्याचा हा दोष नाही, आपलच चुकतय!

पौर्णिमेच आभाळ जेव्हा न तेवताच निवून जातं
समजुन जावं, संध्याछाया निर्दोष आहेत
आपलच चुकतय!

ऐन बहरात गुलमोहोराचा बहर जेव्हा जळून जातो
समजुन जावं, उन्ह बिचारी निमित्त मात्र
आपलच चुकतय!

नेहमी नेहमी किती करायचा आक्रोश, त्रागा, आरडा ओरडा
थकून भागून हतबल होवून मन मनाशी नाळ तोडतं
तेव्हा समजुन जावं…
आपलच चुकतय!Advertisements
  • shardul
  • जानेवारी 13th, 2010

  मस्त !एखाद्या नाटकात छान स्वगत होऊ शकेल हे ..!

  • हेरंब ओक
  • जानेवारी 13th, 2010

  खुपच छान !!! अप्रतिम..

  • yog
  • जानेवारी 13th, 2010

  kharch aaplch chukatay..

  • davbindu
  • जानेवारी 13th, 2010

  छान..आवडल

  • ravindra
  • जानेवारी 13th, 2010

  तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

  • Mi, Sonal
  • जानेवारी 14th, 2010

  Saglyanche khup khup aabhar aani Makar sankrantichya hardik shubbheccha.

  • ngadre
  • जानेवारी 15th, 2010

  changli.

  • sonalw
  • जानेवारी 18th, 2010

  @gadre: pranjal matabaddal atishay manapasun thanks.

 1. ही कविता एकदम वेगळी वाटली. छान आहे.

  • अमोल
  • फेब्रुवारी 4th, 2010

  सुंदर कविता,

  वाचून दाद देण्याची इच्छा न झाली,
  तर वाचकाने समजावं,
  आपलंच चुकतंय!

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: