self check!


मागचे किती आठवडे सोमवार ते शुक्रवार मी वीकेंड ची वाट न बघता कारणी लावले? कारणी लावले वगैरे विसरा पण निदान वीकेंड ची वाट न पाहता “घालवले”?

मागच्या एका वर्षात कितीवेळा घर मुल उशीर याद्या बिलं स्वयपाक ऑफिस पगार या पैकी कसलाही विचार न करता मित्र मैत्रिणींबरोबर फालतू timepass केला?

मागच्या काही महिन्यात कितीवेळा पेपर मधल्या बातम्या, राजकारणी (देशातले, घरातले, ऑफिसमधले इत्यादी) , ग्लोबल वार्मिंग, polution , ट्राफिक, आजची शिक्षण पद्धती, TV serials , झाडूवाला, भाजीवाला, रिक्षावाला, ट्राफिक police या पैकी कोणावरही टीका न करता घराच्या कुंडीतल्या फुललेल्या फुलाचं कौतुक करत किंवा सूर्योदयाचे रंग आठवत दिवस आनंदाने घालवला?

कितीवेळा घरातल्या झाडाला त्याच्याशी बोलत आईच्या मायेने पाणी घातलं?

मागच्या काही वर्षात किती जणांशी अगदी उत्फूर्त दिलखुलास कुठलाही आडपडदा आणि हेतूही न ठेवता निखळ मैत्री केली? म्हणजे यात रोजच्या अपरिहार्य मैत्र्या येत नाहीत. (उदाहरणार्थ ऑफिसमधले शेजारी पाजारी ज्यांच्याशी lunch च्या table वर फुकाचे विषय काढून गप्पा माराव्या लागतात असे वगैरे…)

आयुष्य केवळ वीकेंड्स ची वाट बघण्यात आणि कधीतरी सगळ perfect होईल अशा आशेवर रेटतोय अस वाटलं म्हणून ही यादी. मी खरच किती टक्के जिवंत आहे हे check करण्यासाठी. बाकी प्रत्येकाने आपापली उत्तर आपल्यापाशी ठेवावीत. आणि असेच काही प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर कळवा. सेल्फ चेक साठी बर असतं!

Advertisements
  • ngadre
  • एप्रिल 22nd, 2010

  khaas..weekend chi vaat baghnyaat retatoy…ho yaar..kiti khara khara ahe he..

  Sarv self check la naay naay naay ashi uttare yetat..hmm. Tujhe kaay? Asech ka?

 1. इंग्रजीत असे म्हटले जाते
  “Life is what happens to you when you are busy doing other things.”

  स्वतःच आयुष्य स्वतःच्या पद्धतिने जगण्यात किती लोकं यशस्वी होतात हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे.

  यावर स्टिव जॉब्जचा एक व्हिडीओ फारच छान आहे.
  Link : http://www.youtube.com/watch?v=D1R-jKKp3NA

  • आल्हाद alias Alhad
  • एप्रिल 22nd, 2010

  प्रश्न अवघड आहेत…

  “Life is what happens to you when you are busy doing other things.”
  हे मात्र खरं!

 2. 9 tarakhelaa bloggers meet la yenar naa?

  • YD
  • एप्रिल 22nd, 2010

  Uttare aapaapalya javal thevaveet sangitles tareepan –
  Kharach awaghad prashna ahet (Smily takoon pudhe nighoon jane evdhe ekch uttar ahe sadhya hatashee 🙂 )

 3. hahahahaha. barech jan aahet ki majhya maletale mani. bar watal he baghun.
  nachiket: majhi pan uttar naay naay naay
  YD: navin post yewoo de aata. barech divas tula kantala aalela disat nahi. mhanaje tu 100% jiwant nahis as manu ka?
  Mahendraji: tumhala HA prashn padlaay ka self check chya sandarbhat? hahahaha
  Yogesh: Video baddal thanks. khoop chaan video aahe.

  • मनोहर
  • एप्रिल 23rd, 2010

  माझ्या समजुतीप्रमाणे या गोष्टी आपोआप घडतात. त्यासाठी प्रयत्न करावे लागणे हे जीवनपद्धतीत बिघाड झाल्याचे लक्षण आहे.

  • ngadre
  • एप्रिल 25th, 2010

  Right said Manohar..

 4. hahahaha :)…manoharji: dil ko tassali dene ke liye galib ye khayal accha hai!

  • yog
  • मे 4th, 2010

  kharch.. self check ne ..manus mahnun tari jagata yeil…!!!

  • Naniwadekar
  • मे 14th, 2010

  > मागचे किती आठवडे सोमवार ते शुक्रवार मी वीकेंड ची वाट न बघता कारणी लावले? कारणी लावले वगैरे विसरा पण निदान वीकेंड ची वाट न पाहता “घालवले”?
  > —–

  हे तुम्ही लाखमोलाचं बोललात. माझ्या एका मित्राची आठवण झाली. त्याच्या मते week-end, week-end करत बसणं म्हणजे ‘शाळा पावसात वाहून गेली पाहिजे’ म्हणण्यासारखं आहे. लहान मुलाला तसं वाटणं भले ठीक आहे, पण कामाचा इतका कंटाळा बरा नाही. (त्या सुमारास माझ्या कचेरीत नेहमीच रविवारचं वातावरण असे. म्हणून इतर मित्र माझा हेवा करत. त्याची मजा असतेच पण ती अवस्था सतत चालत नाही, आणि चालूही नये.)

  एकदम उत्साहात कामाला ज़ाणार्‍यांचाच मला हेवा वाटतो ; हे लोक खरे हुशार, समाधानी, आनन्दी आणि वेळ सत्कारणी लावणारे असतात.

  – नानिवडेकर

  • Naniwadekar
  • मे 14th, 2010

  ता क – उत्तर दिलंच तर रोमन मराठीत कृपा करून देऊ नका, ही विनन्ती.

 5. १००% सहमत आहे मी तुमच्या मित्राशी. तशी अवस्था सतत असून नयेच.
  रोमन मराठी…आवडला शब्द.

 6. खरच फ़ार अवघड प्रश्न आहेत हे सेल्फ़चेकचे…

  • Geetaa
  • जून 2nd, 2010

  Sonal… tuza lekh mala khup vichar lakarayala lavun gela! Introspect karanyasarakhi goshta aahe… Kharach kiti divasat me nikhal aanandasathi kahich kelele nahiye…

  Chitra, gani, TV baghana… evadhach kay… pan aryaa barobar facta ugichach basalehi nahiye (read:without feeling guilty about any pending work from office/home)

  He vachun jevadha chan vatale… tevadhach dukkhahi jhale… Aajpasun vichar karatey ki divasatun ek tari goshta facta nikhal aanandasathi karayachi!

  Thanks for a wonderful writeup..:)

 7. Welcome to my blog Geeta. and Thanks. It feels good when people relate to what I write.
  And yes, It is important to ‘be yourself’ for at least a few minutes everyday!

  • vaishali
  • मार्च 23rd, 2011

  This so true Sonal..but I try my best to be myself..I think I have spoekn to you about this…didn’t I?

  • sonal
  • मार्च 23rd, 2011

  🙂 Thanks Vaishali. Keep it up…

 1. मे 27th, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: