आजचा प्रवास


तारीख : १९ जानेवारी २०१०
वेळ: सकाळी ९.२० मिनिटे.
स्थळ: दहिसर, माझ्या बिल्डिंग च गेट.
प्रसंग: प्रवासाची सुरुवात, bike वरून.
मनातले विचार: ” हाच फायदा असतो bike असण्याचा. सकाळी निदान अर्धा तास तरी उशिरा निघायला मिळत. bike काय, कशीही निघते फटी फटीतून. वेळ वाचतो प्रवासाचा. हा फायदा दुसर्या कुठल्याही प्रकारे गेलं तरी नाही मिळू शकत.”

तारीख : १९ जानेवारी २०१०
वेळ: सकाळी ९.३५ मिनिटे.
स्थळ: कांदिवली
प्रसंग: traffic jam ची सुरवात
मनातले विचार: ” झाली सुरवात. या ठाकूर विलेज मुळे इतक्या गाड्या आल्यात न कि कितीही fly overs उभारा..अपुरे पडतील.” मग मनातल्या मनात त्या सगळ्या गाड्यांच्या आणि गाडीवाल्यांच्या नावाने बोट मोडून झाली.

तारीख : १९ जानेवारी २०१०
वेळ: सकाळी ९.४५ मिनिटे.
स्थळ: कांदिवली
प्रसंग: traffic jam चा मध्य
मनातले विचार: ” शी काय हे. आज काय आहे नक्की? कोणीतरी मुर्खासारखी गाडी घालून ठेवली असेल मध्ये. किंवा बंद पडली असेल. आपल्यकडे असले खटारे उचलायला टोइंग vehicles सुद्धा नसतात पुरेशी. काढ काढ जरा त्या बाजूने जागा दिसतेय..”

तारीख : १९ जानेवारी २०१०
वेळ: सकाळी ९.५५ मिनिटे.
स्थळ: कांदिवली -मालाड च्या मध्ये
प्रसंग: traffic jam चा मध्य (की सुरवातच ते माहित नाही)
मनातले विचार: ” आज कधी पोचणार काय माहित. देवळात पण जायचय जाता जाता. आज माघी चतुर्थी आहे. काय हे रोजचच झालाय हल्ली.” (मनातल्या मनात चरफड, चिडचिड, कडकड)

तारीख : १९ जानेवारी २०१०
वेळ: सकाळी १०.०५ मिनिटे.
स्थळ: गोरेगाव – आरे सिग्नल.
प्रसंग: traffic jam च
मनातले विचार: ” आपल्यकडे न काहीच system नाहीये कशाला. सगळ्यांना सगळ माहितेय तरी…”

तारीख : १९ जानेवारी २०१०
वेळ: सकाळी १०.०७ मिनिटे.
स्थळ: गोरेगाव – आरे टोल नाका
प्रसंग: traffic jam च
कोणीतरी गाडीवाला दुसर्या कोणाला तरी छान गोंडस शिव्या घालत होता…
मनातले विचार: ” हाहा बघ कसा सगळ्यांचा कडेलोट झालाय.पेटलेत एकेक. ” (त्याही परिस्थित हसू. कितीही सुसंस्कृत असलो तरी ठेवणीतल्या भरजरी शिव्या ऐकल्या कि हसू येतच. आणि त्याहूनही जास्त आनंद तेव्हा होतो जेव्हा त्या शिव्या होंडा किंवा स्कोडा चा सूट आणि टाय घातलेला एखादा आपल्या ground level वर येवून घालतो तेव्हा. best way to connect to the roots ! मादाम क्रुसो च्या एखाद्या मेणाच्या पुतळ्यात आत्मा शिरल्यासारख वाटत. आणि ही ताकद फक्त मुंबईच्या traffic जम मध्ये आहे.)

तारीख : १९ जानेवारी २०१०
वेळ: सकाळी १०.२० मिनिटे.
स्थळ: गोरेगाव – आरे मधलं एक छोटस स्वयंभू गणेश मंदिर
प्रसंग: सहस्त्रावर्तन आणि यज्ञाच्या मंत्रांचा मिश्र आवाज, फुलांचा, धुपाचा सुवास भरून राहिलेला.
मनातले विचार: ” देवा, असाच प्रत्येक प्रसंगी आमच्यात राहा. प्रत्येक वळणावर भेटत राहा” (पुढच्या वळणावर इतक मंगल वातावरण असेल आणि मागच्या एका तासात सगळ्या इंद्रियांनी मिळून भरभरून शोषलेला विषार स्वच्छ करण्याची ताकद त्यात असेल अस खरच वाटल नव्हत)

तारीख : १९ जानेवारी २०१०
वेळ: सकाळी १०.३५ मिनिटे.
स्थळ: मरोळ
प्रसंग: पुन्हा एकदा विषारी हवेत, traffic jam मध्ये
मनातले विचार: “पोचेन तेव्हा पोचेन आता ऑफिसला. पण कोणीतरी थांबवा रे. माणस, गाड्या, constructions … काहीच थांबत नाहीये. वाट लागलीये सगळ्याची. ” (patience संपत आलेले. हतबल निराश उदास वाटत होत.) ” मला हे असलं आयुष्य नकोय…retire होईपर्यंत हे अस life? अर्ध्याहून जास्त रस्त्यावर? उपाय शोधायला हवा. कोणावर राग काढू? कोणाकडे उत्तर मागू? I need an outlet . नाहीतर वेड लागेल”

तारीख : १९ जानेवारी २०१०
वेळ: सकाळी १०.३७ मिनिटे.
स्थळ: मरोळ
प्रसंग: अमितचा patience संपलेला. त्याने एका gap मधून bike पिटाळली. कच्चकन ब्रेक लावला. समोर एक जुनी स्कूटर आडवी आली. अमित bike च्या होर्न मधून भावना व्यक्त करत होता. त्या ओठावर येतानाच वर बघितलं. स्कूटर वर एक बावाजी बसलेले. म्हातारेसे. त्यांनी फक्त डोळे मिटून एक अतिशय शांत आश्वासक smile दिली. अपेक्षा नव्हती. आणि त्याहूनही जर काही जाणवलं असेल तर हे की आमचा राग त्याही परिस्थितीत समजून घेण्याची तयारी होती.” (जादू की झप्पी, आल इज वेल इत्यादी इत्यादी)
मनातले विचार: “देवा, असाच प्रत्येक प्रसंगी या ना त्या रुपात भेटत राहा. आमचा जीवनावरचा विश्वास असाच टिकवत राहा.”

Advertisements
  • Seema Tillu
  • जानेवारी 19th, 2010

  chhan. shevatche vakya khup chhan. aani shevatcha prasanga tar khupach chhan.

  • ngadre
  • जानेवारी 19th, 2010

  Zakas..chaan..uttam..

  • sahajach
  • जानेवारी 19th, 2010

  मस्तच गं सोनल…….कमी शब्दात जास्त व्यक्त होणे तुझ्या लेखनानी पुन्हा एकदा साधलं बघ!!!

 1. खुपच छान. कमीत कमी वेळातली मनाची जास्तीत जास्त आंदोलनं छान जमलीयेत.

  • sonalw
  • जानेवारी 20th, 2010

  @all: thank you. Punha ekda navin prayatnala protshan dilyabaddal.
  Pan kharach evhadhe sagle wichar yewoon gele manat tya don tasat aani mi chakk ek philosophy jagale. ‘ life comes in small packages’
  Punha ghari parat jatana kaal gadicha tyre puncture jhala. Pan mi kinai mulich nirash jhale nahi, waitagle nahi, chakk shaant hote! majhya aayushyat as pahilyandach jhal asaw. hahahaha.

 2. रोजचंच आहे हे.. म्हणुन तर मुंबईला ट्रेन बरी पडते.. मी बरिच वर्ष ड्राइव्ह केलं ऑफिसला, पण आता मात्र आलोय परत ट्रेनवरच!!
  इस्ट ऑर वेस्ट लोकल इज द बेस्ट!!
  भरजरी शिव्यांची लाखोली…. मस्त आहे फ्रेज.

  • Aparna
  • जानेवारी 22nd, 2010

  अगं मस्त लिहिलंस गं…मला झर्रकन माझा २००१-२००३ चा काळ आठवला. इस्टर्न एक्सप्रेसवरून कंपनीच्या बसने बोरीवलीहून सिप्झचा प्रवास..तो रस्ता, सिग्नल, सकाळची ती लगबग, धूर सगळं सगळं आठवलं..मग एकदा येताना एक दिवस मित्राबरोबर त्याच्या गाडीतून येताना कांदिवलीच्या तिथेच कुणीतरी विचित्र गाडी आत घेतल्यामुळे हा भर रस्त्यात गाडीतून बाहेर येऊन कसा त्याला झापडून आला होता…
  यार मुंबैच काही असलं नं की आठवणीचा गुंता होऊन जातो….असो..
  तू खूप छान लिहिलंस…(टु कम बॅक ऑन ट्रॅक)

 3. सोनल, मला वाटत हे रोजचच असाव! ट्राफिक जम मध्ये गुदमरायला होत. मला शक्यच नाही ते. म्हणूनच मी मुंबई सोडली.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: