टपरी आपली आपली


रोज ऑफिस मधून घरी जाताना रस्त्याच्या कडेला काही चहाच्या टपर्या दिसतात. आजूबाजूच्या factory मधले कामगार तिथे ठराविक वेळेला चहा प्यायला येतात. त्या बघताना मन बरीच वर्ष मागे जात. चहाची टपरी हे एक प्रतिक आहे असं वाटत मला. प्रत्येकाच्या विसाव्याच एक ठिकाण. प्रत्येकाच्या मनात एक चहाची टपरी असते.
शाळेत असताना एका फाट्यावर आम्ही सगळ्या मैत्रिणी वेगवेगळ्या होत असू. आपापल्या घरी जाण्यासाठी. तो नाका म्हणजे तेव्हा आमचा विसावा होता. दिवसभर कितीही चिवचिव केली तरी तिथे थांबून मन मोकळ केल्याशिवाय पाऊल सरकायच नाही. कधी कधी नुसतच थांबायचो. पुढे कॉलेज चा कट्टा, स्टेशन चा नेहमीचा platform आणि त्यावरचा नेहमीचा बाकडा, ऑफिस च्या खालचा corporate कट्टा…अशा कितीतरी टपर्या कितीतरी आठवणी देवून गेल्यात. त्या त्या जागी आता कधी नवीन चेहरे दिसतात. आपलेच प्रतिबिंब वाटणारे. एखाद्या cinematic trick सारखे. देजावू..
कुणाची टपरी कॅन्टीन असते,कुणाची bus stop , कुणाची बरिस्ता, कुणाची पार्ल्याच दिनानाथ, कुणाची नाना नानी पार्क..
जागा कुठलीही असली तरी ती ज्याची त्याची टपरीच. ‘टपरी’ शब्दाला जो मैत्रीचा फील आहे न तो बाकी शब्दांना नाही. कधी कधी माणसांपेक्षा सुद्धा ती जागा जवळची होवून जाते. उकळणाऱ्या चहा बरोबर उकळणार बराच काही बाहेर येत. खदखदणार हास्य आणि खदखदणार दुखः सगळ त्या टपरीजवळ मोकळ होत. आणि ‘तो’ चहा त्या cutting पेक्षा जास्त तरतरी देतो. येणाऱ्या दिवसासाठी.

Advertisements
 1. वेळेनुसार ’टपर्‍या’ बदलतात पण तिथे भेट दिल्याचे समाधान सारखेच..
  छान लिहिले आहे…

  • Sagar
  • फेब्रुवारी 16th, 2010

  Chan lihile aahet….Mi % varshpasun gharbaher aahe bt i remeber each tapari of city that played role in my life….

 2. अग मी आता ह्याच विषयावर पोस्ट टाकायची म्हणत होतो..टेलीपथी हे हे हे
  जिव्हाळ्याचा विषय आहे टपरी माझ्यासाठी. छान लिहलय..आवडल 🙂

  • mipunekar
  • फेब्रुवारी 16th, 2010

  मस्तच…. मला पण आमची / आमच्या टपऱ्या आठवल्या….
  मला पोस्ट साठी खाद्य मिळाले…. धन्यवाद 🙂

 3. टपरी वर जाउन आडोसा धरुन ओढलेल्या सिगरेट्स… मजा यायचि..

  • sonalw
  • फेब्रुवारी 17th, 2010

  chaan na? sagale kase aapaplya tapryanwar gele..bar watal.

  • savadhan
  • फेब्रुवारी 17th, 2010

  छान! भूतकाळात गेलो !
  pdk62+

  • ngadre
  • फेब्रुवारी 17th, 2010

  wah wah Sonal…kharech Deja vu..
  Kaay bolu..kharech fakkad cutting chaha kinva keshari ukala yaansaarkhi freshening mast post jhali ahe..
  BTW
  ‘Bar apla apla’ kinva ‘gutta apla apla’ ashi ek post takayacha moh hotoy..

  • anukshre
  • फेब्रुवारी 18th, 2010

  इथे पण कॉफी शॉप म्हणजे टपऱ्या प्रमाणे आहेत. पण तिथल्या टपऱ्या आठवून दिल्यास!!!!!

  • sonalw
  • फेब्रुवारी 19th, 2010

  gadre kaka…bar aapla apla chi wat baghtey..tujhya blogwar.
  thank u anuja, savdhan…:)

 4. भविष्याकालाकडे आशेने पहा..
  हे जो सांगतो तो खरा चहा..
  अशी खूप वर्षापूर्वी केलेली कविता होती..
  आठवली..
  रोज संध्याकाळी खेळायला जायचो कि मैदानाशेजारी टपरी वर चहा पिणे हा दिनक्रम..
  वेगवेगळ्या ठिकाणी गेलो कि टपरी हा hot favourite spot .. त्यामुळे त्याला भेट दिल्याशिवाय
  पुढे जाणे होताच नाही.. छान लेख आहे..
  जरा चहा पाठवला असतात तर बर झाले असत.. लेख वाचता वाचता घेतला असता न..
  तुमच्याकडून तुमच्याच लेखासाठी..

 5. Nicely written. Keep it up!

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: