Phobia


रस्त्याने जाताना ३-४ कुत्री घोळक्याने दिसली कि बंड्याची चाल मंदावते. आजूबाजूला कोणी ओळखीचं दिसलं किंवा न दिसलं तरी कुणाकुणाच्या आडोशाने बंड्या पुढे सरकत राहतो.  कुत्र्यांच्या डोळ्याला डोळा न भिडवता. किंवा मग रस्ता क्रॉस करतो. अगदीच काही नाही तर मग ते कुत्र्याचं टोळकं पांगेपर्यंत कुठल्याही दुकानात शिरून काहीही चौकशा करीत बसतो. आणि अगदीच जीवन मरणाचा प्रश्न असेल, तर कपाळावरचा घाम पुसत, राम राम म्हणत कस बस ते वळण ओलांडतो आणि मग हुश्श !

Phobia, श्वानोफोबिया.

विमानप्रवास अटळ असेल तेव्हा बंड्या गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, अथर्वशीर्ष, रामरक्षा गायत्री मंत्र असं जेजे आठवेल ते म्हणत राहतो. घरातून निघताना, taxi  मध्ये  बसताना, विमानात बसल्यावर,  take  off  घेताना मनातल्या मनात संपूर्ण आयुष्याची उजळणी करत राहतो. मग विमान land  होई पर्यंत, पोटात गोळे, छातीत धडधड, घशाला कोरड असं आलटून पालटून चालू असतं; आणि जोडीला असतं प्रचंड उसनं अवसान. आपण अजिबात घाबरत नसल्याचं स्वतःला समजावत राहणे आणि धीर वाढवण्याचे प्रामाणिक प्रयत्न.

एकेका प्रवाशाला बघत ‘हा’ विमान प्रवासाला किती सरसावलेला असेल याचा अंदाज बांधायचा. एयर होस्टेस म्हणजे स्फूर्ती स्थान. ‘त्या नाही का फिरतात बिनधास्त चालत्या विमानात इकडून तिकडे! नेहमीच आहे त्यांच.  इतकी रिस्क असती तर पाठवलं असत का त्यांच्या आई-बाबांनी त्यांना इथे? बेल्ट बंधून नसत्या का बसल्या? उगाच आपला घाबरतोस…‘ स्वगत.

‘छे ट्रेन ने जायला हव शक्य तेव्हा. आकाशात एकट्याने मरण नको’. मग बंड्या सीट तपासतो. पाण्यात पडलो तर हिस्च वाचवणार न? पोहायला शिकलो असतो तर बर झालं असतं. बाबा तेव्हाच सांगत होते, प्रत्येकाला पोहायला येत हवं. पण नेमका आपलाच फ्लोट फुटला असता तर?

विमान खाली जायला लागलं की बंड्या च्या पोटात प्रचंड पोकळी निर्माण होते. हात खुर्चीला आवळून, डोळे बंद करून पुन्हा सगळी स्तोत्र. बंड्या म्हणूनच window  seat  घेत नाही. सगळ जग उत्सुकतेने खाली पाहत असताना बंड्या घड्याळात मिनिट मोजत असतो. एकदा तर त्याला त्याच्या विमाना पासून खाली काही (म्हणजे बर्याच) अंतरावर दुसर विमान घोटाळताना दिसलं होत.  तेव्हा बंड्या मनातल्या मनात नवस बोलला होता.  विमान एकदाचं land  झालं की त्याला युद्धावरून जिवंत परतल्याचा आनंद होतो.

Phobia,  प्लेनोफोबिया.

ट्रेनचही  तेच. बंड्या रात्रभर बर्थ वर कूस बदलत असतो. चुकून ट्रेन नदीत पडली. किंवा de -rail  झाली, किंवा काळोखात दुसरीवर आदळली तर? सावध नको का असायला. ट्रेनोफोबिया. लोकल ट्रेन मधल्या बॉम्ब ब्लास्ट नंतर तर त्याला विरार चर्चगेटचंही प्रचंड टेन्शन येत.

हे आणि असे अनेक फोबिया बंड्या सतत बरोबर वागवतो.

लिफ्टमधून जाताना आपलीच लिफ्ट दोन मजल्यांच्या मध्ये अडकणार; वर्षा सहलीला गेल्यावर सगळे पावसाळी किडे आपल्याला चावणार, हे त्याला पक्कं ठाऊक असतं. किडोफोबिया, आजारोफोबिया, प्रवासोफोबिया असे एक न अनेक फोबिया.

का कधी कशा या भीत्या त्याच्या मनात मूळ धरून बसल्या हे त्यालाही आठवत नाही. आनंदाची सुद्धा त्याला भीतीच वाटते. कोणाची नजर लागेल सांगता येत नाही.

अशा असंख्य भित्यांच्या भिंती स्वतःभोवती उभ्या करून त्या भित्यांच्या निर्वातात बंड्या आनंदाने जगतोय. 

हा फोबिया मरणाचा तर आहेच पण त्याहूनही अधिक तो जगण्याचा आहे.

बंड्याला जीवनोफोबिया झालाय.

Advertisements
 1. मस्त..मला ट्रेनबदद्ल असाच वाटायच. म्हणजे ट्रेन कुठल्या नदीवरून जाताना, रात्री त्या बर्थवर ट्रेन सोबत डूलताना… 🙂

  हा बंड्या सगळ्यांतच असतो… 🙂

 2. शेवटची दोन वाक्ये अत्यंत सुंदर..

  चला.. फक्त पद्यच नाही तर गद्यातही सोनल इज बॅक विथ हर खास टच..!!

  ग्रेट..

  ते “टोळक” “उसन” “जीवानोफोबिया” वगैरे टायपो उचक्या सुधारल्या तर सुंदर लिखानात खडा लागल्यासारखं होणार नाही.

  • sonalw
  • डिसेंबर 31st, 2010

  Thanks Nachiket.
  Typo sudharlyat..khade niwadlet. 🙂
  thanks Suhas. ‘Bandya’ he majh favouirite depictions aahe; tumachya aamchyatalyach eka maansach. chehra nasnaarya, garditalya ekach man.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: