वेगळ? प्रयोगशील?…दुर्बोध?


गेल्या काही दिवसात बरेच चांगले आणि बरेच ‘वेगळे’ लिखाण वाचण्यात आले. अर्थात ब्लॉग विश्वाबद्दल बोलतेय.
आणि ‘वेगळ’ या विषयाची काही जणात दृढ होत चाललेली संकल्पना कळल्यानंतर भीती वाटायला लागली.
बरेच प्रश्न हे लिखाण वाचल्यानंतर पडले. न राहवून इथे नमूद करतेय. कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही.

वेगळ म्हणजे नेहमीच कठीण असावं लागत का?
वेगळ आणि ‘दुर्बोध’ यात मुलभूत फरक आहे. प्रत्येक २ वाक्यानंतर काठीणोत्तम शब्दांची खेळवा खेळवी आणि गुंतागुंतीची वाक्यरचना म्हणजे वेगळ? कि दुर्बोध?
भाषेचं सौंदर्य, अलंकार, वाचकापर्यंत पोचवण ही लेखकाची जबाबदारी आहे हे मान्य. भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी देखील दोघांची आहे. हे संवर्धन ‘प्रयोगशील’ असल्याशिवाय होणार नाही हेही मान्य. पण अशा रचना एखाद्या हिऱ्यासारख्या शोभायला देखील हव्यात. नाहीतर ती निव्वळ स्वतःची प्रतिभा दाखवण्याची घाई वाटायला लागते.
लिहिताना जे वाटत असतं, दिसत असतं ते पूर्ण पणे न मांडता शब्दांच्या जंगलात वाचकाला सोडून देणे म्हणजे ‘प्रयोगशील’ लेखन असतं का?
शेवटा पर्यंत आणि पुन्हा पुन्हा वाचूनही वाचकाला भावना कळत नसतील तर वाचकाची प्रतिभा तोकडी समजावी कि लेखकाची? अशा लिखाणावरच्या प्रतिक्रिया दोन वर्गात मोडणार्या असतात. प्रांजळ कबुली, काहीही न झेपल्याची (लिखाण समजलंच नाही तर भिडणार कसं, पोचणार कसं? आणि पोचलच नाही तर ‘प्रयोग’ शील होवून भाषेला उंची देण्याचा प्रयत्न वगैरेचं स्थान काय?) , दुसरा वर्ग समजलं असं दाखवणारा. ह्या वर्गाला एक तर प्रचंड superiority complex असतो किंवा inferiority complex तरी. समजलं नाही असं कबूल करून कमी लेखून घेण्यापेक्षा तितकीच vague reaction दिली कि आपण वेगळ्या वर्गात मोडू असा समज! संगीतातल काहीही काळात नसताना status symbol म्हणून NCPA ला जावून पंडित जसराज ऐकत एकमेकांकडे बघून टाळ्या वाजवणारा हा वर्ग.
साधं सरळ भिडणार लिखाण हेही तितकाच सुंदर , वेगळ, आणि प्रयोगशील असू शकत. प्रत्येकवेळी पराग्रहावराची रचना करावी लागत नाही.
लेखनात विचारपूर्वक नवीन प्रयोग होत नाहीत असाही एक सूर दिसतो. पण उत्स्फुर्ततेच काय? शेवटी जे पहिल्या धारेचं येत त्याची सर प्रयोगशाळेतल्या लिखाणाला कशी यावी? शेवटी लिखाण म्हणजे प्रत्येकाच्या अनुभवांची अभिव्यक्ती. ती ज्याला त्याला जशी सहज वाटते तशी तो मांडतो. प्रयोग सुद्धा अगदी मनापासून करावासा वाटला तर तो प्रयोग राहत नाही. एक खेळ होऊन जातो आणि त्यातून सहज सुंदर उत्स्फूर्त output मिळतो.
आणि पुन्हा हेच. प्रत्येक जण लता मंगेशकर किंवा सुनील गावस्कर होऊ शकत नाही हे मान्य. पण म्हणून इतरांनी गाउच नये का? batting करूच नये का?
लेखकाच्या डोक्यातला गोंधळ वाचकाच्या डोक्यात घालून त्याला ‘वेगळ’, ‘प्रयोगशील’ म्हणण म्हणजे चक्क फसवणूक आहे अस माझ वैयक्तिक मत आहे. वेगळेपणा हा विषयापासून ते मांडणीपर्यंत, शैली पासून ते शब्द संग्रहापर्यंत, प्रभावापासून ते नकलेपर्यंत सर्वदूर पसरलाय. त्यातल्या वेगळेपणाच वर्गीकरण व्हायला हवं. शेवटी कुसुमाग्रजांची कविता जितकी उंच तितकीच पाडगावकरांची. एक भरजरी शालू आणि एक आजीची गोधडी. दोन्ही तितक्याच अमुल्य. जपण्यासारख्या.
त्यात पुन्हा कविता म्हणजे त्यातल्या सोपी अशी ही एक reaction वाचली. कविता? सोप्पी? कधीपासून? मी तोतया कवी वर्गाबद्दल बोलत नाहीये. ‘कविता पाडण’ हा एक प्रकार. आणि ‘कविता करणं’ हा दुसरा. कविता सोप्पी असते हे विधान कविता ‘करणार्यांना’ नक्कीच झोंबणार आहे. आणि त्याहूनही जास्त ते विधान अविचारी आहे अस मला वाटत.
काही मुठभर स्वयंभू विचारवंतानी ‘वेगळ्या’ लेखकांचा एक वर्ग निर्माण करून ‘क्लास’ आणि ‘मास’ अस वर्गीकरण करणं हे कितपत योग्य आहे?
कोण ठरवणार?

Advertisements
 1. truth to be told, I liked your piece of writting. Inhabitants are of the opinion that additional intricate language they inscribe, more well informed they are.

  😀

  मला पण आता इंटेलेक्च्युअल व्हावंसं वाटतंय. म्हणुन वरची कॉमेंट.. 🙂

  • sahajach
  • जून 2nd, 2010

  >>>>> शेवटी कुसुमाग्रजांची कविता जितकी उंच तितकीच पाडगावकरांची. एक भरजरी शालू आणि एक आजीची गोधडी. दोन्ही तितक्याच अमुल्य. जपण्यासारख्या.

  सोनल किती संयत लिहीलयेस….. तरिही सगळे मुद्दे स्पष्ट, खणखणीत… 🙂
  अगदी तुझ्या ब्लॉगला शोभतोय बघ लेख…. सौम्य तरिही मुद्देसुद!!!

 2. I beg to differ Sonal…

  In the dreadth of classical caustic casteism, annihilation of colosal colonial casteism is the immensly catestrophical challenge ahead of us.

  The whole country of the system is juxtapositioned by haemoglobin in the atmosphere.

 3. nachiket

  🙂 Good one!!

 4. @ nachiket: tujhi comment mhanje majhya lekhacha ‘saraunsh’ aahe. 😀 aata dictionary gheun basate.
  @ Mahendraji: thank you. Intelectual tumhi aahatach. sadhya saral mansana tharwun dekhil wakad chaalta yet nahi. 🙂
  @ tanvi: thank you. tujhi comment nehmipramanech ubdar.

 5. BTW Nachiket: tula nakki kaay mhanaychay? 🙂

  • ngadre
  • जून 2nd, 2010

  evadha sadhe simple tula kalala nahi?

 6. एवढा मुद्देसूद मला लिहायला जमल असत तर?
  पोस्ट उत्तम आहे.. आवडली… .
  by the way
  माझा ब्लोग कुठल्या सदरात मोडतो?

 7. Thanks Akhil.
  Classification karnari mi kon? mi fakt majhe wichar maandale. 🙂

 8. still u can judge better that me

 9. सोनल पोस्ट खरंच विचार करण्यासारखी आहे…तू कुठले लेख इ. वाचलेस माहित नाही पण तरी तुझं observation बरोबर आहे…आणि खरंय गं हे वर्गीकरण करायचं कोण ठरवणार??
  मला झेपत नाही ते मी वाचत नाही आणि फ़ुकाची वाह वाह करत नाही..पुर्वी कधीतरी एखादी चूक दाखवली तरी ती न झेपून मग आपल्याला वेगळं पाडणारे ब्लॉगर्सही भेटले त्यामुळे त्या वाटेलाही जाताना शंभरदा विचार करावा लागतो…असो…

 10. @Akhil: ajibat nahi. Mi khoop waait judge karte. aani swatahchya likhanache saglyat changle judge aapanach asto. aaplyala pakk thawook asat ki ‘utsfurt’ kaay aahe aani ‘odhun taanun’ lihilel kaay aahe te.

  @Aparna: thanks. ha lekh mhanaje kahi majhi mat aahet aani kahi mala padlele prashn. Tyachi uttar shodhtey ajun. kadhitari saapadtil nakki.

 11. लेखातील तुमच्या विचारांशी सहमत…

 12. Thank you devendraji.

  • prabhakar
  • जुलै 26th, 2010

  I do not know whether I am right or wrong. I am unsure whether you will read it or not. I think there is mistake here. Do you want to say ” वेगळ ” or ” वेगळं ” ? Read there in your blog title. It is मनाचिये गूंति
  सहज सुचलं म्हणून…
  There is too much difference between ” सुचल ” and ” सुचलं “.

  Your ” पाऊस ” poem is best.

 13. Thank u prabhakar. I agree. actually ya typo errors aahet. mala anuswar apekshit hota pan kahi kelya google transliterate option deina. mag thewal tasach. 🙂

  • ngadre
  • ऑगस्ट 27th, 2010

  Kaahee kelyaa option yet nasel tar

  Make sure language Marathi is selected and not hindi (on top).

  If nothing works then use the Ohm icon on top bar and select anusvaar manually from Unicode charecter table.

 1. जून 16th, 2010

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: