भरकटलेल


आजचा दिवस लिहायला हवंच असा आहे. बरंच काही घडतंय किंवा घडणार आहे किंवा घडून गेल्यावरची धुरळा जरा जास्तच दाट आहे आज. कसाब चा निकाल , हाय अलर्ट, मोटरमन चा संप ! मुंबई पुन्हा बाह्या सरसावून तयारीत. सुवर्ण महोत्सवाचं उसन अवसान गळल्यानंतर हा पहिला दगदगीचा दिवस माझ्या शहरासाठी. म्हणून म्हटलं या दिवसाची नोंद असावी कुठेतरी.
बरेच दिवस झाले, काहीही सुचत नव्हत लिहायला. आजही सुचतंय असं नाही. पण म्हटलं फार झालं आता काहीतरी खरडलं पाहिजे.
विषय वगैरे काही नाही. त्यामुळे वाहावत जायची शक्यता आहे.
वरच्या एकाही विषयावर लिहिणार नाहीये मी आता. चोथा झालाय लिहून लिहून. चीड चीड होते, घालमेल होते, राग येतो, चढत जातो, आणि एका अशा टोकाला पोचतो कि नंतर काहीच घडत नाही. कसली अपेक्षा उरत नाही. उलट काहीही नवीन चांगल घडणार नाही हा विश्वास घट्ट होत जायला लागतो. अशाच टोकाला आपल्यापैकी बरीच जण पोचली असणार याची मला निश्चित खात्री आहे.
मग आपण आपल्यापुरत घर आवरायला लागतो, उगाच उशांचे अभ्रे, सोफ्याच्या आणि कपाटाच्या जागा बदलतो, फार झालं तर hair cut बदलतो, किंवा वीकेंड ला बाहेर जातो, निसर्गाचे गोडवे गातो, किंवा कुठल्यातरी नाटक सिनेमा ला जाऊन येतो. खरच केल्याच्या प्रमाणात त्याच कौतुक पण करतो वगैरे वगैरे. त्याने फारसा फरक पडतो असं नाही, पण उगीच आपण positive thinking वगैरे करतोय असा भास होतो काही काळ. आयुष्यातली चांगली बाजू बघावी म्हणतात. आणि मग असे काही दिवस गेल्यावर पुन्हा तीच मळकट पुट चढायला लागतात मेंदूवर, मनावर.
पुन्हा एकदा पीक (peak), आणि मग पठार आणि मग घसरगुंडी. bell curve (बेला सुर्वे), असं नाव आहे या गोंडस प्रकाराचं.
तर अशी हि बेला सुर्वे आपल्या बरोबर सतत घसरगुंडी, झोपाळे, see -saw असे खेळ खेळत असते. आपलीही चार घटका करमणूक होते.
माझ्या मुलीने काल विचारलेल्या प्रश्नांनी सुद्धा माझी अशीच करमणूक झाली. काल रात्री चक्कर मारायला गेलो होतो. तिने अचानक बाईक वळवायला लावली. का तर म्हणे डूकरू बघायचं. मग गेलो पुन्हा मागे कचर्याच्या डब्यापर्यंत. तिथे मातीत ४-५ डुकर लोळत होती. मग प्रश्न सुरु झाले. काय करतात ते. शिशी घाण मातीत का झोपले? काय खातात ते? इत्यादी. म्हटलं देवाने पण काय काय प्रकार निर्माण केलेत. काय तर म्हणे घाणच खायला आवडते. चिखलातच झोपायला आवडत. झाली माझी दोन क्षण करमणूक. बाकी खोट्या खोट्या मुलामा दिलेल्या आनंदाच्या कल्पनांना धक्का देण्याची ताकद फक्त या चिमुरड्यांमध्ये असते. निर्लेप आनंद. ( निर्लेप चे तवे वापरल्याचा नाही). असो, हे फार भरकटत चाललंय आता. थांबते इथेच. नाहीतर गायीचा निबंध होईल.

Advertisements
  • yog
  • मे 4th, 2010

  bell curve..!!!!!!!! fantastical .

  • neetagadre
  • मे 6th, 2010

  great..sundar..

  • sonal
  • मे 7th, 2010

  Thank you yog. Thanks Neeta. Tu Nachiket gadre chi koni aahes ki fakt aadnaw bhagini?

  • ngadre
  • मे 10th, 2010

  She is my mother.post uttam ch..

 1. :O sorry sorry….mi ag tug mhatal tumhala Aai. Kharach sorry. agadi manapasun. shi laajlyasaarakha jhalay mala agadi 😦

  • neetagadre
  • मे 12th, 2010

  mavshi la aho jaho mhanataat ka?

  Mala aga tuga mhanat ja.

  Mala avadate.

 2. बाकी खोट्या खोट्या मुलामा दिलेल्या आनंदाच्या कल्पनांना धक्का देण्याची ताकद फक्त या चिमुरड्यांमध्ये असते……अगदि खर..लेख एकदम मस्त जमला आहे…

  • sheetal
  • जून 2nd, 2010

  sundar….khup divsatun kahitari changla vegla vachla…

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: