ऋणी


अलीकडे बर्याच दिवसांनी गाण्यांचे कार्यक्रम बघण्याचा योग दोनदा तीनदा जुळून आला. पूर्वी खूप जाण व्ह्यायचं. मग पिल्लू मुले जवळ जवळ २ वर्षाचा ब्रेंक पडला. पण आता तीच हे live program इतके enjoy करते कि जायला अजून मजा येते. हा बहुतेक ती पोटात असताना मी ऐकलेल्या गाण्यांचा गुण असावा. तिला सुद्धा गोडी असल्यामुळे मला इतर पालाकांसारखं तिला दामटवून गप्प बसवायला लागत नाही कि इतरांच्या वाईट त्रासिक नजरांचा सामानही करावा लागत नाही.
त्या दिवशी यशवंत ला सप्तसुरांचा प्रवास ह्या नव्या जुन्या हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम बघितला. पहिलाच प्रयोग होता आणि टीम बाप होती. बापच. तबल्यावर परब, स्वप्नील पंडित, बासरीवर प्रभू, आणि गाणारी मंडळी देखील पार्श्व्गायानात स्थिरावलेली.
मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे वाद्यवृंद. गायाकांपेक्षाही वादक ज्या प्रकारे एकमेकांशी संवाद साधत एक synchrinized effect साधतात ते बघायला मला अतिशय आवडतं. हो बघायलाच. ऐकायला तर आवडतंच, त्या साठीच तर आपण गेलेलो असतो तिथे. पण त्यांची जी काही sign कम visual कम नजरेच भाषा असते न ती मला जाम म्हणजे जाम आवडते. शब्दावाचून कळले सारे..याची प्रचीती! सगळे मिळून ज्या प्रकारे एकमेकांना आणि गाणार्याला सांभाळून घेतात ते बघण म्हणजे मेजवानी. आता आता त्यांच्या या सगळ्यात कठीण आणि सगळ्यात महत्वाच्या कामच त्यांना आवर्जून श्रेय मिळायला लागलंय.
याच कार्यक्रमात saxophone वाजवला मनोहारी दादांनी. मनोहारी दादाचं वय ८०+. गेल्या महिन्यापर्यंत आठवड्यातून ४ वेळा dialesis वर होते आता ते प्रमाण २ वर आलंय. त्यांनी saxophone मध्ये पहिला श्वास भरला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. अंगावर काटा उभा राहिला. त्यांनी सोलो सादर केल तेव्हा तर शब्दच सुचत नव्हते. प्रत्येक गाण ते जगत होते…त्यांच्या मनात त्यांचा संपूर्ण काळ जिवंत होता. एक एक नोट, एकेक जागा त्यांच्या कानात अजूनही घुमत होती. हे सगळ त्यांच्या चेहऱ्यावर उमटत होत. त्यांच्या देह्बोलीतून जाणवत होत. पुन्हा एकदा sign language …इतकी powerful ! hats off ! केवळ सुरांसाठी जन्म! हि श्रद्धा केवळ सुरांवराची, जीवनावरची!
ह्या आणि अशाच किमयागारांनी आपली मन जिवंत ठेवली आहेत. निराशेची आणि क्षणभंगुरतेची जाणीव पदोपदी व्हावी असं बेताल वातावरण. ठिसूळ होत चाललेली श्रद्धा, गढूळ होत चाललेली मन! या सगळ्यात सौन्दर्यवरचा, शाश्वत श्रद्धेवरचा विश्वास टिकवायला भाग पाडणाऱ्या त्या सर्वांची मी ऋणी आहे.

Advertisements
  • ngadre
  • मार्च 9th, 2010

  chhan utaravalya ahes abstract feelings shabdaat..

  100% bhidale..

  By the way it is Saxophone.

 1. “निराशेची आणि क्षणभंगुरतेची जाणीव पदोपदी व्हावी असं बेताल वातावरण. ठिसूळ होत चाललेली श्रद्धा, गढूळ होत चाललेली मन! या सगळ्यात सौन्दर्यवरचा, शाश्वत श्रद्धेवरचा विश्वास टिकवायला भाग पाडणाऱ्या त्या सर्वांची मी ऋणी आहे.”—Apratim!!

 2. सुरेख लिहिलंस, ऋणी चा हा अर्थ मनापासून आवडला. खूप दिवसांनी पुन्हा ब्लॉगवर आले पण छान पोस्ट वाचण्यास मिळाली, धन्यवाद

 3. Dhanyawad Anukshree, Ashish, Nachiket.

 4. सोनल, मी सुध्दा आपला ऋणी आहे, कारण आपल्या ब्लोग रोल मधे माझ्या मना अवतरल्याचे दिसते. धन्यवाद.

 1. मे 27th, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: