सराव


एके दिवशी मी ठरवलं रोज ‘लिहायचं’.
म्हटलं त्या शिवाय सराव कसा होणार? शुद्ध लेखनाचा नव्हे…विचार मांडण्याचा सराव. बाकी शुद्ध लेखन वगैरे या ‘technical ‘ बाबी आहेत. भावना पोचण महत्वाचं आहे.. मग ते ‘हुजूर इस कदर भी ना इतराके चलिये’ म्हणत पोचवा किंवा ‘क्या भाव खा रेल्ली है?’ म्हणत पोचवा.
तर विचार मांडण्याचा सराव होण महत्वाचं आहे. पण एक गोम आहे. विचार कसे मांडायचे, याचा पण विचार करावा लागतो. म्हणजे कवितेतून? की गद्यातून? मग शैली कुठली? गंभीर विनोदी की उपरोधिक? मग गोष्ट की नाट्य की रोख ठोक लेख? मग होत काय न… की हे सगळे विचार करेपर्यंत मूळ विचार बिचारा एका कोपऱ्यात माझ त्याच्याकडे लक्ष जायची वाट बघत राहतो. मग अखेरीस मी अगदी सगळी रूप रेखा नक्की करून त्याच्याकडे गेले की ‘चल बाबा, आता ये आत, आपण आता जरा चर्चा करूया, मग स्क्रिप्ट final करू..” तर तो तोंड फिरवतो (तो म्हणजे ताटकळत उभा असलेला विचार) ” आम्ही नाही जा आता…” मघाशी इतका उत्साहाने उचंबळून आलो होतो तेव्हा तुझं ‘थांब माझ्या बाळाला न्हाऊ घालते…थांब माझ्या बाळाला पावू लावते…’ चाललं होत. तू दार उघडेपर्यंत पावूस थांबला. आता मी जातो नवीन घर बांधायला.
झालं? झाला सगळा विचका? आता पुन्हा थांबा, याचा मूड येईपर्यंत. किंवा मग दुसरा शोधा, या रूप रेषेत fit होणारा. त्याची स्क्रीन टेस्ट घ्या. तितकाच intense हवा. अधिक नको, कमी नको. त्याच पठडीतला सुद्धा असला पाहिजे. म्हणजे मूळ विचाराचं मूळ ‘अन्याय’ असेल तर नवीन candidate च सुद्धा तेच हवं. त्याचं मूळ जर ‘आशा’ असेल तर ह्याचं हि तेच हवं. म्हणजे नादीराला नंदा नाही replace करू शकणार. तसं.

हा, पण मूळ विचार जर तितकाच गरजू असेल तर तो काहीही कूच कूच न करता थांबतो. तास-न-तास. दिवस दिवस, कधी कधी वर्षभर सुद्धा.
गरज असते त्याला व्यक्त होण्याची. टाहो फोडण्याची. त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो. आणि कधी कधी तो इतरांच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो म्हणून; (असे निस्वार्थी विचार तसे दुर्मिळच असतात) आणि क्वचित वेळी तो माझ्या अस्तित्वाचा प्रश्न असतो म्हणून. त्याला व्यक्त करणं माझ्या जगण्याचा प्राण असतो म्हणून.
मग कधी असंही होतंच न? माझी भट्टी जमता जमत नाही, तरी हा मात्र तक्रार न करता थांबलेला. न खाता पिता झोपता, उन्हा तान्हात, पावूस वा-यात. अशा वेळी त्याला काय सांगायचं? मला नाही जमत, जा बाबा तू, दुसर्या कोणाच्या तरी अस्वस्थ मेंदूचं दार ठोठाव? एकदाच अशी चूक केली होती तेव्हा मला म्हणाला होता तो…” मेंदुच्याच दारात जायचं तर MBA खूप आहेत बाहेर. मला काय ठावूक तू मेंदूच पोट भरायला लिहितेस हे? मी तर तुझ्या हृदयाबद्दल ऐकून आलो होतो. बहुतेक चुकीचा पत्ता मिळाला..” त्या दिवशी जिवंत पणी मेले.
तेव्हा पासून ठरवलं आता लिहायचं. जस उतरेल तसं. जस हृदयातून पाझरेल तसं. शेवटी जिवंत राहण्याचा सराव महत्वाचा. बाकी सगळ्या ‘technical ‘ बाबी आहेत.

Advertisements
  • yog
  • जानेवारी 4th, 2011

  विचार सनाथ झालेत..

  • sahajach
  • जानेवारी 4th, 2011

  मस्त… सोनल ईस बॅक 🙂

  अगं तू कूठे हरवलीयेस हा विचार ईतके दिवस माझ्या मनात येत होता बघ वारंवार….

  • sonalw
  • जानेवारी 4th, 2011

  @Yog, Tanvi: Thank you.
  @Tanvi: Ag job change kela. Free Internet access wagaire band jhalay sagal sadhya. Ghari jawun postan just impossible. Aata suddha limited access aahe. tari aata prayatn karen regular asnyacha.

  • Atul
  • जानेवारी 4th, 2011

  मस्त…छान विचार मांडले आहेत…..

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

Advertisements
%d bloggers like this: