बंड्या इंग्रजी बोलतो.


बंड्या इंग्रजी बोलतो.
बंड्या फाडफाड इंग्रजी बोलतो.
सकाळी गजर वाजायच्या आधी बंड्याचा mobile वाजतो. कधी कधी तोंडात फेस असूनही समोरच्याला फेस येईल इतक फर्डा इंग्रजी बोलतो.

बंड्या असा नव्हता हे सांगून पटणार नाही. अगदी काल परवा पर्यंत, बंड्या बारा बारा वाजेपर्यंत लोळत पडे.
‘उठा आता. कि लाथा खाऊन उठवण्याची वाट बघताय?” असा आईचा सुमधुर आवाज कानी पडल्याशिवाय बंड्याला बर वाटत नसे.
‘ झोपू दे न. रात्री जागरण झालाय..अस काहीस पुटपुटत बंड्या blanket ओढून घेई.
‘झोपू दे? जागरण? ही तुझ्या नशिबाला आलेली जांभई आहे. ते झोपण्याआधी तुम्ही उठा म्हणजे झालं. नाहीतर तुझा अण्णा परांजपे होईल..आयुष्य भर फाटकी बनियान आणि वाढलेले खुंट दाखवत gallary मध्ये उभ राहायची पाळी येईल, चाळीतल्या पोरांबरोबर गोट्या खेळण बस करा आता.’
हे ऐकून मात्र बंड्या ताठ उठून बसे. मग कोणातरी गंप्या, चिन्या वगैरे बरोबर गोट्या खेळण्यात दुपार मजेत घालवायची. मग एखादी आई येवून पोराला बकोट धरून घेऊन जाई. ‘याच्या नादी लागून पेपरात सुद्धा गोटे मिळतील.’ अस काहीस बडबडत बंड्याला जळजळीत कटाक्ष देई.
‘अहो काकू, गोट्या खेळता खेळता भौतिक घेतोय त्याचं…’ म्हणत बंड्या हसत हसत दुसरा गडी शोधायला जाई.
‘जेव्हा स्वतःच घर घेईन तेव्हा एक कॉर्नर खास गोट्या खेळण्यासाठी design करून घेणार आपण बुवा, गली बिली सकट.’ बंड्याच्या थॉट बबल मध्ये विचार चमकून जात असे.
मग संध्याकाळी कट्टा. ‘भ’ ची जागा अजून ‘फ’ ने घेतली नसण्याचे दिवस. उलट ‘भ’ च्या बाराखाडीवरून पैजा लागण्याचे ते दिवस होते.
मग इराण्याच्या हॉटेल मधला ब्रूम मस्का; बहुतेकदा उधारीवर. त्याची ही लाज वगैरे वाटण्याचे दिवस नव्हते. किंवा रामकृष्ण मध्ये मिसळ पाव.
‘मिसळ’ अजूनही ‘मिसळ’ च होती. तिची ‘मिसल’ झाली नव्हती. ‘Its a maharastriyan breakfast recepie, its called misal’ असं ज्या दिवशी पहिल्यांदा कोणाला explain करावं लागलं तो दिवस अक्खा बंड्याने कपाळावर हात मारत मारत घालवला असेल.
अशाच एका बेसावध क्षणी बंड्याला interview चा call आला आणि होत्याचं नव्हत झालं हो!
तशी खर्या अर्थाने बंड्याच्या इंग्रजी ची सुरवात एक एक दोन दोन शब्दांनी झाली. (हो engineer असूनही बंड्या इंग्रजी कधीच नव्हता).
‘Sure sure’, ‘okok’, ‘I know I know’ etc.
बंड्याला बालभारती मधल्या ‘छगन भजन कर; ची आठवण होत असे. काही दिवस तर इंग्रजी बोलणे म्हणजे एकाच शब्द दोनदा बोलणे compulsary आहेसे पण वाटायचे. मग एकदा एकांतात त्याने काही प्रयोग करून बघितले. ‘ I will do it, i will do it’, ‘you will get it by evening, you will get it by evening’, ‘i am going for lunch i am going for lunch…’ मग पोट धरून गडा बडा लोळेपर्यंत हसला स्वतःच्याच अकलेवर. LOL चा अर्थ त्या दिवशी त्याला पहिल्यांदा समजला; ‘LOL म्हणजे लोळ. हसून हसून लोळणे’.
सुरवातीला office मधल्या कोणत्याही नवीन माणसाचं आडनाव बंड्या विचारात असे. ‘आपल्यातल’ म्हणजे ‘मराठी’ असेल तर चक्क मराठीतून ‘मित्रा’ वगैरे बोलायला सुरवात करे. पण बर्याचदा त्याला इंग्रजीतूनच उत्तर मिळे. बंड्याला समजत नसे. हा office चा नियम आहे असं समजून सोडून द्यायचा त्याने खूप प्रयत्न केला आणि नंतर नंतर ‘नशिबाला जांभई येवू नये’ म्हणून कळपातला एक व्ह्यायचा निर्णय घेतला.
असे एक एक करत त्याला इंग्रजी चे funde समजायला लागले. मिसल पासून पिझ्झा पर्यंतचा प्रवास मग झटपट होत गेला. नाशिक बाजावर गणपती मध्ये घामाची अंघोळ होईस्तोवर नाचणारा बंड्या ‘last khristmas …’ वर डोलायला लागला.
त्याच्या तोंडून ‘value proposition’, ‘iterative process’, ‘organization level initiative’, ‘domain experts’ असले शब्द ऐकून माउली धन्य व्हायला लागली. बंड्याच्या रात्री अमेरिकेच्या phone calls मुळे जागायला लागल्या. सकाळी लवकर उठून सुजलेल्या डोळ्यांनी कामावर जाणारा बंड्या बघून माउली अस्वस्थ व्ह्यायला लागली. सुरवातीच्या कौतुकाची जागा काळजीने घेतली आणि तिचेही डोळे लाल व्ह्यायला लागले.
बंड्याने नवीन घर घेतलं, 3 BHK ! ११ व्या मजल्यावर. पण घरात झोपण्याशिवाय बंड्या येताच होता कुठे! एखाद्या रात्री उशिरा घरी येवून खिडकीतून दिवे बघत बंड्या उभा राही. ‘एक कॉर्नर खास गोट्या खेळण्यासाठी… ‘ आठवून स्वतःशीच हसे.
बंड्याच लग्न झाल. बंड्याला पोर झाल. तेही इंग्रजी शाळेत जावू लागल. चाळीतल्या मित्रांची एक एक करून लग्न झाली. बंड्या जावू शकला नाही.
बंड्या एकदा नाही दहादा अमेरिका वारी करून आला.
त्याच्या अकराव्या अमेरिका वारी दरम्यान आई गेली. बंड्या येवू शकला नाही.
एके दिवशी बंड्याला अचानक डाव्या बाजूला दुखायला लागल. बंड्या admit झाला. हॉस्पिटल च्या special रूम मध्ये एकट्याच पडलेल्या बंड्याला आई आठवली. मित्र आठवले. मिसळ आठवली, गंप्या आठवला. चिन्या आठवला, नाशिक ढोल आठवला.
आणि हेही आठवलं, त्या दिवशी कळ आली तेव्हा तोंडातून पडलेला पहिला शब्द ‘आई ग ‘ होता ‘oh god ‘ नव्हता.
बंड्या आता बरा आहे. संध्याकाळी वेळेवर घरी येतो. हापिसातल्या लोकांशी सहजपणे मराठी बोलतो. क्वचित अमेरिकेला देखील जातो.
मुलाला गोट्या खेळता खेळता physics चे law शिकवतो.
आणि कळपात जगण्याच्या नियमांना धरून कधी कधी बंड्या इंग्रजी बोलतो.

 1. Sonal..
  kiti sundar lihilayas.
  ikade mrutyu ani vyakti ameriket yacha ozarata ullekh majhya ajchya post madhe jhalay ha yogayog.

 2. wow…masta!

  • मकरंद
  • July 8th, 2010

  खूप छान

 3. Thanks Kiran, Thanks Makrand.
  @ nachiket: Thanks. post waachali. khoop real lihilayas. mail milali ka?

  • सचिन
  • July 8th, 2010

  एकदम मस्त.

  • sushma
  • July 8th, 2010

  manala bhavali tuzi post…khup chan lihalay..

 4. Amazing post ahe !

 5. Khup sundar ahe post. bandya agadI apalyatalach vatala. 🙂

 6. आज प्रथमच तुझ्या ब्लॉगला भेट दिली. खरच खूप सुंदर लिहीलयस. तुझं लिखाण वाचतांना व.पुं.चा भास झाला. ज्या माणसांना दु:खातही सौंदर्य दिसतं ना, त्यांच्यातच दु:ख पचवण्याची ताकद असते.

  तसा मी ब्लॉगच्या विश्वात नवीनच आहे. फक्त दोनच पोस्ट आहेत. खरं म्हणजे तुम्हा सर्वांचं लिखाण पाहूनच मलाही लिहायची खुमखूमी आली, आता ती टिकेल किती दिवस माहीत नाही. पण तु मात्र असच लिहीत रहा.

 7. तुझ्या ब्लॉगवर पहिल्यांदाच आले. ते हि योगायोगाने! खूप छान लिहिलयस ग!

  आम्ही अमेरिकेत राहणारी मराठी मंडळी ह्या अनुभवातून रोज जातो. कळपातून जाण्याकरिता किंवा त्याहीपेक्षा “जैसा देस वैसा भेस” ह्या न्यायाने रोज ऑफिसात इंग्रजी बोलतो. पण मराठी मंडळी मग ती ऑफिसात भेटली किंवा बाहेर, मराठीतच बोलतो. बंड्या इंग्रजी शिकला पण अजूनही घरी मराठीत बोलतो, मुलांना इंग्रजी शाळेत घालून घरी मराठीच बोलतो, हेही नसे थोडके!

 8. Jhakas !!! Ek number.

  -Ajay

 9. छान लिहता हो तुम्ही.
  एकदम सुरेख आणि अत्यंत पाहण्यातल्या गोष्टींचा परामर्ष घेतलेला लेख.
  माझ्यासमोर सर्रकन माझे बालपण झळकुन गेले, खुप जणांचे असेच असेल बहुदा.

  दोष कुणाचा ?
  इनफ़ॆक्ट इथे दोष आहेच का ?
  काय माहित, पण बरेच काही बदलले आहे, बदलते आहे आणि बदलावेच लागते हे खरे !
  म्हणतात ना “कुछ पाने के लियें कुछ खोना पडता है !”.
  आता आपण जे “गमावणा” आहोत त्याची किमत आपल्या “कमावण्या”शी पडताळुन पहावी, हिशोब जर प्लसमध्ये आला तर बिनधास्त गो अहेड …
  अर्थात हे ’प्लस’ केवळ ’पैसा’च नसावे हे आहेच …

  असो, मस्त लेख.
  असेच लिहीत रहा, इतक्या दिवस ह ब्लॊग कसा पाहिला नाही ह्याचेच आश्चर्य वाटते. असो.

  – छोटा डॊन

 10. maan gaye ye bandya / bandee ke kahaanee to aam aadmi ki jubaanee hai 😀 😀

 11. @ shabdankit, sadanand, chhota don: Blogwar saharsh swagat.
  aaj ajun 3 mitr milale ‘bandya’ mule 😀
  Nachiket, Mahendraji, YD, Sachin, Sushma, Ajay , Deep: Thanks.
  Tumachya saglyanchya protsahamule lihinyachi khaaj tikun aahe ajun.

 12. very good!!!

  • bhagyasharee
  • July 9th, 2010

  Masta lihile ahe…
  Ekda ka apan kalpat shirlo ki tyanchya pramane vagyala lagto kinva savay karun gheto.. pan manat nakkich kuthetari bochat aste..

  • Yogesh
  • July 11th, 2010

  khupach chhan, ata problem asa aahe ki, ABHIPRY lihitanasuddha, ENGLISH madhunach type karav lagat aahe

  KALAY TASMAI NAMAH:)

 13. kharay Yogesh. Kalpache kahi niyam palawech laagtil. Mul (roots) ukhadali ki ‘dhobi ka kutta…’ ashi awastha hote aani tyachach tras hoto. Dusar konitari honyachya nadat damchhak jast hote. Tyamule Fakt Mul ghatta rowleli asu det itakach!

 14. ekdam mast.

 15. शेवट आवडला … पण प्रत्येकवेळी काहितरी व्हायलाच हवं का, हे शहाणपण सुचायला…. केंव्हा कळणार हे आम्हाला.

  वेगळिच लेखनशैली आहे. आवडली

 16. @Shrirang, Thanks
  @Vijay: hi human tendancy aahe. Kuthala tari shock, kahitari halwun taaknar, mulawar ghaw ghalnar ghadal ki khadbadun jagi hotat manas. Chhotya mothya kuthalyahi goshtich hech asat. wajan kami karan aso ki global warming, galyparyant pani aal ki aapan jage hoto, tehi baryachda tatpurate! Apwad astatach pan far thode.

  • Prerana
  • July 15th, 2010

  va pu chhap

 17. मस्त लिहिलास..
  बंड्याला उशिरा सुचलेलं आपण जर आताच आचरणात ठेवलं तर फार त्रास नाही व्हायचा…
  खर तर between the line च्या लेखाचे TITLE इथे उपयोगी येते… इथे दोन ओळींच्या मधले वाचायला खूप चान्स आहे..
  आणि त्यात अर्थही आहेच… खूप ठिकाणी असाच hote… तुझ्या कथेत बंड्या तर आईच्या कार्याला आला असे आपण गृहीत धरू एक वेळ..
  पण काही काही केसेस मध्ये तर हल्ली कार्यालाहि यायला मुलांना वेळ मिळत नाही… का तर खूपच काम असत म्हणे…
  कशासाठी करतो आपण काम? का कमावतो पैसे? पैसे कमवण्यापेक्षा मनसे कमावणे केव्हाही चांगले…
  कारण अडचणीत असलो कि पैसे उपयोगी पडतीलच असे नाही पण माणसे उपयोगी पडतातच..
  प्रतिक्रियेत काही ठिकाणी इंग्रजी लिहिले… त्याबद्दल क्षमस्व.. पण
  तूझी शैली वेगळी आहे. म्हणजे तुझी शैली हि तुझी शैली आहे.. कधीच बदलू नकोस…
  असेच लिहित राहा….

 18. आचरणात ठेवलं nahi … आचरणात आणलं अस वाच.

 19. Thanks Akhil. Bhapo. 🙂

 20. अतीशय छान लिहिलं आहे. बंड्या व्यक्‍ती रेखेला धरुन तुम्ही बरच काही सांगुन गेलात.वेरी गूड.एक्सलंट.

  • आल्हाद alias Alhad
  • August 18th, 2010

  आवडलं!

 21. khupach sundar

  • Amruta
  • September 18th, 2014

  आवडलं ! मनाला भिडलं !

 1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: