मरण.


मरण.
बस. हा एकच शेवट. प्रत्येकाचा. अटळ.
सांत्वनाच्या हजार त-हा. ते कसे चांगले होते, कसे स्वप्नात येवून गेले, आपणच कसे त्यांना जवळचे होतो, पासून, ते काही दिवस आधी काय बोलले, त्यांना बहुतेक कळलं असणार पर्यंत.
सुटले. नाहीतर किती यातना भोगाव्या लागल्या असत्या. सगळ ठीक. प्रक्टीकॅल.
ते आपल्यातच आहेत. वगैरे देखील बोलायला बर असतं. बोलणार्याला आपण ‘इन कंट्रोल’ असल्याचं समाधान. आणि ऐकणार्याला काय ते माहित नाही. कदाचित कानावर फक्त दगड पडल्यासमान, किंवा खर तर “पुरे आता. Leave me alone ‘ असं देखील वाटत असेल निश्चित. बर्याचदा.
पण सत्य एकच. तो माणूस होता. आता नाही. तो काय होता ते त्याच्या बायकोला, मुलाला, काय सांगायचं? रात्र दिवस त्याच्यासाठी जे जगले मेले, शेजेला आणि पेजेला आयुष्यभर बरोबर राहिले त्यांना काय सांगताय माणूस कसा होता ते? का विचारताय नक्की काय झालं ते? त्यांनाच? तुमच्या साठी असेल पहिल्यांदा पण ते हजारदा मरतात त्या तेरा दिवसात प्रत्येकाला सांगून सांगून.
त्यांना जाणवतात त्यांचे श्वास, ऐकू येतो त्यांचा आवाज घराच्या प्रत्येक कोपर्यातून. जाणवतो त्यांचा स्पर्श. विरघळलेले असतात ते एकमेकांच्या जगण्यात इतके की घेतला तो श्वास त्यांचा कि आपला ते कळू नये. त्याचं काय सांत्वन? त्यांना काय करायचाय आत्मा आणि मन? त्यांच्यातून तो माणूस शरीराने गेला. बस. सगळ्या जाणिवा त्या शरीराने व्यक्त केलेल्या. शरीर नसतं तर मन, आत्मा वगैरे सगळ उर फाडून आक्रोश करत राहिलं असतं व्यक्त होण्यासाठी, पोचण्यासाठी, जे कदाचित आता करत असेलही!
आत्मा अमर असतो. त्यांचा चेहरा मारताना शांत होता, सगळ पाहून गेले हे चांगल झालं…बस बस बस.
शरीर महत्वाच आहे. आहे.
ते माणूस माझ असण्याची, मुळात ते माणूस असण्याची, ती एकमेव खुण आहे. सर्वस्व गहाण टाकावं आणि त्याची पावती हरवावी. सैर भैर होवून जातो मेंदू तेव्हा. कानाकोपर्यांत शोधात राहतो आणि हतबल होवून, सर्वस्व गमावल्याच्या सत्याची जाणीव झाली रिकाम्या घरात रडत राहतो माणूस.
पावती हरवण काय असत हे ज्याची त्याला माहित. पावती हवीच.
जेव्हा ते जिवंत शरीर गोळा होवून समोर पडत तेव्हा. नाका-तोंडात कापूस कोंबला जातो तेव्हा, अंगठे बांधले जातात तेव्हा…काही तासापूर्वी पर्यंत जपलं ते हेच शरीर, हेच मन. हो मनच ते. शरीराचा आकार घेऊन आलेलं. आता निस्चेष्ठ. निर्जीव. कुठे शोधायचा हा माणूस परत? कुठे शोधायचं हे मन या स्वरुपात? कस जाणवायच? कस पोचायचं? कस पोचवायच स्वतः ला त्याच्या पर्यंत पुन्हा? आता ते कधीच शक्य नसणार आहे. कसलं सांत्वन? कसला आत्मा? कसलं आपल्यात असण?
शरीर महत्वाच आहेच. बस्स. इतकंच माहीत. मरणा-या बरोबर मरणा-याला. त्या वेळी. त्या क्षणी.

Advertisements
 1. शब्द न शब्द मनातला लिहिलास..ग्रेट यार. भारी आहेस तू.
  या सर्व गोष्टींचा फार अनुभव कोणालाच येऊ नये ही इच्छा. पण मला फार आला आहे. बाबा, आजोबा, आजी मावशी, काका, असे सगळे समोरच गेले. बाबांच्या वेळी तर मी १३ वर्षाचा होतो.

  एक नक्की सांगू शकतो की ते “काय झालं हो ?” “कसं झालं ? काल तर चांगले होते” वगैरे प्रश्न आणि त्याचं रेकोर्ड लावल्यासारखं उत्तर..शिवाय समाचार्वाल्यान्चा भडीमार उठबस.. या सर्वांचा खूप फायदा होतो. एकदम शॉक जाणवत नाही आणि सांगून सांगून पहिल्याच एक दोन दिवसात आपण De-Sensitize होतो. नुसतं एकट्याने बसून राहण्यापेक्षा सुरुवातीची भीषण पोकळी भरायला याचा उपयोग होतोच. ज्यांना अनुभव आहे तेच सांगू शकतील. आणि अनुभवही आई बाबांच्या बाबतीतच. काका मामांच्या बाबतीत तुलनेत आपण खंबीर असतो.

  • yog
  • जून 23rd, 2010

  मरण शब्दश: उभ होत असेल जेव्हा, इतर नातलग मृत व्यक्ती विषयी भावना मनापासून मांडत असतील तेव्हा …
  आणि.. मुळापासून मोकळ आणि मनाला हलक वाटायला ही हव म्हणून ..
  पण जे काही होत त्याच त्यांना कळत नाही की काय चाललय…..
  धक्का बसलेला असेल, कारण एवढा मोठा बदल स्वीकारावा लागणार म्हणून

  • अमृता
  • जून 24th, 2010

  ज्याच जळत त्यालाच कळत, आत्मा परमात्मा ह्या सगळ्या अध्यात्माच्या गोष्टी झाल्या, पण जी व्यक्ती आपल्या सोभोवती वावरत असते, त्याचे डोळे, त्याचा आवाज, त्याच रूप, त्याचा स्पर्श हीच तर त्याची खरी ओळख असते,
  तान्ह्या बाळाला पण आईचा आवाज न स्पर्श ओळखायला येतो. स्पर्शाची संवेदना, नजरेची भाषा हिच मनामनाला जोडते. मग अश्या वेळी जवळच कोणी अचानक आपल्या आयुष्यातून कायमच निघून गेलं कि शरीर नसण आठवायचं कि आत्मा असण?

 2. तशी मरणाच्या बाबतीत कोणतीही फिलोसोफी पटणं कठीणच. पण तेच एकच आणि एकच नक्की सत्य आहे. बाकी सर्व खोटं खोटं. लुटूपुटू..

  सगळेच वेटिंगरूम मध्ये आहोत. कोणी फर्स्ट क्लासच्या कोणी थर्ड क्लास च्या.

  मरे एक त्याचा….

 3. pratikriyanbaddal aabhaar.

  war lihilelya saglya bhawana aksharshah jagale mi gelya aathwadyat. don jawalachya wyaktincha ekach diwashi kahisa anapekshit mrutyu jhala tevha.
  ufalnaar tufaan shant jhal tevha philosophy thodi thodi bari aani khari waatayala laagli. pan tya kshani, te pret samor astaana, hech wichar hote manat.

  kadachit mi dekhil dusarya bajula asate tar hech positive thinking patawun denyacha prayatn kela asata. Infact aajwar kelay dekhil. pan tya diwashi navhat sudharat kahich. tevhache he wichar. Rokh thok. patale tari thik. nahi tari thik.

 4. छे.. पॉझिटिव्ह थिंकिंग वगैरे नाहीच. आणि विचार न पटण्याचा प्रश्नच नाही.
  रोख ठोक आणि खरेच आहेत ते.

  फक्त माझ्या बाबांच्या वेळेला आलेला अनुभव शेअर केला. आधी त्रास व्हायचा सगळे विचारायचे तेव्हा. मग कळलं की सारखी तीच कथा सांगून त्यातली भीषणता कमी झाली. सवय झाली. विचार करायला वेळ राहिला नाही. म्हणून सावरायला अल्टीमेटली मदतच झाली. मागे वळून पाहताना हां. त्यावेळी त्याक्षणी मात्र याच भावना होत्या..ज्या तू लिहिल्या आहेस.

  ते जाऊ दे. काय झालंय नक्की? जवळचे, घराचे सर्व ठीक ना ?

 5. खर आहे तुझ.. मी दोन तीन पोस्ट मध्ये सांगायचा प्रयत्न केला..
  पण तुझ्या इतुके शब्दश: मला नाही सांगता आले…

  thodakyat….
  मृत्यू हे मानवाला मिळालेले असं “सुख” आहे कि जे त्याला उपभोगता येत नाही.. – अखिल..

  (sakalich hi theme mi keli ahe.. co-incidence..)

 6. Hi Sonal,

  Sorry!
  shbdch naahit hyavr lihaayla! Tuzya blog varch he pahilch post mi vachtoy.

  ***
  Kadhekadhee ekhada manus gelavr itr lok sutlo buwa ase samor mhnne he changle ke vaait ha ? padlaay

 7. Thanks Deep, Blogwar tujh swagat. yet raaha. chnagla wait abhipray kalwat raha.

 8. अवघड टॉपीक उचलला. मरण हे शेवटचे सत्य आहे. हे माहीत असुनही मानुस मरे पर्यंत जसे जगायला पाहिजे तसे जगु शकत नाही इछ्चा असुनही. त्याला कारनं बरीच आहेत.

  तो / ती मेल्यावर रडणारे हे काही अर्थपुर्न नाही. तो / ती मेला/ मेली. तुम्ही रडुन काय साध्य करता आहात?

 9. अप्रतिम….शब्द नि शब्द सुरेख लिहिला आहे…
  *****

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: