कृष्णाजी वासुदेव यादव. याल पुन्हा एकदा?


नाव: अ ब क
आडनाव: कुमार (माला माहित असलेल आडनाव ‘कुमार’)
व्यक्ति: एका बहुराष्ट्रीय कंपनीमधे चांगल्या पदावर.
चारित्र्य: स्वच्छा
स्वभाव: अतिशय साधा, शिस्तप्रिय, सरळ

हा माणूस माझा ग्रुप लीडर आहे सध्या. काल त्याचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने आम्ही सगळे त्याला लंच साठी बाहेर घेउन गेलो. असे प्रसंग मला फारसे आवडत नाहीत. बोलायचं म्हणून कसले कसले विषय काढून लोक बोलतात. त्यातले फार कमी जण आपल्या wavelength चे असतात. बर्याचदा सगळ फोर्मल होउन जात. पण कधी कधी अशाच जुळवून आणलेल्या प्रसंगांमुळे काही वरवरचे पदर नकळत दूर होतात आणि आतला माणूस दिसतो.
तेव्हा असेच इकडून तिकडून धरून आणलेले विषय घेऊन सगळ्या गप्पा चालू होत्या. मी सहज त्याला म्हटलं ,” मला नेहमी वाटायचं कि तू बंगाली आहेस” . त्यावर त्यानेहि सहज सांगितलं ” छे मी UP चा आहे. बनारस.” मला खरच हे माहित नव्हत. बोलता बोलता कळलं कि त्याच आडनाव ‘कुमार’ नसून ‘यादव’ आहे. माझ्या चेहर्यावरच आश्चर्य आणि प्रश्न दोन्ही त्याने ओळखले. त्याच्या साध्या सरळ स्वभावाला धरून त्याने प्रामाणिक कबुली दिली..” actually यादव surname से यहा प्रोब्लेम हो सकती थी. कही भी प्रोब्लेम हो सकती थी. इसलिये…” तोही जरासा ओशाळला होता हे सांगताना.

विषय मनात कधी जावून रुतून बसला माहित नाही पण दिवसभर टोचत राहिला.
मला काय वाटायला हव नक्की? ते नाही ठरवता येत. लाज वाटायला हवी? कोणाची? स्वतः ची? या व्यवस्थेचा एक भाग म्हणून?
चीड यायला हवी? कुमार ची? की अजून कोणाची? नक्की कोणाची?
यादव. कृष्णाचा वंश. आणि लालूचाही! पहिला ज्याला सगळ्या भारत वंशातल्या सगळ्या संस्कृतींनी आपल्या मनात, घरात, देवाचं, मित्राचं, लाडाच स्थान दिलंय. दुसर्याबद्दल काही सांगण न लगे.
आणि आज माझ्या समोर बसलेला एक अत्यंत साधा सरळ माणूस आपल ‘यादव’ हे आडनाव लावायला घाबरतो! मी अस्वस्थ झालेय. मी मराठी वगैरे नाहीये. मुंबईकर वगैरे पण नाहीये आत्ता. मी माणूस आहे. या देशाची एक नागरिक. एक मध्यमवर्गीय मुलगी. जिने इतर सामान्य मुलींप्रमाणे शिक्षण घेतलंय. एक चांगली नोकरी मिळावी अशा अपेक्षेने, जी तिला मिळालीये. ती तिच्या कुटुंबासमवेत सुखी आहे.
तसा ‘कुमार’ सुद्धा आहे. त्यालाही चांगल्या पुरेशा पगाराची नोकरी आहे. दारात गाडी आहे. बायको मुलीसमवेत तो सुखी आहे. पण तो ‘तो’ नाहीये. त्याला आपली ओळख चक्क विसरायला लावली आहे. कोणी? का? हे कधी झाल? कुठून आली इतकी असुरक्षितता? आपल्याच देशात? प्रत्येक वेळी फोर्मवर आपल आडनाव लपवताना त्याला आत काही सलत असेल का? त्याच्या मुलीला देखील तो खोट्या आडनावाने मोठ करेल का?
कोणी चिकटवली विशेषण आडनावांना? आडनाव. कोणीतरी सोय म्हणून सुरु केली असतील. त्याचा वापर आणि व्यापार सुरु होईल अस वाटल असेल का तेव्हा?
कशाबरोबर सुरु आहे लढाई नक्की? आडनाव? राज्य? भाषा? राजकारणी? पक्ष? कोणता पर्याय निवडू? कुठलाही निवडला तरी त्यात माझ्या आयुष्याला दिशा देणारे , माझ्या मनाला शिवून गेलेले कितीतरी असतील. रस्त्यावर माझा अपघात झाला तर मला हॉस्पिटल मध्ये नेणारा माणूस कदाचित एखादा यादव, एखादा खान, एखादा कांबळे असेल.

अवधूत गुप्ते च्या झेंडा चित्रपटातलं हे गाणं मला खूप valid वाटत. आजच्या संदर्भात.

मै हिंदुस्तान का वो युवा हू
जिसकी कोई खता नाही.
क्या खबर क्यू हुवा पैदा
क्यू मरेगा पता नही.
मौत तो यह बडी सस्ती है
समुंदर से आती ही और मुफ्त मी बटती है
मुझे भागात सिंग की मौत दो
मै हजार बार मरुंगा
कहा बिकती है पता नही..

जलजले तो अपने भी खून में है
और आंखो मी है आंधी
पर जलाने को फिरंग है यहा और
ना बुझाने को गांधी….

कोणाशी आहे लढाई?
कृष्णाजी वासुदेव यादव..आजही तेच प्रश्न आहेत प्रत्येक अर्जुना समोर. “कोणाशी लढू? का लढू? कस लढू? मला नाही जमणार!”
याल पुन्हा एकदा?

Advertisements
 1. Mastach jhalay ekdum!

  • तो
  • मार्च 12th, 2010

  punha toch prash.
  ‘krushnaji’ yal ka?
  ‘raje’ punha ya janmala.

  kadhi paryant dusaryannach aapale problem solve karayala bolavayach?

  sorry …..

 2. @to: Krushane problem solve kele nahit. fakt disha dakhwali.
  ladhaycha arjunalach hot aani nehmich laagnaar aahe.

  aani pratyek arjunala aapla krushn suddha swatahch shodhawa laagto.

  comment baddal aabhar.

  • ngadre
  • मार्च 12th, 2010

  The case seems to be isolated..there are so many proud yadav in Maharashtra.
  He is too scared person..
  Or I will call this as inferiority complex rather than fear..
  I stayed out of Maharashtra for couple of years and you too stayed if I am not wrong..did we hide our names?

  This mentality of your PL matches with those USA residents who are ashamed of Krishna as own name and make it Kris..or Hari as Harry..

 3. maybe..you are right. But ia m not trying to make any point through this post. Just expressing my restlessness after the incident. There cound be many more such yadawas. and even if there is only this one, its enough to induce thoughts that I expressed.

  • Shilpa
  • मार्च 12th, 2010

  Sonal,
  Chaan lihile ahes. Enjoyed reading it. I feel the restlessness too.

  • Harshada
  • मार्च 12th, 2010

  Khupach chan

  • A
  • मार्च 12th, 2010

  Sonal,

  Indeed a thought provoking incident….

  But I know many such KUMARS… we didn’t notice them when they kept “pouring” in… they are neither scared nor do they have any inferiority complex… they are DANGEROUS

  Anyways, keep writing… w/o worrying about making any point 🙂

  A

 4. अगदी खरं आहे. छान लीहिले.
  http://gangadharmute.wordpress.com

 5. एकदम झकास! मला शेवट फार आवडला.

 6. Kiti bhabade ahat ho…!
  Vartamanat jagayala kadhi shikanar aapan?
  Apan lables tayar karayachi ani apanach tya lable la ghabarayacha? Var punha ani jyache lable tayar kele tyalach bolavayacha?
  Eka dusarya sandarbhat kusumagraj:
  Shewalele shabda anik yamak chhand kartil kay?
  Dambari sadakewarati shravan Indradhanu bandhil kay?
  Udhalun de toofan sagala kalajamadhye sachalela.
  Prem kar bhillasarakha banavarati khochalela.
  Kahi kalatay ka?????????

  • Bhavinee Vyas
  • मार्च 17th, 2010

  Beautifully written, thought-provoking article with a superb close 🙂 Reminds me of Sir ji’s idea … but then, with our fetish for classification and categorization, it won’t be long before we start grouping people with numbers!!

 7. very tru Bhavinee. You have hit the core of the issue: our fetish for classification and categorization!

 8. Thanks Abhijit. In a sense whatever you or Nachiket have said in your comments is true. I agree to it 110% when a hardcore ‘Marathi Mulagi’ in me wakes up. :), and on the other side, that little tiny voice in me keeps questioning ‘Why?’…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: