नशीब.


नशीब.
म्हणजे काय नक्की?
fate, destiny, प्राक्तन, दैव…पण हे सगळे समानार्थी शब्द आहेत फक्त. मूळ ‘अर्थ’ कळल्याशिवाय ज्यांना काहीही अर्थ नाही असे.
‘माझ्या नशिबातच नाहीये..”
“त्याचं नशीब फळफळल”
“माझ नशीब फुटक”
“ज्याचं त्याचं नशीब”
“सगळ वाटून घेता रे, पण नशीब कोणी कोणाचं घेवू शकत नाही”
“तुझ्या नशिबात लिहिलंय तेच होणार शेवटी.”
काय आहे हे नशीब नशीब? कोणीतरी आधीपासून काहीतरी लिहून ठेवलेलं. आपल्याला न समजणार्या भाषेत.
कोणीतरी म्हणजे देवाने असेल. देव कोण? माहित नाही.
“माझ्या नशिबात आज देवदर्शन नव्हत” , “त्या ठिकाणी न योग आल्याशिवाय दर्शन होत नाही” असं काहीबाही ऐकल्यावर वाटत नशीब लिहिणारा देव कसा असेल? तो का म्हणून अमुक एका कोणाला आपल्या दर्शनापासून दूर ठेवेल? हे असले कोते विचार करत असेल तर तो देव कसा असेल? देवाने मुळात विचार करताच कामा नये. कारण विचार केला कि analyse करणं आल. मग कोण चूक कोण बरोबर हे ठरवण आल. मग चुकीच्या माणसाला शिक्षा वगैरे आलं. एकाचे लाड, दुसर्यावर रागवण आलं. म्हणजे हळूच षडरिपू आलेच न? विचार न करणाऱ्या भावनाहीन गोष्टींचाच देव होऊ शकत असेल बहुतेक. म्हणून आज काल पैसा सुद्धा त्याला अपवाद नाही.
असो. मुद्दा वेगळा आहे इथे.
नशीब ही व्यक्ती असेल का? व्यक्त होणारी ती व्यक्ती. शेवटी वेगवेगळ्या घटनांमधून नशीब व्यक्तच होत असत एकप्रकारे. म्हणून व्यक्ती. अदृश्य.
म्हणजे नशीब ही एकच व्यक्ती असेल कि पर माणशी एक? आणि मग आपण नशिबाला सगळ्या शिव्या ओव्या वापरून दोष देतो तेव्हा त्या नशीब नामक व्यक्तीला काय वाटत असेल?
“साला मेरा नशीबच ***”….
ते म्हणत असेल “अरे बाबा कळतंय मला तुझ दुखः. पण मी तरी काय करू रे. माझ्या हातात नाहीये हे. माझ्या नशिबातच लिहील होत तुला त्रास देण त्याला काय करणार?”
आणि हे सगळ असलं वायफळ वाचन तुमच्या नशिबी आलंय त्याला तुम्ही तरी काय करणार?

Advertisements
  • ngadre
  • एप्रिल 16th, 2010

  amache nashib changle ki amhala tujha vachayala milatay..

  Mast..kya baat..kya baat..

  • शिरीष
  • एप्रिल 16th, 2010

  हाचहा “बशीन” (नशीब च्या उलट) प्यावा की कसे? असा “कपटी” विचार करून फळाची अपेक्षा न बाळगता “कपडे” सावरत मी “पकडे” ज्याला, तो म्हणे मीच आलोय भेटायाला.

 1. @Nachiket: thank u kitiwela mhanu? 🙂
  @shirish: khup wel laagla tube petayla…pan ekda petalyawar solid majja aali wachayla. 🙂

  • manohar
  • एप्रिल 16th, 2010

  मला फारश्या महत्वाकांक्षा नसल्याने नशिबाशी पंगा घेण्याची वेळ आली नसावी.

 2. छान लिहल आहे नशिबावर…एकदा http://wp.me/pziD7-fS इथे भेट देउन पहा…

 1. मे 27th, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: