चकित


काल पुन्हा एकदा बछडीने असंच चकित केलं. तसा मी तिला सकाळचा सूर्य आणि रात्री चांदोमामा रोजच दाखवते. ही खूप सुंदर प्रतिक आहेत निसर्गाने निर्माण केलेली असं मला स्वतःला वाटत.
कलेकलेने वाढणारा आणि कमी होणारा चांदोमामा किती किती काय शिकवतो म्हणून सांगू? प्रत्येक दिवस वेगळा असतो आणि सारखा नसतो राजा. आणि रोज पौर्णिमा नसते बर का! कधी कधी आयुष्य इतकं बदलून जात की आपण आपलेच आपल्याला दिसत नाही. अमावास्येच्या चांदो सारखे. पण पुन्हा कलेकलेने वाढत जायचं असतं. आपल तेज जपायचं असतं. पौर्णिमा अनिवार्य आहे!
उगवणारा प्रत्येक तारा अस्ताला जातोच. खर तर तो निश्चलच असतो. आपल्या तेजस्वी अस्तित्वासकट अढळ! त्याचं उगवण आणि मावळण हा केवळ पृथ्वीचा दृष्टीकोन. नाही? त्याच्यासारखं आपलं तेज जपता आलं पाहिजे. स्वयंप्रकाशु होता होता दुसर्यांना उजळत जाता आलं पाहिजे. मग मावळताना सुद्धा जग सुंदर करून जाता येत!
काही दिवसांपूर्वी माझ्या पिल्लाला मी सूर्यास्ताचे रंग दाखवत होते. खूप उत्स्फूर्त आणि खूप निष्पाप चेहऱ्याने ती लगेच म्हणाली ” कोणीतरी अभ्यास केलाय. कोण करत अभ्यास तिकडे?”
मला क्षणभर उत्तरच सुचलं नाही. इतकी सुंदर reaction मला अपेक्षितच नव्हती. तिच्यासाठी अभ्यास म्हणजे तिचे रंगीत खडू आणि कागदावर रंगपंचमी. इतका छान प्रश्न येईल अस मला वाटलंच नव्हत. इतकं इतकं कौतुक वाटलं कि काय सांगू. वेड्यासारखी ज्याला त्याला सांगत सुटले!
आणि काल..चांदोमामा जरा जास्तच छान दिसत होता. केशरी छटा पसरली होती. मावालानार्या सूर्याचा आरसा जणू. नेहमीप्रमाणे पिल्लूला दाखवला. एकाही क्षणाचा उशीर न लावता म्हणाली ‘त्याला आईने आज कपडे घातलेत..”
कुठे लपवू माझ कौतुक, आश्चर्य, समाधान…म्हणून हे पोस्ट. राहवलं नाही अक्षरशः. तिच्या जगात अशा सुंदर सुंदर गोष्टींची पखरण अशीच होत राहू दे आणि मला पुन्हा पुन्हा असंच वाटत राहू दे.

Advertisements
  • ngadre
  • फेब्रुवारी 2nd, 2010

  kiti kiti god..mala bhetaychay tila…

  • sahajach
  • फेब्रुवारी 2nd, 2010

  sonal mastach g…lahan mule ase anekada chakit kartat aapalyala…..

  • YD
  • फेब्रुवारी 2nd, 2010

  Gappa marayala maja yet asteel tichyashee
  😀

  • Aparna
  • फेब्रुवारी 2nd, 2010

  सोनल मस्तच गं…आमच्याकडेसुद्धा सध्या चांदोमामा आणि सूर्यमामा हॉट फ़ेवरीट्स आहेत…:) (पण दिसले तर) आणि सेम पिंच…. मी पण आता आरूषसाठी चांदोमामाचं गाणं या महिन्यासाठी पोस्टायचा विचार करत होते….:)

 1. @ अपर्णा… सूर्य मामा ऐवजी सूर्य काका म्हण न…
  म्हणतात न…उच्चार करताना आईकडील नात्यांच्या नातेवाईकांची नाव घेताना उदा: मामा, मामी… आपले ओठ मिटतात…
  आणि वडिलांकडील उच्चार करताना काका आत्या… ओठ स्वर लांब नेतात… सूर्य तसा तेजस्वी, रुक्ष…डोळ्यात जास्ती वेळ न मावणारा..
  पण आयुष्यात प्रकाश पाडणारा ….
  चंद्र तसा…शीतल…मध्ये मध्ये न दिसणारा, पण स्वताची जाणीव अवकाशात ठेवणारा…. पौर्णिमेला उजळला तरी डोळ्यात मावणारा…

  @ सोनल, sorry हा … तुझ्या पोस्ट ची comment होती पण अपर्णा ला उत्तर दिल..
  छान… म्हणजे हरवला तर पुन्हा सापडणार नाही असे क्षण लहान मुलांबरोबर तयार होत असतात…(एरव्हीही तयार होत असतात पण प्रत्येक गोष्टीतून आपण गेलेलो असतो त्या प्रक्रियेतून पुन्हा आपलीच निर्मिती जाताना आपण त्यांच्यात आपले लहानपण बघत असतो… नाही का? ) (माझा लग्न अजून झालेलं नाही बर का.. तरही हे तत्वज्ञान –माफ करा..)
  ते इतरांना सांगून सुखद क्षणांची नव्याने निर्मिती करता येते…
  कारण दुख हे कधी न सांगताच येत असत… सुख निर्माण करणं आपल्या हाती असत अस मला वाटत..

  • sonalw
  • फेब्रुवारी 3rd, 2010

  Thanks.

  nachiket: ye ekda ghari kharach. Tujhya pillala pan gheun ye.
  Tanvi: tu mala ya kshetrat senior aahes. tu mala majhi synonym wattes baryachda aai ya ‘role’ madhe!
  YD: majja yete aani thodya welane thakayla hot re! koni itak non stop kas bolu shakat? jhopet pan bolate ti.
  aparna: majhya aaine mala ek chaan gan shikawal hot chandomamach. post karen.
  Akhil: tujhi comment mhanjech ek mast post aahe. anubhav nasun itak tar mag baba jhalyawar kaay karshil! 🙂

 2. tyasathi adhi ek aai anavi lagel (balasathi)…. tech prayant suru ahet………….. durparyant ashecha kiran tar disat nahi :-(…….baghu ya…
  koi nahi hai fir bhi hai muzkoo…. na jane kiska intejaar….asa hruday pilavatun takanare shabda kanavar padat ahet………..

 3. लहान मुलांचं लहानपण एंजॉय करा.. हे दिवस कसे संपतात, आणि हेच समजत नाही… 🙂 छान वाटलं वाचुन.

  • anukshre
  • फेब्रुवारी 3rd, 2010

  सोनल,
  आज पिल्लू मुळे चंद्र पण कौतुकाने पुन्हा पहिला. खूपच छान!!! छोट्या विश्वाचा आनंद आम्हालाही मिळाला.

  • Gayatri
  • फेब्रुवारी 4th, 2010

  “…..प्रत्येक दिवस वेगळा असतो आणि सारखा नसतो राजा. आणि रोज पौर्णिमा नसते बर का! कधी कधी आयुष्य इतकं बदलून जात की आपण आपलेच आपल्याला दिसत नाही. अमावास्येच्या चांदो सारखे. पण पुन्हा कलेकलेने वाढत जायचं असतं. आपल तेज जपायचं असतं. पौर्णिमा अनिवार्य आहे!
  उगवणारा प्रत्येक तारा अस्ताला जातोच. खर तर तो निश्चलच असतो. आपल्या तेजस्वी अस्तित्वासकट अढळ! त्याचं उगवण आणि मावळण हा केवळ पृथ्वीचा दृष्टीकोन. नाही? त्याच्यासारखं आपलं तेज जपता आलं पाहिजे. स्वयंप्रकाशु होता होता दुसर्यांना उजळत जाता आलं पाहिजे. मग मावळताना सुद्धा जग सुंदर करून जाता येत!….”

  khuup mast 🙂

  • sonal
  • फेब्रुवारी 4th, 2010

  anuja aabhar. gayatri tujhe suddha abhaar. 🙂

  • sonal
  • फेब्रुवारी 4th, 2010

  mahendraji: tumhi ya saglyatun gelayat..te diavs miss karat asal na?

 4. हो ना. मोठी मुलगी इंजिनिअरिंगला गेली पण . एक वर्ष होत पण आलं. म्हणता म्हणताचार वर्ष निघुन जातील…
  असो.
  त्यातही आनंदच आहे म्हणा..

  • Shrikant
  • फेब्रुवारी 5th, 2010

  मस्त पोस्ट 🙂 वाचल्या क्षणीच तूमच्या पिलूला भेटण्याची, बोलण्याची फार इच्छा होत आहे 🙂

  पिल्लं असतातच अशी ..एकदम cute … कालच आमच्या manager च्या पिलाचं नवीन उद्योग कळाला…
  त्याला fridge मध्ये पाण्याचा बर्फ कसा तयार होतो हे कळलं आणि गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी घरी बर्फाचा कारखाना उघडला आहे 🙂

  • abc
  • फेब्रुवारी 11th, 2010
 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: