सावध


अनुष्काची पहिली स्पर्धा. अनुष्काच पहिलं बक्षिस
शाळेतल्या ‘Prayer competition’ मधे अनुष्काचा पहिला नंबर आला.
तिला खर तर मी स्पर्धा वगैरे अस काही सांगितलच नव्हत.
आठ दिवस आधी माहीत असूनही एकदाही वेगळी practice वगैरे काही घेतली नव्हती. फक्त इतकाच सांगितलं कि उद्या तुला शाळेत सगळ्यांना ‘शुभम करोति’ म्हणून दाखवायचं आहे. मग भरपूर प्रश्न.
‘का?’,
‘कारण यांना येत नाही. तू शिकव तुझ्या मित्रांना. म्हणजे ते सुद्धा म्हणतील संध्याकाळी.’ हे माझ उत्तर.
‘त्यांना का येत नाही? teacher ला येत का? teacher ला पण का येत नाही? ….वगैरे वगैरे अनंत प्रश्नांची उत्तर दिल्यावर ‘मी काही ‘शुभम करोति’ म्हणणार नाहीये. ‘ अस तिने declare केलं. मी उगीच प्रयत्न केला जाणून घ्यायचा की का बाई? ते काही कठीण नसतं. घरी म्हणतेस तसंच असतं. इत्यादी इत्यादी. शेवटी नाद सोडला. म्हटलं ठीक आहे वाटलं तर म्हण नाहीतर नुसतीच मजा करून ये.
आणि चक्क तिचा पहिला नंबर आला. Big deal.! आहेत कितीशी मुलं. तीही किती चिमुरडी. स्पर्धा वगैरे काय करायची त्यात? हे असले खूप समजूतदार विचार करण्याचा प्रयत्न केला. पण तरी….
idealistic , perfectionist virgo : जग कसं असायला हवं, मुलांना कसं स्पर्धेत लोटू नये, त्यांना rat race पासून कसं लांब ठेवायला हवं, त्यांना त्यांच्या गतीने, त्यांच्या मनाप्रमाणे कसं फुलू द्यायला हवं हे आणि असं सतत वाचणारी, ऐकणारी, जाणवणारी (हे सगळ्यात महत्वाचं) आणि लोकांना सांगणारी मी idealistic , perfectionist virgo . पण तरी …
तरी मला झालेला सुप्त आनंद आणि काहीसा इगो मला लपवता आला नाहीच. कुठेतरी मनात इच्छा होतीच कि तिने छान perform करावं, तिचं कौतुक व्हावं. तिला बक्षीस मिळावं. का?
स्पर्धा, competition , नंबर game हे आता सुटता सुटणार नाही. तिची इच्छा असो वा नसो. इगो, असूया, मत्सर हे शत्रू टपलेले असतीलच मिळेल तिथे शिरकाव करायला. निराशा, दडपण, गंड हे सगळे सुद्धा oppertunistic .
तिला हे सगळ कसं कळणार? माझ्या कडूनच. माझ सांगण, बोलण, मागे लागण, समजूत काढत गोष्टी करायला लावण, माझ न बोलण सुद्धा, माझ्या डोळ्यातलं कौतुक आणि माझ्या डोळ्यातली निराशा, माझी स्पंदन, माझ्या हृदयातली धडधड… यातूनच न?
आणि त्या पाठोपाठ मला तिच्यापेक्षा जास्त स्वतःची काळजी वाटायला लागली.
कारण ती कालही तशीच होती, आजही तशीच आहे. जे घडलं ते माझ्या मनात, माझ्यात.
सावध मला व्हायचंय. कारण मी तिचा आरसा आहे. निदान अजून काही वर्ष तरी असणार आहे. तिला माझ्यात काय दिसावं ते मला जपावं लागेल.
एरवी ती मात्र अजूनही मला सरळ उत्तर देत नाहीच..’तू काय म्हटलस शाळेत?’ अस विचारलं कि चक्क ‘twinkle twinkle ‘ अस उत्तर देते.
हेच तर मला जपायचय!

Advertisements
 1. अरे सोनल, खूप दिवसांनी पोस्ट टाकलीस..

  स्पर्धा युगच आहे ग पुढे पण त्यात आपल्या मुलांचा बालपण हरवू न देण हेच आपला उद्दिष्ट असायला हव… 🙂

 2. माझ्या पोराच्या शाळेत उद्या कविता म्हणण्याची स्पर्धा कम परीक्षा आहे. रोज घरी ओरड ओरड ओरडून सतत म्हणत असतो कविता आणि गाणी.. पण सर्वांसमोर म्हण म्हटलं की हजार प्रश्न.. त्याची असली लक्षणं पाहून उद्या काय दिवे लावणार ते दिसतंच आहे असा विचार करत डोकं धरून बसलो होतो.. तुझी पोस्ट वाचून जीव जरा थंड झाला. तुझी पोरगी फारच गोड आणि शहाणी दिसतेय..आमचा कार्टा असं बक्षीस मिळवून आला तर सगळ्या शाळेत काजू कतली वाटीन..

  छान लिहिलं आहेस ..

  ……….
  “स्पर्धा, competition , नंबर game हे आता सुटता सुटणार नाही. तिची इच्छा असो वा नसो. इगो, असूया, मत्सर हे शत्रू टपलेले असतीलच”…..

  “सोनल स्पेशल” सेन्सिटिव्हीटी..ग्रेट..

 3. आपण कितीही जपल तरी इगो, असूया, मत्सर हे मुलांनाही गाठतातच आणि त्यांची निरागसता हरवायला सुरुवात होते….तरीही तुम्ही तुमचे प्रयत्न चालु ठेवा..शुभेच्छा…

  • sahajach
  • ऑक्टोबर 8th, 2010

  सोनल अप्रतिम… जबरी कम बॅक….

  तूला माहितीये इथे सलील संदीप आले होते ना, तर एरवी ’गप्प बस नको रे बाबा आता गाऊस’ म्हणायला लावणाऱ्या ईशानने त्यांच्यासमोर एकही ओळ म्हणायला चक्क नकार दिला… खुद्द संदीप किती वेळा म्हटला त्याला की २ ओळी तर गा तर ह्याने नाही म्हटले, त्याने संदीपला सांगितले मला खेळायला जायचेय आत्ता माझ्या मित्रांमधे…… तेव्हा खरं तर चिडले होते मी…. पण नंतर शांतपणे विचार केला की तो जर स्टार असेल तर चमकणार हे नक्की!!

  निरागसता हा अलंकार हरवायला नको हे सत्य एकदा आपल्याच गाठीला पक्के बांधले पुन्हा एकदा!!!!

  अनुष्काने विचारलेल्या प्रश्नांसारख्या प्रश्नफेरीतर सतत झडत असतात गं हल्ली…. पण तुझे पिल्लू हुशार आहे, असणारच आईशी अप्रत्यक्ष आहे ओळख माझी!!! 🙂

  एक सांगू
  >>>>>जग कसं असायला हवं, मुलांना कसं स्पर्धेत लोटू नये, त्यांना rat race पासून कसं लांब ठेवायला हवं, त्यांना त्यांच्या गतीने, त्यांच्या मनाप्रमाणे कसं फुलू द्यायला हवं हे आणि असं सतत वाचणारी, ऐकणारी, जाणवणारी (हे सगळ्यात महत्वाचं) आणि लोकांना सांगणारी मी idealistic , perfectionist virgo . पण तरी …

  हे जोवर आहे तोवर लेकीची काळजी करू नकोस!!! आपण वेडाबाई (जगाच्या दृष्टीने) असलो तरी त्या वेडेपणातलं आपल्याला मिळणारं समाधान मुलांपर्यंत नकळत झिरपतं, ते तसं झिरपू द्यावं , मग ते ही नकार देतात स्पर्धेत दमछाकीला, हो पण पहिले येणे सोडत नाहीत….. काही गैर नाही ना गं पहिले येण्यात, स्पर्धा स्वत:शी असावी फक्त हे भान येईपर्यंत जरा लक्ष ठेवावे लागते आपल्याला ईतकेच!!!

  अनुष्काचे मात्र अभिनंदन!!!
  (तू बऱ्याच दिवसानी पोस्ट लिहीलीस मग मी पण बघ केव्हढी मोठी कमेंट लिहीली 😉 )

  • sonalw
  • ऑक्टोबर 11th, 2010

  Thanks Suhas,Thanks Nachiket, Thank you Dvendraji.
  Anni Thanks Tanvi. Tula special thanks. Karan tujhe bol he anubhavache aahet. Tyamule khup dheer denare dekhil aahet. Kadhi kadhi bhiti watate aapan kase pure padnaar aahot? asha weli tujhya saarkhya maitrini confidence detat. Khoop Abhaar.

 4. Namaskar

  Good . changal lihitos.
  keep it up.

  Bhagwan

  • sonalw
  • ऑक्टोबर 12th, 2010

  thanks bhagwan..mi changal ‘Lihite’….tula ‘Lihites’ mhanayach hot ka? 😀

  • Meghana Bhuskute
  • ऑक्टोबर 26th, 2010

  नमस्कार, तुमचा संपर्क पत्ता मिळेल का?

  • sonalw
  • ऑक्टोबर 27th, 2010

  Hi Meghana, sonalw@gmail.com ha majha email id aahe.
  🙂

  • sheetal sharad shinde
  • मार्च 14th, 2011

  mast !!!!!

  kharach cchaan lihites

  mazya donhi muli ( twins) sashyach aahet

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: